Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
  अभियांत्रिकी
योजक कौशल्य, उज्ज्वल भवितव्य
  पर्यटनातील व्यवसायसंधी
  पोर्टफोलियो मॅनेजमेंट सव्‍‌र्हिस
  लोगान विज्ञान पत्रकारिता अभ्यासवृत्ती
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव
  वैज्ञानिक संशोधन पद्धती
  नाबार्ड बँक : असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘अ’
  ग्रंथालयांचा नवीन ‘इलेक्ट्रॉनिक’ अवतार!
  प्रक्रिया उद्योगाचा पर्याय..
वैविध्यपूर्ण मसाल्यांचा व्यवसाय
  डिफरन्ट एमबीए
इंटिग्रेटेड एमबीए
  विविध उद्योगांची माहिती देणारा- ‘उद्योगसंधी’

 

घर-गृहस्थी, शेतीवाडी, उद्योग-व्यवसाय असो की पर्यावरण, नभांगण किंवा सभोवारचे वातावरण सर्व क्षेत्रात संचार करणारे करिअरचे दालन म्हणून अभियांत्रिकीकडे पाहता येईल. अभियांत्रिकीच्या सर्व ज्ञात तसेच अल्प परिचित शाखांचा हा आढावा..
भरपूर नोकऱ्यांची दालने उमेदवारांसाठी सताड उघडी करून देणारी ‘अभियांत्रिकी’ ही करिअरपेक्षा प्रावीण्यता असणारी अशी आहे. दुसऱ्या कोणत्याही व्यवसायापेक्षा अभियंत्यांना (अभियांत्रिकांना) या वातावरणानुकूल क्षेत्रामध्ये कामे करण्याची अधिक संधी आहे. शास्त्र आणि गणित यांच्या सहाय्याने त्यांचा सुयोग्य वापर करून व्यवहारोपयोगी समस्या सोडवून आणि ते समाजाला उपकारक होतील, अशा रीतीने अभियांत्रिकी आपले कार्य पार पाडीत असते. कोणत्याही राष्ट्रांची तांत्रिक आणि औद्योगिक पायाभूत उभारणी करण्यात अभियांत्रिकांचा फार मोठा वाटा आहे.
भिन्न प्रकारच्या मानवी वृत्ती आणि त्यांच्यातील बुद्धिमत्ता यांना अभियांत्रिकीच्या वैविध्यपूर्ण शाखा भुरळ पाडतात. अभियांत्रिकांच्या प्रमुख कार्यमग्नतेतील काही कामे म्हणजे कलात्मक आकृतिबंध (Design) कल्पना विकसित करणे, अखेरच्या उत्पादनात त्याची रूपांतरे करणे, विक्री करणे, मूलस्रोताचे, जनतेचे आणि यंत्रणेचे व्यवस्थापन करणे ही होत. आपले दैनंदिन जीवन आरामशीर आणि
 

पुरोगामी स्वरूपाचे होण्यासाठी अभियांत्रिक मोठमोठे पूल बांधण्यास तसेच रस्ते, इमारती, वाहने, कॉम्प्युटर्स, विद्युतनिर्मिती करणारी जनित्रे, जलव्यवस्थापन आणि प्रदूषण र्निबध पद्धती इ. अनेक बाबतीत मदत करतात.
कार्य परिचय
शास्त्रीय शोध आणि त्याचा वाणिज्य उपयोग या दोन कार्यातील अभियांत्रिकाचे काम हे दुव्यासारखे असते. त्याच्या कामाची सुरुवात ही ड्रॉईंग बोर्ड किंवा डेस्कपासून होते. त्या ठिकाणी नियोजन, रेखांकन, तांत्रिक रूपरेषेचे चित्रण या सारख्या बाबी पूर्ण झाल्यावर अभियांत्रिक प्रत्यक्ष साईटवर (बांधणी स्थळ) किंवा कारखान्यात जाऊन आपल्या संकल्पित प्रकल्पाच्या कार्यपूर्ततेचे सर्वेक्षण करतो. प्राविण्यपूर्ण आणि बचत करू शकणाऱ्या अशा मशिनरीच्या आकृतिबंध आणि सुधारणा, उत्पादने, पद्धती आणि यंत्रणा यांच्या अभिवृद्धीमध्ये अभियांत्रिकांचा मोलाचा वाटा असतो. त्यासाठी ते प्रयोगशाळा, चाचण्या, उत्पादन आणि देखभाल दुरुस्ती विभागात कामे करतात. ते प्रकल्पपूर्तीसाठी लागणारा वेळ आणि खर्च याचा अंदाज वर्तवतात. त्यातील काहींना विक्री विभाग आणि अभियांत्रिकी व्यवस्थापनात कामे करावी लागतात. अभियांत्रिकाचे महत्त्वाचे कार्य हे संपूर्ण अभियांत्रिक यंत्रणेतील आकृतिबंध, संशोधन आणि सुधारणा, वस्तुनिर्मिती/ उत्पादन, तांत्रिक विक्री, विपणन आणि संयंत्रणा यामध्ये प्रामुख्याने चालते. या अभियांत्रिकांचा देखभाल- दुरुस्ती सेवा, चाचण्या, उभारणी, दर्जा निश्चिती पद्धती यात मोठा सहभाग असतो.
