Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

सरकारी अधिकाऱ्यांची, चौकटी पलीकडची दृष्टी!
जयंत धुळप

पोलीस उपायुक्त प्रवीण पवार, विक्रीकर उपायुक्त सुशील गर्जे, विक्रीकर उपायुक्त ज्ञानेश हिंगे व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर हे विविध सरकारी खात्यातील अधिकारी.. सरकारी अधिकारी वगळता त्यांच्यामध्ये आणखी एक समान दुवा आहे तो वन्यजीव छायाचित्रकार असण्याचा. सरकारी अधिकारी म्हटले की, चौकटीतला अधिकारी अशी प्रतिमा असते पण या साऱ्यांनी ती चौकट भेदून पलीकडचे पाहण्याचा प्रयत्न केला आहे.

‘छोटा जमाल’ आणि ‘चेरी’ निघाले ऑस्करवारीला!
सुनील डिंगणकर
‘स्लमडॉग मिलिअनेअर’मध्ये

अमिताभला पाहण्यासाठी ‘पॉटी’मध्ये उडी मारणारा ‘छोटा जमाल’ आणि ‘रिंग रिंग रिंगा’ गाण्यावर फेर धरणारी ‘पीला हाऊस’मधील ‘चेरी’ प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. अलीकडेच ब्रिटनमधील ‘स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड’च्या सवरेत्कृष्ट व्यक्तिरेखा निवड विभागातील पुरस्काराने ‘स्लमडॉग..’ला गौरविण्यात आले.

‘आयुर्वेद अॅण्ड यू’ मालिका आता माटुंग्यात
प्रतिनिधी

झंडु आणि लोकसत्ता प्रस्तुत ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ मालिकेतून सुरू असणाऱ्या निरोगी आरोग्यासाठी दुर्मिळ माहिती देणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २००९ रोजी रात्री आठ वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरमध्ये होणार आहे. आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व, उपयोग आणि ‘आरोग्य कुंडली’विषयी स्लाईड शोच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी कार्यक्रम सादरकर्ते वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी आयुर्वेदातील आहारशास्त्र या विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून उपयुक्त आहारशास्त्राबद्दल संवाद साधणार आहेत.

..स्पर्धा पक्षीनिरीक्षकांची!
प्रतिनिधी

बर्ड रेस म्हणजे पक्ष्यांची नव्हे तर पक्षीनिरीक्षकांची स्पर्धा. ठरविलेल्या विभागात दिवसभर फिरून अधिकाधिक पक्ष्यांची नोंद करण्याची स्पर्धा. अर्थातच निसर्गचक्रात कोणताही अडथळा न आणता. दि. २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या पाचव्या बर्ड रेसमध्ये ही स्पर्धा होणार आहे. तीदेखील तब्बल ३५० हून अधिक पक्षिमित्रांमध्ये!.या दिवशी ही मंडळी मुंबई परिसरातील जंगले, पाणथळ जागा, खाडी, नदी-किनारे अशा ठिकाणी जाणार आहेत. सकाळी १० पासून ते सायंकाळी ५ पर्यंत त्यांची ही भटकंती चालू असणार आहे.

फक्त पदपथांसाठी पेव्हर ब्लॉक वापरावे
‘पेव्हर ब्लॉक’बाबत सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘मुंबई वृत्तान्त’ने केलेल्या आवाहना नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रियां आज प्रसिद्ध करीत आहेत. आपल्या प्रतिक्रिया नागरिक २२८२२१८७ किंवा २२८४६२७७ या फॅक्सवर किंवा या मेलवर पाठवू शकतात.
मुंबईत साधारणत: २००३ पासून पेव्हर ब्लॉक वापरण्यास सुरूवात झाली.

मार्टिन ल्यूथर किंग (तिसरे) भारत भेटीवर
मार्टिन ल्यूथर किंग यांच्या भारत दौऱ्याला ५० वर्षे पूर्ण

प्रतिनिधी

महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी काढलेल्या दौऱ्याला फेब्रुवारी महिन्यात ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मार्टिन ल्युथर किंग यांचे नातू मार्टिन ल्युथर किंग (तिसरे) हे भारत भेटीवर येणार असून अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावलेले जॉन लेवीस आणि झाज वादक हर्बी हॅनकॉक हे देखील त्यांच्या बरोबर भारतातील इतर प्रतिनिधींना भेटणार आहेत.

