Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

प्रसन्ना पालांडेने केला इमुपालनाचा यशस्वी उद्योग
अलिबाग, १७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

 

पोलादपूर तालुक्यातील प्रसन्ना पालांडे या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता, व्यवसायाची वेगळी वाटा चोखाळण्याचा निर्णय घेतला आणि वैशिष्टय़पूर्ण अशा इमुपालनाचा व्यवसाय त्यांनी गोळेगणी या आपल्या आजोळी सुरू केला. सुमारे १५ हजार रुपयांना एक जोडी अशा इमूंच्या १८ जोडय़ा घेऊन या खर्चिक व्यवसायास सुरुवात केल्यानंतर येथील हवामान, भौगोलिक परिस्थिती यामुळे त्यातील तीन इमू दगावल़े यानंतर मात्र औषधोपचार, देखभाल, अन्न-पाणी, थंडी-पाऊस-ऊन-वारा यांपासून संरक्षण, लसीकरण अशा अनेक पातळीवर प्रसन्न पालांडे यांनी इमूंचे संगोपन काळजीपूर्वक सुरू केले.
मूळचा ऑस्ट्रेलियातील इमू पक्षी ज्या रेटीट कुळातील आहे, त्यामध्ये शहामृग, रेहा, किवी, कॅसोवरी अशा अन्य पक्ष्यांचाही समावेश आह़े यांचे पंख लहान आणि शरीर मोठे असल्याने हे पक्षी उडू शकत नाहीत़ साधारणत: सहा महिन्यांपर्यंतच्या पिल्लांमध्ये नर-मादी अशी चिन्हे दिसू लागतात़ मूलत: कोणत्याही हवामानाला आणि भौगोलिक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असलेले इमू पक्षी फारच आक्रमक असतात़ इमूंची पूर्ण वाढ झाल्यानंतर उंची पाच ते सहा फूट, तर वजन ४० ते ६० किलोपर्यंत वाढू शकत़े इमूंचे मांस ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात़े
कोकणातील हवामान ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इमूंच्या वाढीस पोषक आह़े त्यामुळे १८ महिन्यांच्या वयात मादी प्रजोत्पादन करू शकत़े गुद्द्वार हाच इमूंचा विष्ठामार्जन, अंडी देण्याचा तसेच समागमाचा मार्ग असल्याने, स्वच्छता अधिक महत्त्वाची बाब असल्याचे लक्षात घेऊन इमुपालन केंद्रावर विश्वासातील व्यक्तीची प्रसन्ना पालांडे यांनी नियुक्ती केली़ याखेरीज स्टार्अर फिड, गोअर फिड, लेअर फिड, मेंन्टेनन्स फिड, पालेभाजी असे खाद्य तसेच पुरेसे पाणी यांचा पुरवठा सुरू केला़ इमू पक्षी दिवसाला ८०० ग्रॅम खाद्य आणि तीन ते पाच लिटर्स पाणी घेत असल्याने त्याकडेही विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली़ इमूंचे आयुर्मान साधारणत: ३५ ते ४० वर्षांपर्यंत असून १८ महिन्यांपासून प्रजोत्पादन सज्ज झालेली प्रत्येक इमू मादी ऑक्टोबर ते मार्च या ६ महिन्यांच्या प्रजनन काळात ३० ते ३५ अंडी वयाच्या २५व्या वर्षांपर्यंत देऊ शकत़े अंडय़ाला नगास १ हजार ते बाराशे रुपये भावा मिळतो़
इमूंना मोकळेपणाने फिरता यावे यासाठी पाच गुंठे जमिनीवर १० नर-मादी जोडय़ा असे क्षेत्र असावे लागते, त्यानुसार प्रसन्ना पालांडे यांनी मुबलक जागा या इमुपालन केंद्रासाठी वापरली आह़े पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यापासून तीन ते पाच लिटर्स तेल मिळत़े त्याचा बाजारभाव तीन ते पाच हजार रुपये प्रतिलिटर आह़े इमूचे कातडे नरम व मऊशार असल्याने चर्मोद्योगामध्ये कातडय़ाला खूपच मागणी आह़े इमूच्या पिसांपासून लोकर तयार करता येत असल्याने विविधाकर्षक पेहेराव आणि टोप्यांमध्ये या लोकरीचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होत असतो़ एका इमू पक्ष्याच्या विष्ठेपासून दररोज किमान ५०० ग्रॅम सेंद्रीय खत उपलब्ध होत़े इमू पक्षी सहसा कोणत्याही दुर्धर आजाराला बळी पडत नाहीत किंवा त्यांना अशा आजारांची लागणही फारशी होत नाही़ जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता, राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्जपुरवठा, विमा संरक्षण अशा सुविधांमुळे हा व्यवसाय सुरू करण्यास विशेष धोका नाही, असा अनुभव प्रसन्ना पालांडे यांचा आहे.
रत्नागिरी जिल्'ाातील चिपळूण येथील कृषी क्रांती केंद्रामार्फत पक्षीपुरवठय़ासह अंडीखरेदीही केली जात असल्याने, या व्यवसायाला बाजारपेठ शोधण्याची भीती राहात नाही़ सरकारी यंत्रणांच्या अनास्थेमुळे प्रसन्ना पालांडे यांनी स्वत:च्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू करीत जिद्द दाखविली, हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल.