Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती


‘हॅलो, कंडय़ा!’
‘हं बोल टल्ली!’
‘काल रात्री फोन का बंद ठेवला होतास?’
‘अरे, सारेगमप बघ म्हणून आई-बाबा खूप मागे लागले. ते बघत बसलो होतो ना!’
‘सारेगमपचा आणि मोबाईलचा काय संबंध?’
‘प्रोग्राम चालू असताना माझे सारखे फोन येणार. मग मी उठणार, म्हणून बाबांनी माझा फोनच बंद करून ठेवला होता. जाम बोअर

 

झालो होतो मी. ती मुलं गाणी म्हणतात ती मला माहितीच नव्हती. आई-बाबांच्या वेळची जुनी गाणी. त्यांना माहीत होती. त्यांना ती गाणी आवडतात. मला नाहीत. तरी मला जबरदस्तीने टी.व्ही.समोर बसवलं.’
‘आमच्याकडंही तेच असतं. आई भुंगा लावते, सारेगमप बघ म्हणून. मला त्यावेळी कॉम्प्युटर गेम खेळायचा असतो. बाबा काही बोलत नाहीत. पण आई ऐकतच नाही.’
‘मी संध्याकाळी ड्रॅगन बोल्झी लावलं की, आई टी.व्ही.च बंद करते. एवढा घोडा झाला तरी कार्टून काय बघतोस म्हणते. संध्याकाळी मैदानावर खेळायला जा असं सारखं सगळे सांगत असतात. यांना काय करायचंय आपण कार्टून बघू नाहीतर दुसरं काहीतरी बघू!’
‘बरं चल, आज कॉलेजला येणार आहेस का?’
‘नाही, आज दांडी मारणारंय.’
‘घरचे काही बोलत नाहीत का दांडी मारल्यावर?’
‘घरात असतं कोण! आई-बाबा सकाळी नऊलाच ऑफिससाठी निघतात. दादाचं कॉलेज सकाळी आठला असतं.’
‘बरं आहे राव तुझं! आमची आई घरीच असते. दांडी मारली की, ती जाम पिळते. लेक्चरच चालू करते. तुझ्यासाठी बाबांनी एवढी फी भरलीय, क्लास लावलेत. असलं डोकं सणकतं ना!’
‘आमच्याकडेही तेच असतं. तू दांडी मारल्यावर तरी आई बोलते. आमच्याकडं दररोज संध्याकाळी आई आणि बाबामहाराज दोघांचं प्रवचन असतं. त्यांचा आग्रह होता म्हणून मी सायन्सला गेलो. पण सिलॅबस झेपत नाही आपल्याला, खरं सांगतो!’
‘ओ, शीट .. माझा मोबाईल गंडला वाटतं, नंतर बोलू’
ँ ऌ ँ
‘वरुण, तुझा फोन आहे.’
‘कोण आहे गं?’
‘मैत्रीण आहे कुणीतरी. नाव नाही सांगितलं.’
‘हॅलोऽऽ’
‘हॅलो, मी नेहा बोलतेय.’
‘बोल.’
‘तुझ्याकडं मोबाईल नाही ना, म्हणून घरी फोन केला. काय करतो आहेस?’
‘चेतन भगतचं फाईव्ह पॉईंट समवन वाचतोय.’
‘कसं आहे रे?’
‘आत्ता तर सुरुवात केलीय.’
‘विकत आणलंस?’
‘नाही गं, ताईच्या लायब्ररीतून.’
‘माझे आई-बाबा चेतन भगतचं नुस्तं नाव काढलं तरी आरडाओरडा करतात. स्वामी, ययाती वाच म्हणतात. नाहीतर पु.लं.ची पुस्तकं आणतात लायब्ररीतून. मला नाही आवडत ती मराठी पुस्तकं.’
