Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

काळानुसार आपल्या समाजात जे अनेक बदल झाले, त्यापैकी एक म्हणजे कुटुंबव्यवस्थेतील बदल. नोकरी आणि प्रायवसी या दोन्ही कारणांमुळे पूर्वीची ‘जॉइंट फॅमिली’ची संकल्पना बदलून त्यांची जागा ‘न्यूक्लिअर फॅमिली’ने घेतली. पण अनेकदा असं म्हटलं जातं किंवा अनुभवास येतं की, या छोटय़ा कुटुंबात मुलांना आपली माणसं कमी वेळा भेटतात. आई- बाबा दोघंही नोकरीवर असल्याने मुलं एकटी पडतात असं म्हटलं जातं. पण पूर्वी जेव्हा घरात कडक वातावरण असे तेव्हा एकत्र राहूनही मुलांची कुचंबणा होत नसेल का हा प्रश्न उपस्थित होतोच. या प्रश्नावर झेवियर्स कॉलेजच्या पत्रकारितेच्या नेहा चावरे, विवेक भोर, दीपिका विश्वासराव, दर्शना दिवाडकर, मयुरेश गणपते आणि रोहन टिल्लू या विद्यार्थ्यांनी व्हिवाच्या कट्ट्य़ावर चर्चा केली..
रोहन: न्यूक्लिअर फॅमिली हा सध्याचा ट्रेण्ड आहे वगैरे म्हणता येणार नाही. पण असं एकत्र रहाणं आता प्रॅक्टिकली शक्य नाही.

 

