Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सत्ताधाऱ्यांनी दलित समाजात फोडाफोड केली झ्र् ढसाळ
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सत्ताधाऱ्यांनी दलित समाजात फोडाफोडीचे राजकारण करून अस्पृश्यता निर्माण केली आहे. त्यामुळे या समाजाबद्दल त्यांच्यामध्ये आपलेपणा राहिलेला नाही, अशी टीका दलित पँथरचे अध्यक्ष नामदेव ढसाळ

 

यांनी येथे केली.
ढसाळ यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम झाला. ढसाळ, त्यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचा महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड. जयदेव गायकवाड, यशवंत नडगम आदी उपस्थित होते.
समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता नष्ट करण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांना सत्ताधाऱ्यांनी सुरूंग लावला, असे सांगून ढसाळ म्हणाले की, समाजातील अस्पृश्यता संपवायची असेल तर केवळ दलित समाजानेच नव्हे, तर सर्वानीच या विरोधात लढा देण्याची गरज आहे. प्रत्येकाला दुसऱ्या धर्माच्या भावना जमत नाही तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही. डॉ. कदम म्हणाले, ‘ढसाळ यांच्या लिखाणातून दलित समाजाला प्रेरणा दिली असून, दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा विरोध त्यांनी लढा दिल्यामुळे आज या समाजाला मोठय़ा प्रमाणात न्याय मिळाला आहे. या वेळी पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.