कार्यक्षेत्र
पुष्कळ अभियांत्रिक प्रयोगशाळा, औद्योगिक समूह, बांधणी स्थळे यासारख्या ठिकाणी कामे करतात. अन्य काही बराचसा वेळ कार्यालयात कामे करतात. काहीजणांना कार्यस्थळी तसेच रचनास्थळी काम करण्यासाठी भरपूर प्रवास करावा लागतो. सर्वसामान्यपणे त्यांना हे काम करण्यासाठी कामाचे निश्चित तास ठरवून दिलेले असतात; परंतु केव्हा केव्हा ठरविलेले काम निश्चित वेळेत होण्यासाठी किंवा निर्धारित दर्जा राखता यावा यासाठी त्यांच्या कामावर अधिक ताण पडतो.
मनाचा कल
या व्यवसायासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे गुण म्हणजे शास्त्रीय मनोवृत्ती, उच्च शैक्षणिक स्वरूपाचे काम करण्याची क्षमता, विश्लेषणात्मक आणि सांख्यिक कौशल्य, कल्पनाशक्ती, समस्यापूर्ती करण्यातील स्वारस्य, समूहामध्ये काम करण्याची पात्रता, व्यवहार्यतेकडे असलेली मनाची दृष्टी, सामथ्र्य निर्माण करण्याची पात्रता हे होत. तांत्रिक हिंदी आणि विपणनासाठी अभियांत्रिकाकडे वेगळेच व्यक्तिमत्त्व हवे. यासाठी संभाषणकौशल्य व्यावहारिक कुशाग्र बुद्धी आणि चिकाटी हे महत्त्वाचे गुण अधिकाऱ्यांकडे हवेत.
ज्ञात शाखा
अभियांत्रिकाच्या पहिल्या पदवीच्या कार्यक्रमात साधारणपणे एकाच कार्यावर खरी शिस्त असते.त्यामुळे तो सर्वप्रथम एका शाखेमधील स्पेशलायझेशनच्या मागे असतो. त्यानंतर तो दुसऱ्या कार्यात लक्ष घालतो. अभियांत्रिकीमध्ये एक डझनहून अधिक शाखा आहेत आणि या शाखांमध्ये अनेक उपशाखा आहेत. उदा. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये स्ट्रक्चरल, एनव्हायरनमेंट आणि ट्रान्सपोर्टिग अशा उपशाखा आहेत. अभियांत्रिकांना परिवहन, विद्युत अशा सारख्या केवळ एका व्यवसायात आपले खास अग्रेसरत्व दाखवता येते. अभियांत्रिकीतील महत्त्वाच्या शाखा पुढीलप्रमाणे- एरोस्पेस, अ‍ॅग्रिकल्चरल, सिरॅमिक्स, केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल मेकॅनिकल, मेटलर्जिकल, मायनिंग, पेट्रोलियम, टेक्स्टाईल, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पॉवर टेक्निक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स.
एरोस्पेस (वायू अवकाश)/ इंजिनीअर्स : व्यापारी आणि मिलिटरी एअर क्राफ्ट, क्षेपणास्त्रे व स्पेसक्राफ्टस् (अवकाशयाने) यांच्या आकृतिबंध, सुधारणा आणि चाचण्यामध्ये मदत करतात. ते वैज्ञानिक (व्यापारी), संरक्षण पद्धती आणि अवकाश समन्वेषण (Exploration) या क्षेत्रात नवी तंत्रज्ञाने विकसित करतात. संरक्षण सेवा, एअरलाइन्स, एअरक्राफ्ट आणि तत्संबंधीच्या उत्पादकांकडे त्यांना नोकऱ्या उपलब्ध असतात.
