Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

राज्य

भ्रष्ट राजकारण्यांना गाडून टाका - नाना पाटेकर
कोल्हापूर,१७ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

काल निवडून आलेले राजकारणी थोडय़ाच काळात कसे करोडपती होतात, त्यांच्याकडे एवढा पैसा कसा येतो, याचा जाब जोपर्यंत आपण विचारणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार सुरूच राहिल. यासाठी पक्षाला मत न देता चांगली व्यक्ती पाहून मत द्या आणि भ्रष्ट राजकारण्यांना गाडून टाका, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे केले.प्रत्येक गोष्टीत आज टक्का घेतला जातो.

‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगल्या’चा प्रकार
चित्रपट निर्माते-दिग्दर्शकाच्या परस्परविरोधी तक्रारी
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटाचे निर्माते आनंद डावरे व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अ. भा. चित्रपट महामंडळाकडे परस्परांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली आहे. या जाहीर मतभेदांमुळे ‘गाव तसं चांगलं’पण वेशीला टांगलं असा प्रकार घडला आहे. निर्माते आनंद डावरे यांनी या संदर्भात दिग्दर्शक टिळेकर यांच्याविरोधात तक्रार करताना म्हटले आहे की, ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक व समन्वयक म्हणून टिळेकर यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. परंतु ठरलेल्या व्यवहारानुसार त्यांनी आपली कोणतीही जबाबदारी पूर्ण केली नाही.

पर्यावरणीय कायापालट अडल्याने देहू-आळंदीची आबाळ कायम!
अभिजित घोरपडे
पुणे, १७ फेब्रुवारी

निर्मळ पाण्यासह वाहणारी इंद्रायणी, समाधी मंदिराबरोबरच संपूर्ण गाव कचरामुक्त, सांडपाण्यासाठी भूमिगत व्यवस्था, उत्तम रस्ते-सुरळीत वाहतूक व आरोग्यदायी वातावरण.. देहू-आळंदीचा असा पर्यावरणीय कायापालट करण्याची योजना असून, सुरुवातीचा पावणेतीन कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर झाला आहे. पण देवस्थान व जिल्हाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या तीर्थक्षेत्राच्या नशिबी अजूनही प्रदूषित नदी, कचरा, घाणीचे साम्राज्य कायम आहे. हा निधी मार्च अखेपर्यंत न वापरल्यास तो माघारी जाण्याची शक्यता आहे.

आयुर्वेदीय औषधे व वनस्पतींवरचे पेटंटचे गंडांतर दूर
भारतीय पारंपरिक ज्ञानाला टी.के.डी.एल.चे संरक्षण कवच
नाशिक, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
त्रिभुवनकीर्ति, त्रिफला चूर्ण अशा आयुर्वेदीक औषधांसह आवळा, हिरडा, बेहडा, सुंठ, शतावरी, अश्वगंधा, कडूनिंब आदि वनस्पतींवर येऊ घातलेले पेटंटचे गंडांतर ट्रेडिशनल नॉलेज डिजीटल लायब्ररीद्वारा (टी.के.डी.एल.) भारताने युरोपिअन पेटंट कार्यालयाशी नुकत्याच केलेल्या करारामुळे टळले असून त्याबद्दल आयुर्वेद क्षेत्राने समाधानाचा सुस्कारा टाकला आहे. या करारामुळे आता कुठलाही देश अथवा कंपनी टी.के.डी.एल. मध्ये वर्णन केलेल्या वनस्पतीचे अथवा औषधाचे पेटंट घेऊ शकणार नाही.

दिल्लीवरील चढाईसाठी राष्ट्रवादीकरवी नाशिकच्या रणांगणाची निवड
नाशिक, १७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्लीवर चढाई करतानाच पंतप्रधानपद काबीज करता यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या रणांगणाची निवड केली आहे. त्यासाठी एक मार्च हा मुहूर्त पक्षश्रेष्ठींनी मुक्रर केला असून याच दिवशी दोन लाखाहून अधिक समर्थकांना एकत्रित करणे व त्यांच्या साक्षीने निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचेही निर्धारित झाले आहे. पक्षाच्या या महाअधिवेशनाचे नेपथ्य, दिवसभरातील कामकाजाची आखणी, राजकीय ठरावांचे स्वरुप, जंगी जाहिरसभा आणि एकूणच पक्ष प्रतिमेला साजेसे हे अधिवेशन भारदस्त व्हावे म्हणून त्याचे दायित्व भुजबळ काका-पुतण्याकडे सोपविण्यात आले आहे.

