Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘अलिबाग येथील बंदर जेट्टीसाठी ६.५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून आणणार’
अलिबाग, १७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

 

अलिबाग कोळीवाडय़ातील मच्छीमार पकटीच्या दुरुस्तीच्या १३.२५ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार मधुकर ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला. अलिबाग येथील नवीन जेट्टीसाठी ६.५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आह़े बुधवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बरोबर होणाऱ्या बैठकीत या निधीस तातडीने मंजूर आपण घेणार असल्याचे आ. ठाकूर यांनी यावेळी बोलताना जाहीर केले आह़े
कोळी समाजासाठी तसेच तालुक्यातील सर्व जनतेसाठी आमदार म्हणून मी जे काही काम केले आहे ते सर्वाना ज्ञात आह़े काळीवाडय़ातील गजानन मंदिरास आवश्यक असलेला सभामंडप लवकरच बांधून देण्यात येईल, तर कोळी बांधवांच्या मागणीनुसार समाज मंदिराकरिता मंजूर १० लाख रुपयांच्या निधीत माझ्या आमदार निधीतून आणखी पाच लाख रुपये देण्यात येतील, असेही आ. ठाकूर यांनी यावेळी जाहीर केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मच्छीमार समाजाच्या नेत्या, तसेच रायगड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा मंदा बळी, अलिबाग तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सरोज डाकी, युवक काँग्रेसचे सासवणे विभागीय अध्यक्ष व मच्छिमारांच्या शासकीय समितीचे सदस्य सत्यवान कोळी, अलिबाग कोळी समाज अध्यक्ष चंद्रकांत भगत, हरिश्चंद्र बना, शेषनाथ भगत, दिनेश पाटील, लक्ष्मण सारंग, माजी चेअरमन सत्यजित पेरेकर, विकास पोरे, प्रशांत तबीब, आनंद सरतांडेल, प्रताप सारंग, केसरीनाथ नाखवा आदी उपस्थित होत़े
कोळी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत भगत यांनी मनोगत व्यक्त करताना, आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या कामाची प्रशंसा केली़ ते म्हणाले की, आमदार मधुशेठ आपल्या समाजासाठी ज्या तळमळीने काम करीत आहेत, त्यांची दखल आपण सर्वानी घेतली पाहिज़े विशेषत: कोळी समाजाच्या बाबतीत कोणताही राजकीय भेदभाव न करता ते आपल्याला सन्मानाची वागणूक देतात़ आमदार गरिबीतूनच वर आलेले असल्याने त्यांना गोरगरिबांच्या समस्यांची जाणीव असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले. विकास पोरे यांनी उपस्थितांचे आभार मानल़े