घरापासूनच प्रश्न सुरु होतो. एवढं मोठं घर आताच्या काळात कोणी बांधू शकेल का? आई, बाबा, भाऊ, त्यांच्या बायका, मुलं सगळेजण एका घरात राहू शकतील एवढं मोठं घर. फ्लॅट या संकल्पनेत या प्रकाराला जागाच नाही.
दीपिका: पण जर एकमेकांचा इंटरफिअरन्स नसेल तर असं एकत्र राहण्यात काय प्रॉब्लेम आहे?
मयुरेश: हं. तशी स्पेस देणार असाल तर ठीक. पण जेवढी माणसं एकत्र राहणार तेवढेच वेगवेगळे विचार, सवयी हे सुद्धा आलंच ना!
नेहा: बरोबर. शिवाय मुंबईसारख्या शहरात वैयक्तिक प्रगतीला महत्त्व आहे, त्यामुळे न्यूिक्लअर फॅमिली गरजेची आहे.
दीपिका: दोघंच असेपर्यंत ठीक. मुलं झाल्यावर काय? मग पर्याय उरतो बेबी सिटींगचा. पण मला तो विश्वासार्ह नाही वाटत. एकत्र रहाण्यालाच मी पसंती देईन.
दर्शना: मलाही वाटतं जॉइंट फॅमिली हवी. एकमेकांना समजून घेता येतं.
नेहा: पण आता बघना. आपल्या पिढीतील अनेक तरुणांचा कल वैयक्तिक स्वातंत्र्याकडे असतो. सो ते न्यूक्लिअर फॅमिलीच प्रिफर करतात.
रोहित: हो मलाही ते महत्त्वाचं वाटतं. अनेकदा असंही होतं की मुलांना सांभाळायला कोणी नाही म्हणून मग नवरा-बायको आणि आई-बाबा एकत्र रहायला तयार होतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशी तडजोड म्हणून जॉईंट फॅमिलीचा पर्याय नको. अनेकजण असं करतात की लग्नानंतर दोन-तीन वर्ष दोघंच राहतात आणि मुलं झाली की मग आई-बाबांना आपल्याकडे राहायला बोलवतात.
मयुरेश: आजी-आजोबांचं मुलांवर प्रेम असतं. शेवटी ते रक्ताचं नातं असतं. पाळणाघरात ठेवलं, तिथे कितीही काळजी घेणारे असले तरी पैसे देणार म्हणजे प्रोफेशनॅलिझम आलंच. आपली माणसं जशी काळजी घेतात, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीही नाही.
नेहा: हो. बरोबर आहे. एक तर पाळणाघरात बाकीची मुलंही असतात, त्यामुळे प्रत्येक मुलाकडे किती लक्ष दिलं जाईल याची काही शाश्वती नाही.
दीपिका : पण त्याचबरोबर आई-बाबांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सगळी जबाबदारी आजी-आजोबांवर टाकून चालणार नाही. त्यांनाही त्यांचं आयुष्य जगता आलं पाहिजे. नाहीतर सध्या आपली जॉबची टायमिंग्ज अशी असतात की, रात्री उशीरा आलेले पालक खूप दमलेले असतात. त्यांना वाटत असतं की मुलांना खूप वेळ द्यावा पण नोकरी पुढे कोणाचं चालत नाही.
रोहित: मला नाही वाटत की कोणी तरुण पालक आपल्या मुलांचं इतकं बर्डन आपल्या पालकांवर टाकत असतील. पण कसं असतं की घरात कोणी तरी आहे हीच भावना महत्त्वाची असते. स्वावलंबी होणं ही आजच्या काळाची गरज असली तरी एकटेपणा जाणवतोच.
रोहन: स्वावलंबन ही आजची गरज असली तरी त्यातून मुलं बेफिकीर होण्याचा संबंध असतो.
मयुरेश: हो बरोबर आहे.. शाळा, कॉलेज किंवा मैदानातून खेळून घरी आलं की दार उघडणारं कोणीतरी हवं असतं.
नेहा: हं.. रोज तर कोणी तरी हवंच असतं, पण हल्ली तर नातेवाईक सणाच्या दिवशीही भेटत नाहीत. म्हणजे भेटतात. पण खूप क्षेत्र अशी आहेत की, जिथे रजा मिळत नाही किंवा मिळाली तरी केव्हा कॅन्सल होईल याचा नेम नसतो. एकत्रच रहात असलो तर बरं ना!
दीपिका: हो मस्त कल्पना आहे..
रोहन: त्यातूनच हल्ली अनेकजण काय करतात माहितेय ना.. बाजूचाच फ्लॅट घेऊन राहतात, पण अर्थात प्रत्येकालाच हे शक्य होत नाही..
दीपिका: आणि आपण म्हणतो, आपली पिढी मॉडर्न.. म्हणजे आहोतच आपण. पण आपल्या आधीच्या पिढीतल्या आपल्या आईबाबांनाही याबाबतीत किती सहजपणे परिस्थिती अ‍ॅक्सेप्ट केली आहे. त्यांचा असा अट्टाहास नसतो, की आपल्या मुलाने आपल्याबरोबरच रहावं. अनेकजण तर सुनेला देखील विचारतात की एकत्र रहायचं की वेगळं, त्यांचा काही आग्रह नसतो.
रोहन: हो, पण मुलं आणि तरुण पालकांचे आई-बाबा यांच्यात मात्र अनेक घरात खटके उडतात. खास करुन नातू किंवा नात मोठी होत असताना. पण ते तर चालायचच असं मला वाटतं. सो इट्स ओके
मयुरेश: हो अनेकदा ही वयस्कर मंडळी पर्सनल बाबींना, म्हणजे कपडे, स्टाईल, पार्टी, रात्री उशीरा घरी येणं याला आक्षेप घेतात, आणि तो मुलांना खटकतो.
दीपिका: पण अशीही अनेक उदाहरणं आहेत की जिथे ही वयस्कर माणसं समजून घेतात, काही बोलत नाहीत.
रोहन: हो असतात ना.. पण बहुतेक घरात खटके उडतातच. होतं काय की हे आजी-आजोबा त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतात, आणि आपण आपल्या दृष्टीने.
नेहा: मग अशा वेळी मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न नको का करायला? थोडं त्यांच्या कलाने घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे वाद नाही घालायचा, पण शांत राहून आपल्याला जे हवं ते करायचं. निदान घरातील वातावरण तरी शांत राहील.
मयुरेश: मला तर आवडतो वाद घालायला.
नेहा: अरे पण थोडा समजुतदारपण दाखवावा ना..
मयुरेश: पण आपल्या जनरेशनला ते शक्य नाही.
रोहित: तेच.. आधी म्हणजे कसं मुलाला वडिलांजवळ बोलायला भीती वाटायची आता तसं होत नाही.
नेहा: हो. हे मात्र छोटय़ा कुटुंबामुळेच शक्य झालंय. बाप आणि मुलं जवळ आलेत. एकमेकांचे मित्र झालेत.
दीपिका: येस.. मुलं ही आपली जबाबदारी नाही, या विचारांतून आधुनिक बाबांची नक्कीच सुटका झाली आहे. आणि हाच बॅलन्स आपली आजच्या काळाची गरज आहे.. ’