Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पॅनकार्ड उपलब्ध करून देणार
खोपोली, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

खोपोली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नाममात्र ७२ रुपये (६७ रुपये शासकीय फी व ५ रुपये फॉर्म फी) आकारणी करून इच्छुक नागरिकांना शासकीय आदेशानुसार अत्यावश्यक असलेले पॅनकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष अरुण कानडे यांनी दिली.
खोपोली बाजारपेठेतील जगन्नाथ कॉम्प्लेक्समधील बिर्लासन्लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयात (सुनील मॅचिंग सेंटरसमोर) गुरुवार, १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत इच्छुक नागरिकांकडून रीतसर भरलेले पॅनकार्डचे फॉर्म व संबंधित कागदपत्रांचा स्वीकार करण्यात येणार आहे. कार्यालयात पॅनकार्डचे फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व रीतसर फॉर्म भरून देण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. इच्छुकांनी येताना पासपोर्ट साईड्चा एक फोटो, तसेच रेशनकार्ड अथवा मोटारवाहन परवाना अथवा पासपोर्ट अथवा बॅक पासबुकची झेरॉक्स यापैकी एक कागदपत्र आणणे जरुरीचे आहे. स्वीकारलेले अर्ज आयकर विभागाकडे सादर करण्याची व २० दिवसांनंतर अर्जदार नागरिकांना पॅनकार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली आहे, असा खुलासा अरुण कानडे यांनी केला. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.