Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

कलर लॅपटॉप
फॅशन करायला कोणाला आवडत नाही. आपलं दिसणं, आपल्याकडच्या वस्तू इतरांपेक्षा जरा हटके असाव्यात अशी इच्छा सगळेच जण बाळगून असतात. सध्याच्या टेक्नो सॅव्ही जगात तर आपले गॅजेट्स सुंदर आणि फॅशनेबल असावेत याकडेही तरुणांचा कल असतो.
हीच गरज ओळखून सोनीने खास मुलींसाठी कलर लॅपटॉप्स आणले आहेत. तरुण मुलीं या मुलांपेक्षा फॅशनच्या बाबतीत जास्त जागरुक असल्यानेच सोनीने त्यांच्यासाठी हे उत्पादन बाजारात आणलं आहे. २ल्ल८ श्अकड२ हे ते नवीन लॅपटॉप्स आहेत. ब्राईट कलर्स, कमी वजन व एखाद्या वहीच्या आकाराचे हे लॅपटॉप्स कोणालाही आवडतील असेच आहेत. या छोटय़ा आकारामु़ळे हे लॅपटॉप्स तरुणींच्या खांद्यावर शोभून दिसणाऱ्या तितक्याच फॅशनेवर पर्समध्ये आरामात मावू शकतात. कलरफूल आणि स्टायलीश लूक मुळे काम व आनंद या दोन्हींची सांगड घालण्याचाच प्रयत्न सोनीने केला आहे. खास मुलींसाठी म्हणून

 

बनवलेले हे लॅपटॉप्स असले तरी तरुण मुलांना आवडतील असेही रंग यात आहेत. छएऊ किंवा छउऊ या फिचरमुळे लॅपटॉपमधील ऊर्जा बचत होण्यास मदत होते. कार्बन फायबर बॉडीमुळे लॅपटॉपचं वजन कमी राखण्यास मदत होते. फुल हाय डेफीनेशन किंवा ब्ल्यू रे, डॉल्बी साऊंड रुम टेक्नॉलॉजी हे सुद्धा या लॅपटॉपची काही वैशिष्टय़े आहेत.

दिगंबर चिचकर यांचे चित्रप्रदर्शन
भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा आणि जीवनशैली दर्शविणाऱ्या चित्रकार दिगंबर चिचकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन नेहरु सेंटर कला दालनात सुरु झाले असून २३ फेब्रुवारी पर्यंत ते रसिकांसाठी खुले राहणार आहे. साधे, सरळ, सुलभ जीवनमान परंतु अथांग विचारांची पाश्र्वभूमी प्रसंग रुपाने चित्रकाराने मांडले आहेत. भारतीय संस्कृतीतचे प्रकटीकरण करणाऱ्या चित्रातील मानवाकृतींना चेहरे नसले तरी प्रत्येक मनातील खळबळ, आनंद, सुख-दु:ख, राग, लोभ या चित्रांतून जाणवतात. हे प्रदर्शन सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत खुले आहे.