सिरॅमिक इंजिनीअर्सचा सिरॅमिकची निर्मिती आणि सुधारणा यांच्याशी संबंध येतो. काच काम, सेमि कंडक्टर्स, परिवहन आणि एअरक्राफ्टचे इंजिन कॉम्पोनंटस्, फायबर ऑप्टिक फोन लाइन्स, टाइल्स आणि इलेक्ट्रिक पॉवर लाईन विरोधक (insulators) अशा विविध स्वरूपाच्या उत्पादनांशी त्यांचा संबंध येतो.
केमिकल इंजिनीअर्स हे केमिकल्स आणि केमिकल उत्पादनात गुंतलेले असतात. ऑईल केमिकल खाद्य औषधी (pharmaceutical) मद्यकरण (brewing) आणि प्रक्रिया उद्योगात त्यांना नोकऱ्या मिळू शकतात.
सिव्हिल इंजिनीअर्स रस्तेबांधणी, एअरपोर्टस्, बोगदे, पूल, पाणीपुरवठा, वाहितमल (sewage) पद्धती आणि बांधकाम उद्योग या क्षेत्रात कामे करतात. या क्षेत्रात स्ट्रक्चरल, वॉटररिसोर्सिस, पर्यावरण, बांधकाम आणि परविहन ही प्रमुख वैशिष्टय़े (specialities) असतात.
कॉम्प्युटर इंजिनीअर्स सिस्टीम डिझाईन आणि डेव्हलपमेंटच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये कामे करतात. हे बऱ्याच वेळा नवी कॉम्प्युटिंग साधने आणि कॉम्प्युटरशी संबंधित उपकरणांच्या डिझाईनमध्ये एका समूहातील भाग या नात्याने काम करतात. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स पॅकेज्ड आणि सिस्टीम्स् सॉफ्टवेअर अशा दोन्ही विभागांतील डिझाईन आणि डेव्हलपमेंट करतात.
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस्ची डिझाइन, डेव्हलपमेंट, चाचण्या आणि सव्‍‌र्हेक्षण यांच्या उत्पादनात लक्षणीय भर घालतात. पॉवर जनरेशन, संचारण, (ट्रान्समिशन) जनरेशन, कम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादनात स्पेशालिटी असते. मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्समधील इंडस्ट्रियल इंजिनीअर्स हा एक दुवा असतो. कोणत्याही उत्पादननिर्मितीचे मूलभूत घटक म्हणजे लोक, मशिन्स, मटेरियल, माहिती आणि ऊर्जा व्यवस्थापनातील या महत्त्वाच्या घटकासाठी सर्वात अधिक परिणामकारक मार्ग कोणते आहेत त्याचे हे इंजिनीअर्स निश्चितीकरण करतात.
मेकॅनिकल इंजिनीअर्स टूल्स, इंजिने, मशीन्स आणि मेकॅनिकल भागाशी संबंधित अशा बाबींचे रचनाकल्प आणि संरचनेकडे लक्ष पुरवतात. इतर इंजिनीअर्सना लागणाऱ्या टूल्सचेही ते डिझाइन करतात.
मेटलर्जिकल इंजिनीअर्स हे धातुशास्त्रातील निष्कर्षण किंवा केमिकल, फिजिकल आणि मेकॅनिकल किंवा प्रक्रिया शाखांमध्ये कामे करतात. अनेक अंतर्गत स्वतंत्र अशा वैशिष्टय़पूर्ण शाखांमध्ये योगदान देणारी इंजिनीअरिंगमधील ही एक मोठी प्रणाली आहे.
मायिनग इंजिनीअर्स हे खाणकामातील निष्कर्ष काढून उत्पादन करणाऱ्या उद्योगासाठी खनिजे आणि धातू तयार करतात. ते भूमिगत क्षेत्रातील प्रचालनातून (operations) उघडे खात (pits) आणि भूमिगत खाणी यांची डिझाइन्स करतात आणि प्रोसेसिंग प्लांटस्ना मिनरल्सचा पुरवठा करण्यासाठी ते उपकारक पद्धती शोधून काढतात.