‘आमच्याकडंही तेच असतं. बाबांचं अख्खं कपाट भरलंय पुस्तकांनी. कुठली जुनी- पुराणी, जाडजूड पुस्तकं आहेत. मला कंटाळा येतो ती वाचायला.’
‘आई-बाबांचं काही कळत नाही. मी एकदा खूप चिडले त्यांच्या लेक्चरबाजीला. ‘तुमची मतं माझ्यावर का लादता? मला नाही आवडत मराठी पुस्तकं..’ असं म्हटल्यावर काही बोलले नाहीत. पण अधूनमधून टाँटिंग करत असतात.’
‘आमच्याकडंही तेच असतं. काका, मावशी असले रिलेटिव्ह किंवा बाबांचे मित्र, आईच्या मैत्रिणी आल्या की, हाच विषय असतो. वाचन, टी.व्ही., कॉम्प्युटर! या लोकांना दुसरं काम नसतं का? स्वामी, ययाती वाचून, जुनी गाणी ऐकून हे कुठं प्राईम मिनिस्टर झालेत! नोकरीच करतात ना!’
‘ए, असं का बोलतो रे?’
‘तू माझ्या जागी असतीस ना हेच बोलली असती.’
‘तुझे आईबाबा खरंच ग्रेट आहेत. तुला अजून मोबाईल घेऊन दिला नाही? आपल्या क्लासमध्ये फक्त तुझ्याकडंच मोबाईल नाहीये.’
‘मी मागणंच सोडून दिलंय. आईबाबा म्हणतात, आम्ही कमवायचं आणि तुम्ही मोबाईलवर उधळायचं. आमच्यावेळी असं नव्हतं. अशी सुरुवात झाली की, अर्धा तास लेक्चर थांबत नाही.’
‘आमचे आई-बाबा सेम असंच बोलतात रे!’
‘बरं चल, फोन ठेवतो. आमच्या आईला फोन करायचाय वाटतं. तिकडून हातवारे करतेय.’
ँ ऌ ँ
‘हॅलो चिनी!’
‘बोल रे मनी.’
‘कुठं आहेस?’
‘जिममध्ये चाललोय.’
‘पण तू खालकर तालमीत जात होतास ना?’
‘अरे, आमचे बाबाच मागं लागले. जिममध्ये जा म्हणून. माझी फीही परस्पर भरून टाकली.’
‘किती फी असती रे जिमची?’
‘वर्षांचे आठ-नऊ हजार काहीतरी आहेत. बाबांनी वर्षभराचे पैसे एकदम भरून टाकलेत.’
‘पण तू तालमीत व्यायामच करत होतास ना? तू तालमीत गेल्यापासूनच तुझी बॉडी जाम सुधारलीय.’
‘मीही बाबांना तेच सांगितलं. पण ‘गजनी’ बघितल्यापासून त्यांच्या डोक्यात जिममध्येच व्यायाम होतो असं फिट बसलंय.’
‘तुझे बाबा भारीच आहेत. न मागता तुला मोबाईल दिला. बाईक दिली. दर महिन्याला नवे कपडे घेतात ते वेगळंच! आम्ही अजून सायकलवर हिंडतोय.’
‘मला बाईक नकोच होती. मी कॉलेज सोडलं तरी चुकूनही कुठे बाईक नेत नाही. त्याच्यावरून आई मला बोलत असते. एवढी गाडी आणली नवी, वापरायला नको?’
‘आमच्याकडं असं नसतं राव!’
‘आमचे डॅड मला मराठी पुस्तकं वाचूनच देत नाहीत. सिडने शेल्डन, जेम्स हॅडली असल्यांची पुस्तकं आणतात माझ्यासाठी. पण श्रीमान योगी वाचताना जो आनंद मिळतो ना तो शंभर इंग्रजी पुस्तके वाचली तरी येत नाही. हे आमच्या डॅडना सांगणार कोण.
चंद्रहास मिरासदार
cm.dedhakka@gmail.com