Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

विशेष

२००९-२०१० सालासाठीचा अंतरिम किंवा हंगामी अर्थसंकल्प अर्थखात्याचा तात्पुरता कार्यभार सांभाळणाऱ्या परराष्ट्रमंत्री प्रणबकुमार मुखर्जी यांनी नुकताच आपल्या संसदेला सादर केला. अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी आपल्या मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ३२९ अंशांनी कमी झाला. अर्थसंकल्पावरील शेअरबाजाराची ही प्रतिक्रिया आहे किंवा शेअरबाजाराच्या पसंतीला न उतरणारा असा हा अर्थसंकल्प आहे अशी त्यामुळे चर्चा सुरू झाली. संसदेतल्या विरोधी पक्षाने तसे म्हणणे हे एकवेळ समजण्याजोगे आहे. कारण तो त्यांच्या जागेचा परिणाम आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जात राष्ट्रीय हिताच्या गोष्टींसाठी एकविचाराने वागणे तितके सोपे नसतेच.

गॅलिलिओच्या काळापर्यंत काचा बनविण्याची कला आणि तंत्रज्ञान हे बऱ्यापैकी चांगले विकसित झाले होते. काचेचा उपयोग प्रामुख्याने अलंकारिक वस्तू बनविण्यासाठी होत होता. तसेच काचेला एक विशिष्ट आकार दिला तर त्यातून बघितल्यावर वस्तू मोठय़ा दिसतात हेही माहिती झालं होतं. अशा काचांना आपण भिंग म्हणतो. लेन्स हे नाव लेंटील, म्हणजे मसूराच्या दाण्यावरून आलं आहे. जर तुम्ही मसूराचा दाणा बघितला नसेल त्यांनी तो अवश्य बघा आणि तो भिंगासारखा दिसतो की नाही याची खात्री करून घ्या. भिंग बनविणारे कारागीर आपल्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची भिंग ठेवत असत. चाळिशी ओलांडलेले लोक ज्यांना जवळचं वाचता येत नसे ते या भिंग बनविणाऱ्या लोकांकडे जावून स्वतसाठी भिंग घेत असत.

काय मंडळी, उद्या जातल्यात की नाय आंगणेवाडीच्या जत्रेक? या आंगणेवाडीची आज मी तुमका गजाल सांगतय- सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या मालवण तालुक्यातला मसुरे या गाव. या गावात १२ वाडी- वस्ती आसत. एकेक वाडी म्हणजे एक गांवच. यापैकीच एक गाव आंगणेवाडी. या जत्रेक लहान-सहान नाय तर ३०० वर्षांचो इतिहास आसा. या गावात भरडकरणी नावाची वाडी वसाहत होती. हयसरली एक गाय शेतात चरी पण दूध दिय नाय. म्हणान त्या गायीच्या शेतकरी मालकान शोध घेण्याचा ठरयला. त्या शेतकऱ्याक शोध घेतल्यार असा आढळला की, एका पाषणार ही गाय दुधाची पान्हो सोडी. ही अजब गोष्ट बघून गावकऱ्यांनी देवाचो कौल घेतल्यानी. त्यात तुळजापूरची आई भवानी या पाषाणरुपात असल्याचा समाजला. गावचे लोक गरीब परंतु त्यांनी आपल्याकडे होते त्या पैशानीशी थयसर देऊळ बांधूक सुरुवात केली. त्याचवेळी मिरजेचो व्यापारी ‘चिमाजी आप्पा’ याच्या स्वप्नात देवी आयली. आणि आपला मंदिर उभारण्यास सांगितल्यानी. या व्यापाऱ्यान आपली २०० एकर जमीन विकून देवळाची पुनर्उभारणी केली. आजय मिरजेचे लोक या जत्रेक येतत. त्येंचो आजय गावात मान असता. जत्रेच्या तिसऱ्या दिवशी हेच मिरजकर गोंधळ घालतत. देवळाच्या या स्थापनेची ही गजाल पिढय़ान-पिढय़ा ऐकली जातासा. ती मी तुमका सांगली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही जत्रा भरता. या जत्रेक दहा लाखाच्या घरात लोक येतत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही जत्रा भरता. जत्रेची तारीख ठरविण्याची प्रथा मोठी गमतीशीर आसा. नोव्हेंबर महिन्यात गावकरी देवीसमोर ‘डाळप’ लावतात. म्हणजे ह्य़ो एक पुजाविधी असता. देवळात गावकरी जमून ढोल, ताशा, नगाऱ्याच्या गजरात पुजा करून ‘औसर’ काढतत. त्यानंतर गावकरी शिकारीक निघतत. शिकार मिळेपर्यंत गावकरी गावाच्या बाहेरच रवतत. तीन दिवसात शिकार मिळता, असो आजपर्यंतचो अनुभव आसा. शिकार मिळाल्यार गावकरी वाजत-गाजत गावात येतत. देवीच्या दीपमाळेक सावज बांधला जाता. प्रमुख मानकरी त्याका सुरी लायतत. त्यानंतर प्रसाद वाटप आणि देवीची मान्यता घेऊन जत्रेची तयारी सुरू करतत. जत्रेच्या दिवशी संपूर्ण गावात सडो, सारवण आणि रांगोळी घातलेली असता. लग्नसराइसारखी गावात धावपळ सुरू असता. जत्रेत येणाऱ्या प्रत्येकाक मोफत जेवणाची व्यवस्था घरोघरी केली जाता. कोणाच्याय घरी ओळखपाळख नसली तरी बिन्धास्त जावन कुणीही जेवचा. कुणाही उपाशी आपल्या घरी जाणा नाय, या जत्रेचा एक वैशिष्टय़ आसा. घरोघरी अन्न शिजत असता. घरातल्यो सुवासिनी मौनव्रत घेऊन जेवण करतत. एव्हरी पावलोपावली बडबड करणाऱ्यो या बायका त्या दिवशी मौनव्रत पाळतत. जत्रा एकूण तीन दिवसांची असता. तिसऱ्या दिवशी गावातले लोक देवीची ओटी भरून जत्रेची सांगता करतत. तीन दिवस गाव गर्दीत फुलललो असता. दुकाना थाटली जातत. एस.टी. बशीपासून मर्सिडीजमधून लोका येतात. सर्वसामान्य लोकांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत सगळ्यांची उपस्थिती हयसर देवीच्या दरबारात लागता.
आंगणेवाडीच्या या जत्रेक ३०० वर्षांचो इतिहा आसा. याका पुरोगामी मंडळी अंधश्रद्धा म्हणतीत. ही अंधश्रद्धा नाय तर श्रद्धा आसा. श्रद्धेक मोल नाय, तसा या जत्रेचा आसा. आजकालच्या काळात आणि शहरात माणसाक- माणूस भेटणा मुश्किल झालोसा. अशा वेळी जत्रेच्या निमित्तानं लोका एकत्र जमतत. परस्परांच्या सुख-दुखाच्यो गजाली करतत. देवीकडे मागणा मागतत. नवस पूर्ण झालो तर त्याची फेड करतत. तर मंडळी उद्या तुम्ही जत्रेक गेल्यावर देवीकडे सर्वाच्या सुखासाठी, शांततेसाठीचा मागणा करा. काय समाजला मा?
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com