Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

फार पूर्वीच्या गुरूकुल पद्धतीपासून अध्ययन-अध्यापन हे विविध टप्प्यांतून संक्रमण करत गेलं आहे. केवळ शालेय शिक्षण, त्यानंतर खाजगी शिकवण्या आणि त्यानंतर पूर्णपणे व्यावसायिक क्लासेस.. अशा मार्गाने चालणारी ही अध्यापनाची गाडी शेवटच्या ‘स्टेशन’वर मात्र बरीच वर्षे ‘थांबून’ होती. पण change is constant या उक्तीला धरूनच आता अध्यापनाच्या पद्धतीत प्रचंड बदल घडवणारी एक प्रणाली फेब्रुवारी २००८ मध्ये लाँच केली गेली आहे. ती म्हणजे
Topper Integrated Learning System...
‘आज वर्गात क्लासमध्ये काय शिकवलं ते सगळं अक्षरश: डोक्यावरून गेलं आई.. इतकी गणितं सोडवली, केमिस्ट्रीची इतकी इक्वेशन्स लिहिली.. पण शेवटी शेवटी लक्षात आलं की एका साच्यातल्या सारखी एकाच प्रकारची गणितं मी करत गेलो म्हणजे फळ्यावरनं उतरवत गेलो, पण स्वत: करायची वेळ आली तेव्हा डोकंच चालेना बघ..’ सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत क्लास- कॉलेज- क्लास या चक्रात गरगरून फिरत राहिलेला आशीष आईजवळ आपलं मन मोकळं करत होता. अकरावीत शिकणारा आशीष साधारण नववीच्या शेवटच्या सहा महिन्यांपासून या चक्राला बांधला गेला होता आणि पुढचं एक वर्ष तरी त्याला यातून

 