सहाव्या आयोगाने केली वैद्यकीय अधिकाऱ्यांची निराशा!
प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सेवेत सतत १५ वर्षे ‘टेम्पररी’चा डोस घेऊन हैराण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असली, तरी बहुप्रतीक्षित सहाव्या वेतन आयोगाने राज्यभरातील आठ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपेक्षेपेक्षा कनिष्ठ वेतनश्रेणी दिल्याने ते पुन्हा अस्वस्थ बनले आहेत.

सदनिका विकून पुन्हा झोपडय़ांत जाऊ नका - जोशी
प्रतिनिधी

झोपडपष्ी पुनर्वसन योजनेअंतर्गत मिळालेल्या सदनिका विकून पुन्हा झोपडय़ांत जाण्याचा एक प्रवाह आला असून पैशाच्या मोहाने असे पाऊल उचलू नका. दादरसारख्या अत्यंत मोक्याच्या विभागात मिळालेल्या सदनिका विकू नका, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार मनोहर जोशी यांनी केले. स्वराज्य सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या इमारतींतील सदनिकांचे चाव्यावाटप जोशी यांच्या हस्ते कामगार क्रीडा भवनात आयोजिलेल्या एका समारंभात करण्यात आले. या प्रसंगी बोलताना जोशी म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार झोपडपष्ी पुनर्वसन योजनेतील हा प्रकल्प असून येथील रहिवाशांबरोबरच संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घाटे यांचेही परिश्रम यामागे आहेत. या संस्थेचे भूमिपुजन आपल्या हस्ते झाले आणि आता प्रकल्पही साकारल्याचा आनंद अधिक आहे, अशा भावना जोशी यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, नगरसेविका स्नेहल जाधव, राष्ट्रवादीचे एकनाथ संगम, भाजपाच्या मनिषा कायंदे, आशिष शेलार, सहा. आयुक्त नारायण पै, मधुकर संखे सनशाईन ग्रूपचे कश्यपभाई मेहता, अतुलभाई भाराणी, जयेशभाई विरा, कमलेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

वसईतील पहिले कुमार साहित्य संमेलन
प्रतिनिधी

सांस्कृतिक उन्मेष संस्थेतर्फे वसईत पहिले कुमार साहित्य संमेलन २१ फेब्रुवारी रोजी वसई रोड पश्चिमेकडील सहकार शिक्षण संस्थेच्या वनमाळी विद्या संकुलात आयोजित करण्यात आले आहे. १० ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची लेखन, वाचनाची गोडी वाढावी, मुलांना आकर्षित करणारे साहित्या निर्माण व्हावे, साहित्याचा मुलांना परिचय व्हावा हा कुमार साहित्य संमेलनाचा हेतू आहे. कोमसापचे अध्यक्ष प्रा. पु. द. कोडोलीकर, ‘..काव्र्हर’च्या लेखिका वीणा गवाणकर, सिसिलिया काव्र्हालो, कुमार साहित्याचे लेखक पु. ग. वनमाळी, सायमन मार्टिन आदी मान्यवरांचा आयोजनात सहभाग असून नवघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष नारायण मानकर व डॉ. खरवडकर यांचे सहकार्य कुमार साहित्य संमेलनाला मिळणार आहे. एक दिवसाच्या या संमेलनात सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी निघेल. कुमारवयीन मुलेमुली व त्यांच्या पालकांना राजीव तांबे मार्गदर्शन करतील. मनोरंजनपर कार्यक्रमाबरोबरच बालकुमारांचे कविसंमेलनही होईल. मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी तसेच आदिवासी भागांतील विद्यार्थी व पालक यांचा महत्त्वपूर्ण सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे.

तेली समाजाचे स्नेहसंमेलन
प्रतिनिधी

तेली समाजोन्नती संघाचे चिपळूण व गुहागरमधील सदस्यांसाठी महाशिवरात्री स्नेहसंमेलन २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ दरम्यान लालबाग, चिवडा गल्लीमधील न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी दहावी, बारावी, पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांमुलींचाही सत्कार करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्रे १५ फेब्रुवारीपर्यंत तेली समाजोन्नती संघ, ४/२०४, मथुरा, एच विंग, आंबेडकर नगर सोसायटी, वरळी या पत्त्यावर अथवा २४९६२८३० या दूरध्वनीवर संपर्क साधावा.