पेट्रोलियम इंजिनीअर्स ऑईल किंवा नॅचरल गॅस यांच्या कार्यरत होऊ शकणाऱ्या साठय़ांच्या संबंधात संशोधनकार्य करतात. ऑईल ड्रिलिंग आणि साठय़ातून अधिकाधिक उच्चतम किफायतशीर रिकव्हरी कशी होऊ शकेल ते साध्य करण्यासाठी ते काम करतात. पेट्रोलियम आणि संबंधित उद्योगांमध्ये त्यांना बहुतेक करून नोकऱ्या मिळत असतात.
टेक्स्टाइल इंजिनीअर्स फायबर आणि फायबर उत्पादने (सिंथेटिक आणि नैसर्गिक स्वरूपाची) मधील कार्यपद्धतीच्या निर्धारण पद्धतीसाठी डिझाइन्स आणि डेव्हलपमेंट करतात. या अभियांत्रिकी समस्यांचे ते पृथ:करण करतात.
अल्पज्ञात शाखा
अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग ही अ‍ॅग्रिकल्चरल मशिनरी प्लानिंग फार्म बिल्डिंग्सची प्लानिंग, डिझाइन आणि कन्स्ट्रक्शन, इरिगेशन, ट्रेनिंग आणि लॅण्ड रिसोर्स प्लानिंग फार्म मशिनरीसाठी सव्‍‌र्हिस इंजिनीयरिंग यासारख्या कार्यात गुंतलेली असते.
बायो केमिकल इंजिनीअरिंग बायो केमिकल्सच्या प्रक्रियेतील संशोधन, डिझाईन, प्लान्टचे कन्स्टक्शन आणि ऑपरेशन वर्क यामध्ये काम करते. मैलापायी निस्सारण/ (Efflunt) उघडे अभिक्रिया/ संस्करण (Treatment), विरंचन (Fermentation) आणि औषधनिर्मितीत ही शाखा गुंतलेली असते.
बायोमेडिकल इंजिनीअरिंग ही मेडिकल आणि शारीरिक समस्यांच्या संदर्भातील अभियांत्रिकीच्या उपयोजनाची शाखा आहे.
एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग ही वाढत्या पर्यावरणाच्या समस्या शोधून काढणाऱ्या, तिला समर्थपणे तोंड देऊ शकणाऱ्या आणि या समस्येच्या उपशमन (alleviating)) कार्यासाठी गुंतलेली शाखा आहे.
इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग इन्स्ट्रमेंट पद्धतीच्या डिझाईन उभारणी आणि देखभाल दुरुस्तीमध्ये व्यस्त असते.
नेव्हल आर्किटेक्चर समुद्राच्या वर किंवा पाण्याखाली कार्य करणाऱ्या सर्व प्रकारच्या पद्धतींच्या डिझाइन्स आणि बांधणीमध्ये काम करते.
प्रशिक्षण
इंजिनीअरिंगचा डिग्री कोर्स हा साधारणपणे चार वर्षांच्या कालावधीचा असतो. १० + २ श्रेणीतील परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना या शिक्षणक्रमासाठी जाता येते. अर्थातच फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असले पाहिजेत.
निवड प्रक्रिया
मॅथेमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयातील अर्जदाराची पात्रता पाहून सर्वसाधारणपणे भारतातील विश्वविद्यालयातून प्रवेश दिला जातो. उदा. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) उघडे जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (IIT-JEE) आणि रुरकी येथील विश्व विद्यालयातील अभियांत्रिकी विषयासाठी प्रवेश दिला जातो. बिर्ला इन्स्टिटय़ूट टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स (BITS) या पिलानी येथील संस्थेत प्रवेश देताना प्लस टू (सायन्स) परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टप्रमाणे प्रवेश देण्यात येतो. महाराष्ट्रासारख्या राज्यात याच तत्त्वावर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येतो.
परीक्षेची संरचना
स्क्रीनिंग टेस्ट : मॅथेमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयातील तीन तासांच्या कालावधीचा एक ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा पेपर.
मुख्य परीक्षा : जे विद्यार्थी आपली गुणवत्ता स्क्रीिनग टेस्टमध्ये सिद्ध करतात त्यांच्यासाठी मॅथेमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीतील प्रत्येक दोन तासांच्या कालावधीचे तीन पेपर्स.
पेपरची भाषा : इंग्लिश किंवा हिंदी.