सुटका दिसत नव्हती. गेली वीस एक र्वष उच्च माध्यमिक वर्गातल्या अध्यापनाशी आणि त्यातही गणित विषयाशी अगदी जवळून ओळख असल्यामुळे आणि भारतातल्या विविध राज्यांत अध्यापनाची संधी मिळाल्यामुळे असे अनेक आशीष मला भेटत गेले. विषय जर मुळातून समजला नसेल तर शिक्षण हे फक्त मेकॅनिकल, यांत्रिक क्रिया होऊन बसते. समजलं नाही म्हणून गोडी लागत नाही अन् गोडी लागत नाही त्यामुळे गुण मिळण्याची खात्री राहात नाही, ही सर्वसाधारण क्षमतेच्या मुलांची कैफियत आहे.
फार पूर्वीच्या गुरूकुल पद्धतीपासून अध्ययन-अध्यापन हे विविध टप्प्यांतून संक्रमण करत गेलं आहे. केवळ शालेय शिक्षण, त्यानंतर खाजगी शिकवण्या आणि त्यानंतर पूर्णपणे व्यावसायिक क्लासेस.. अशा मार्गाने चालणारी ही अध्यापनाची गाडी शेवटच्या ‘स्टेशन’वर मात्र बरीच वर्षे ‘थांबून’ होती. अर्थात क्लासेसच्या टप्प्यावर एक वेळ शाळा-कॉलेजमध्ये गैरहजर राहतील पण ‘क्लास’ बुडवणार नाही अशी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली. अमुक अमुक टक्के मार्काची हमी यांसारख्या ‘स्लोगन्स’चे हे बळी स्वत:ची कुवत आणि अध्यापनाची क्वालिटी यांना सहज नजरअंदाज करताना दिसतात. पण change is constant या उक्तीला धरूनच आता अध्यापनाच्या पद्धतीत प्रचंड बदल घडवणारी एक प्रणाली फेब्रुवारी २००८ मध्ये लाँच केली गेली आहे. ती म्हणजे Topper Integrated Learning System...
गुरूकुल पद्धतीत शिष्य हा गुरूकडे जाऊन राहात असे तर एकविसाव्या शतकातल्या नव्या पद्धतीत गुरू आणि शिष्य हे शेकडो- हजारो मैलांवर एकमेकांपासून दूर असले तरी डिजिटल मीडियाद्वारे शिष्याच्या थेट घरात पोचून गुरू त्याला शिकवू शकतात.
आजच्या घडीला भारताच्या घराघरांतून, खेडय़ापाडय़ांतून टी. व्ही.तर पोचला आहेच, पण इंटरनेटनेसुद्धा आपलं पाऊल मजबूतपणे रोवायला सुरुवात केली आहे. नेमका याच परिस्थितीचा फायदा घेऊन ‘टॉपर’ने Topper TV ही शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी आणि Topperlearning.com ही वेबसाईट (संकेतस्थळ) अशी दुहेरी आघाडी उघडली आहे. या संदर्भात बोलताना ‘टॉपर’चे सीईओ श्रीचरण सांगतात, ‘आपल्या देशात शिक्षणाचा दर्जा हा सर्व संस्थांमध्ये एकसारखा नाहीये. काही ठिकाणी उत्तम शाळा आणि तितकेच चांगले अध्यापक असतात, तर इतर काही ठिकाणी याच्या अगदी उलट परिस्थिती असते. त्यामुळे एक विशिष्ट दर्जा सांभाळून, एकाच ‘प्लॅटफॉर्म’वरून देशभरातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता यावा, या हेतूने आम्ही ही वाहिनी आणि वेबसाईट अशी दुहेरी संकल्पना राबवली आहे.’ मात्र हे सांगितल्यावर चटकन ते असंही सांगतात की, ‘शाळेतल्या अध्यापनाला substitute करणे हे आमचे उद्दिष्ट नसून त्याला या दोन्ही सुविधा पूरक ठराव्यात यावर आमचा भर असतो.’
Topper TV तर्फे सध्या पहिलं पाऊल म्हणून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता विज्ञान आणि गणित हे विषय घेतले जातात. अर्थात जिथे भौतिक, रसायन व जीवशास्त्र असं विभाजन अभ्यासक्रमातच आहे त्या वर्गाना हे विषय निरनिराळे शिकवले जातात. आपापल्या क्षेत्रात उच्च शैक्षणिक पात्रता आणि पदव्या मिळवणारी तज्ज्ञ मंडळी प्रत्येक ‘एपिसोड’मध्ये त्या त्या विषयाचे बारकावे दाखवून देत, क्लिष्ट टॉपिकचे निरनिराळे पदर उलगडून दाखवत विषय जास्तीत जास्त सुलभ करून दाखवताना आढळतात. ‘टॉपर’च्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे ‘व्हिज्युएल मीडियम’चा फायदा घेऊन गणित आणि विज्ञान हे आपल्या भोवतीच्या जगात कसं नेहमीच असतं आणि ते कसं वापरता येऊ शकतं हे विद्यार्थ्यांसमोर मांडणे हा आहे; ज्यायोगे विद्यार्थी त्या विषयाशी relate करू शकतात अन् विषयाची गोडी लागण्याकरिता हे नक्कीच खूप उपयुक्त आहे