पनवेलमध्ये निनादणार संघशक्तीचा जय‘घोष’!
पनवेल, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान पनवेलमधील कर्नाळा क्रीडासंकुलामध्ये भव्य राष्ट्र रक्षा निनाद घोष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संघाचे किमान एक हजार स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होणार असून, प्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके शिबिराधिकारी या नात्याने उपस्थित राहणार आहेत. संघाचे कोकण प्रांत प्रचारप्रमुख प्रमोद बापट व कुलाबा जिल्हा संघचालक नंदा ओझे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

संभाजी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ३४ लाखांचा निधी मंजूर
संगमेश्वर, १७ फेब्रुवारी/वार्ताहर गेली १९ वर्षे पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील छत्रपती संभाजी स्मारकाचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावर्षी एप्रिलअखेर ही सर्व कामे मार्गी लावायची आहेत. संभाजी स्मारकाचे काम मार्गी लागावे, यासाठी ‘लोकसत्ता’ने सातत्याने शासनाचे लक्ष वेधले होते. ११ मार्च १९८९ रोजी भूमिपूजन झाल्यावर छत्रपती संभाजी स्मारक पूर्णत्वास नेण्यास स्मारक समितीला अपयश आले व अनेक वर्षे हे स्मारक अपूर्णावस्थेत एखाद्या पुरातन पडीक वास्तूप्रमाणे उभे होते.

‘अलिबाग येथील बंदर जेट्टीसाठी ६.५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून आणणार’
अलिबाग, १७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
अलिबाग कोळीवाडय़ातील मच्छीमार पकटीच्या दुरुस्तीच्या १३.२५ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार मधुकर ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला. अलिबाग येथील नवीन जेट्टीसाठी ६.५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आह़े बुधवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बरोबर होणाऱ्या बैठकीत या निधीस तातडीने मंजूर आपण घेणार असल्याचे आ. ठाकूर यांनी यावेळी बोलताना जाहीर केले आह़े कोळी समाजासाठी तसेच तालुक्यातील सर्व जनतेसाठी आमदार म्हणून मी जे काही काम केले आहे ते सर्वाना ज्ञात आह़े

प्रसन्ना पालांडेने केला इमुपालनाचा यशस्वी उद्योग
अलिबाग, १७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

पोलादपूर तालुक्यातील प्रसन्ना पालांडे या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता, व्यवसायाची वेगळी वाटा चोखाळण्याचा निर्णय घेतला आणि वैशिष्टय़पूर्ण अशा इमुपालनाचा व्यवसाय त्यांनी गोळेगणी या आपल्या आजोळी सुरू केला. सुमारे १५ हजार रुपयांना एक जोडी अशा इमूंच्या १८ जोडय़ा घेऊन या खर्चिक व्यवसायास सुरुवात केल्यानंतर येथील हवामान, भौगोलिक परिस्थिती यामुळे त्यातील तीन इमू दगावल़े यानंतर मात्र औषधोपचार, देखभाल, अन्न-पाणी, थंडी-पाऊस-ऊन-वारा यांपासून संरक्षण, लसीकरण अशा अनेक पातळीवर प्रसन्न पालांडे यांनी इमूंचे संगोपन काळजीपूर्वक सुरू केले.

पारोळ्याजवळील अपघातात सहा ठार
अमळनेर, १७ फेब्रुवारी / वार्ताहर

नागपूर-सुरत महामार्गावर पारोळ्याजवळ आज दुपारी साडेचारला ऑक्सीजन सिलिंडरने भरलेली मालमोटार अचानक उलटी होवून झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार तर आठ जण जखमी झाले. ऑक्सीजनचे सिलिंडर घेऊन धुळ्याहून निघालेली ही मालमोटार जळगावच्या दिशेने चालली होती. वाटेत चालकाने गाडीत काही प्रवाशांना बसवून घेतले. हे प्रवासी गाडीतील सिलिंडरवर बसले होते. करंजी फाटय़ाजवळच्या एका वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि मालमोटार उलटली. त्यात सुभाष माळी (विंचखेडा), उत्तम ज्ञानेश्वर माळी (उधना, सुरत), सुभाष यादव पाटील (नागसवाडी), चिमा हारकर (घांगुर्डे मुंदाणे), साहेबराव सुकदेव हाटकर (घांगुर्डे मुंदाणे), रफीक मिया (उंदीरखेडा) हे ठार झाले. मालमोटारीतील अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. जखमींना पारोळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन समितीवर राणे समर्थकांचे वर्चस्व
सावंतवाडी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राणे समर्थकांनी वर्चस्व प्राप्त केले. त्यामुळे काँग्रेसचे एकूण २२ तर राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. नारायण राणे समर्थकांनी समितीवर शक्तीप्रदर्शन केले. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने सरळ लढतीत १९ जागांवर तर बिनविरोध तीन मिळून २२ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. २४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना-भाजप स्पर्धेतही नव्हते. दोन्ही काँग्रेसमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न झाला, पण काही जागी त्याबाबत एकमत झाले नसल्याने राष्ट्रवादीला दणका बसला.