उत्तरे देण्याची भाषा : आसामी, बंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, तामीळ, तेलुगु.
SC/ST उमेदवारांसाठी आरक्षण : SC साठी १५ तर ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक अर्हता शिथिल करण्यात आली असेल अशा ST उमेदवारासाठी ७.५ टक्के. जे SC/ST उमेदवार शिथिल करण्यात आलेल्या पात्रतेस पात्र नसतील पण ज्यांच्यापाशी काही अन्य समाधानकारक बाबींची पूर्तता करणारी अर्हता असेल अशा उमेदवारांसाठी एक वर्षांंच्या तयारी करणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातील आणि मग JEE ला पुन्हा जाऊ दिल्याशिवाय रिकाम्या जागा अशा उमेदवारांना दिल्या जातील.
इन्स्टिटय़ूट आणि अभ्यासक्रमांसाठी प्राधान्येकरून भाग वाटप. संरक्षण खाते युद्ध काळात किंवा शांततेच्या काळात समसैनिकी मारले गेलेले किंवा जायबंदी झालेले जवान आदींच्या मुलांसाठी प्रत्येक संस्थेमध्ये दोन जागा उपलब्ध केल्या जातील.
प्रत्येक संस्थेमध्ये एक जागा शारीरिक अपंगता असलेल्या (कुष्ठरोग मुक्तांसाठी) त्याची तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची क्षमता अजमावून उपलब्ध केली जाईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना सामान्य श्रेणीमध्ये खएए त उत्तीर्ण व्हावे लागते.
नव्या योजनेखाली पुढील वर्षांच्या जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी होणाऱ्या स्क्रीनिंग टेस्टचे माहितीपत्रक जुलै महिन्यात अपेक्षित असते.
डायरेक्ट अ‍ॅडमिशन ऑफ स्टुडंटस् अब्रॉड (DASA) या मार्फत रीतसर येणाऱ्या उमेदवारांखेरीज सर्व भारतीय आणि परकीय राष्ट्रीयीकृत असलेल्या उमेदवारांना खएए ला बसावे लागते.
DASA च्या तपशिलासाठी चेअरमन, JEE, IIT, Bombay- Powai, Mumbai- 400076.
प्रांतिक अभियांत्रिकी महाविद्यालये (Regional Engineering Colleges) :
प्रांतिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागांचे भागवाटप : सर्व फएउर मध्ये ५०% जागा ज्या राज्यातून विद्यार्थी आलेला असेल त्यासाठी राखीव असतात. त्या त्या अन्य राज्यांतील लोकसंख्येवर आधारित बाकीच्या ५०% जागांचे भाग वाटप करण्यात येते.
पात्रता
१० + २ किंवा त्या समान परीक्षांसाठी अ वर्गात उत्तीर्ण किंवा AICTE मान्यताप्राप्त तीन-चार वर्षांच्या डिप्लोमा परीक्षेत उत्तीर्ण किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनमध्ये उत्तीर्ण. ज्यांना वरीलपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये त्या वर्षीच्या ३० सप्टेंबरपूर्वी उत्तीर्ण होणाऱ्यांनी अर्ज करावेत. स्क्रीनिंग टेस्टला येण्यापूर्वी उमेदवाराने ११ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भवितव्य
इंजिनीअरिंगमधील पदवीधारकांसाठी असलेली नोकरी ही व्यवस्थापकीय संवर्गमधील असून त्यातील प्रशिक्षणार्थीला सुरुवातीला रुपये ९००० ते रुपये १२००० एवढा पगार असतो. नोकरी देणाऱ्या संस्थेच्या व्यवसायाच्या व्यापानुसार पगार दिला जातो. नव्या उमेदवाराच्या अ‍ॅकेडेमिक पाश्र्वभूमीचा विचार केला जातो. योजकतेचे कौशल्य दाखविल्यास अभियांत्रिकीमध्ये वाव असल्यामुळे या स्वरूपाच्या नोकरीत जेवढा व्यापक वापर असेल तेवढे भवितव्य अधिक नसते. आपल्या व्यवसायात बढती मिळण्याच्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे फार आवश्यक आहे. उच्च तांत्रिक क्षेत्रामध्ये मोठमोठी आव्हाने, मनाजोगते काम आणि लठ्ठ पगार मिळतो. पुष्कर मुंडले
९९६९४६३६१०