Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मॉल संस्कृतीतील चाळींचे दर्शन
वरळी, मुंबई येथील ललित कला भवन, सूरप्रवाह ही संस्था १९७४ पासून हौशी, कामगार रंगभूमीवर सातत्याने कार्यरत आहे. या संस्थेने आतापर्यंत ३५ नाटके विविध नाटय़स्पर्धामध्ये सादर केली आहेत. त्यामधील काही नाटकांना महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत व कामगार नाटय़स्पर्धेत पारितोषिकेही मिळाली आहेत.
शहरांमध्ये चाळसंस्कृती संपून मॉल संस्कृती आली, तरीही अजून काही अशा चाळी आहेत की जिथली माणसे अजूनही तीच आहेत. अजूनही अशी घरे आहेत की जिथे चैनीच्या वस्तू नाहीत. त्या लोकांना फक्त जगणे एवढेच माहीत आहे. असेच एक घर असते. पूर्वी एकमेकांशी मिळून मिसळून वागणारे, सर्वाचे सुख-दु:ख समजून घेणारे हे घर. एकमेकांशी प्रेमाने बोलणारे हे घर, पण ते आज एकमेकांना परके झाले आहे. या घरातील माणसे आता क्वचितच

 

एकमेकांशी बोलतात.
‘रंगबेरंग’ नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य व प्रकाशयोजना अशी चौरंगी जबाबदारी सुनील देवळेकर यांनी सांभाळली आहे.
महेंद्र वेंगुर्लेकर यांचे पाश्र्वसंगीत या नाटकाला लाभले आहे, तर पंकज सनेर हे निर्मिती प्रमुख आहेत.
श्रीनिवास नार्वेकर, प्रीती तोरणे, मंगला आहेर, पुरुषोत्तम हिर्लेकर, रुचिरा नाबर, रोहन भालेकर, संजीवन जाधव या कलाकारांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत.
आजचे नाटक
रंगबेरंग
शिवाजी मंदिर, सायं. ७.३० वा.

शुक्रवार, २० फेब्रुवारी २००९ रोजी
जय काली सांस्कृतिक मंडळ, कन्नड प्रस्तुत
‘दी फिअर फॅक्टर’
लेखक- उमेश उज्ज्वल

खालील प्रश्नाच्या अचूक उत्तरासह हे कात्रण नाटय़गृहाच्या बुकिंग काऊंटरवर देणाऱ्या पहिल्या पाच प्रेक्षकांना देणाऱ्या पहिल्या पाच प्रेक्षकांना दोन व्यक्तींसाठी विनामूल्य प्रवेश.
प्रश्न : पुण्याचे कोणते नाटय़केंद्र हे प्रायोगिक नाटकांचे माहेरघर बनले आहे?
१) सुदर्शन
२) यशवंत नाटय़ मंदिर
३) बालगंधर्व