सध्या Topper तर्फे सी. बी. एस. ई. अभ्यासक्रमावर आधारित एपिसोडस् दाखवले जात असले तरी श्रीचरण सांगतात की, ‘विज्ञान आणि गणित हे विषय असे आहेत की, कुठल्याही राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले टॉपिक्स हे साधारणपणे सारखेच आढळतात. फार तर एखाद्या अभ्यासक्रमातला नववीचा टॉपिक दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या दहावीच्या पुस्तकात सापडतो, इतकंच. त्यामुळे टॉपिकवाईज केलेले एपिसोडस् हे कुठल्याही विद्यार्थ्यांला उपयोगी पडू शकतात. आपल्या तज्ज्ञ अध्यापकांबद्दल बोलताना श्रीचरण सांगतात की, हे अध्यापक फक्त विषयांचे जाणकार आणि उत्तम अध्यापक आहेत असंच नाही तर आपापल्या विषयांबद्दल ही सर्वच मंडळी अगदी पॅशनेट आहेत, त्यामुळे अगदी जीव ओतून सर्वजण काम करतात.
Topperlearning.com ही वेबसाईट म्हणजे Topper चं दुसरं क्रांतिकारी पाऊल. कुठल्याही विषयाकरिता आणि खास करून गणित आणि विज्ञानाकरिता विषय समजल्यानंतर विविध प्रकारच्या प्रश्नांची तयारी करणे (एकाच प्रकारचे अनेक प्रश्न करणे नव्हे.) फार महत्त्वाचे असते. त्यामुळे विषयाचे किती खोलवर ज्ञान विद्यार्थ्यांला आहे हे अजमावता येते. तसेच खास ‘बोर्ड पॅटर्न’प्रमाणे उत्तरे कशी लिहावीत त्याची तयारी हा दहावी-बारावीकरिता महत्त्वाचा मुद्दा असतो. या दृष्टीतून Topperlearning.com ला जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. श्रीचरण सांगतात की, वेबसाईटवरील ऑनलाईन टेस्टस् या विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. केवळ दहा-अकरा महिन्यांच्या कालावधीत जवळ जवळ साडेचार लाख टेस्टस् विद्यार्थ्यांनी घेतल्या आणि दररोज साधारण अडीच-तीस हजार टेस्टस् विद्यार्थ्यांकडून सोडवल्या जातात, ही आकडेवारी ऑनलाईन टेस्टस्च्या लोकप्रियतेची साक्षच म्हणता येईल. M.C.Q. tests अर्थात Choice Questions Tests द्वारा विद्यार्थ्यांचे कॉन्सेप्टस् स्पष्ट व्हायला मदत होते; परंतु अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सतावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वेळोवेळी आलेल्या शंका.. याकरिता Topperlearning.com ने जी सुविधा पुरवली आहे ती फारच अनोखी म्हणावी लागेल. विद्यार्थी आपल्या विषयातल्या प्रश्नांसंबंधी वा कॉन्सेप्टसंबंधी शंका या ‘वेबसाईट’वर पोस्ट करू शकतात व देशभर पसरलेले विषयवार ४० तज्ज्ञ अध्यापक त्यांच्या या शंकांचे निरसन करून, एखाद्या विशिष्ट महत्त्वाच्या मुद्याला हायलाइट करून त्याची उत्तरे पोस्ट करतात, जी काही सेकंदांत विद्यार्थ्यांच्या ई-मेल बॉक्समध्ये जाऊन पोचतात. गणित विषयाचे या संदर्भातले काम करणाऱ्या एका अध्यापकांनी सांगितले की, रात्री ११-११.३० च्या सुमाराससुद्धा आमच्या मेल बॉक्समध्ये प्रश्न दिसला तरी आम्ही उत्तरे पाठवण्याचा प्रयत्न करतो. ज्यायोगे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा ताबडतोब शंकानिरसन होऊन त्यांच्या मार्गातले अडथळे दूर होऊ शकतात. यातून मिळणारं समाधानही आम्हा अध्यापकांना फार मोलाचं वाटतं. भारतभरच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सुविधेमुळे ‘टॉपर’ची Integrated Learning System अतिशय वैशिष्टय़पूर्ण आणि उपयुक्त आहे यात वादच नाही आणि त्यामुळेच television आणि website या आधुनिक माध्यमांद्वारे quality education पुरवण्याचं व्रत घेतलेल्या ‘टॉपर’चा विद्यार्थीवर्ग दिवसागणिक वाढतो आहे यात काहीच नवल नाही.
स्वाती देशपांडे

टॉपर लर्निग डॉट कॉम
टॉपर टी.व्ही.वरचे ‘मिस’ झालेले भागांचे व्हिडीओज पाहण्याची सुविधा
ऑनलाइन टेस्टस व मॉडेल आन्सर्स
शंका-समाधान करून घेण्याची अनोखी सुविधा
बोर्ड-परीक्षांच्या पाच आठवडे आधीपासून दर आठवडय़ाला स्पेशल टेस्टस्.

टॉपर टीव्ही
टाटा स्काय आणि डिश टीव्हीवर उपलब्ध
दिवसभराचे विषयांचे ठराविक वेळापत्रक
पूर्ण अभ्यासक्रम विविध भागांत विभाजित
परीक्षांच्या वेळी Exam Spceial हे खास एपिसोडस्
वार्षिक केवळ ११९०/- रुपयांत टी. व्ही. आणि
वेबसाईटची सुविधा उपलब्ध