Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

मोठय़ा वयाचा पुरुष किंवा स्त्री आणि त्याच्या किंवा तिच्या प्रेमात पडलेली अधेड वयातील तरुण-तरुणी यांच्या प्रेमकहाण्या अनेक होऊन गेल्या. या विषयावर अनेक चित्रपट निघाले. ते सगळे चाललेही. अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे चार्ल्स शोभराज आणि निहिता बिश्वास यांची.
आताच्या तरुण पिढीला चार्ल्स शोभराज कोण हे माहिती असणार नाही. पण त्यांच्या आई-वडिलांना मात्र हे नाव लगेच आठवेल. कारण चार्ल्स शोभराज म्हणजे एकेकाळचा ‘बिकिनी किलर.’ तरुण, देखण्या बायकांना नादी लावायचं आणि मग त्यांचा खून करायचा, याबद्दल तो सध्या नेपाळच्या तुरुंगात सजा भोगतो आहे आणि वय वर्ष फक्त ६४. आता याच वयातल्या अमिताभच्या प्रेमात पडली २० वर्षांची जिया खान आणि या दोघांच्या रोमान्सने रंगलेला ‘नि:शब्द’ हा चित्रपट तरुणाईनं डोक्यावर घेतला. अमिताभलाही ‘या’ वयात फाकडू आणि ‘हॉट’ जिया खानबरोबर प्रेम करण्याची चांगली संधी मिळाली. म्हणजे ‘कथेची मागणी’ म्हणून हो! नाहीतर आपल्या वयाला साजेलसे चित्रपट करायचे सोडून तो कशाला या वाटेला गेला असता? या कलावंत मंडळींचं बरं असतं नाही! करावसं वाटतं ते सगळं करून घ्यायचं. म्हणजे प्रेमं करायची, उघडं वाघडं

 

फिरायचं, चुंबनं घ्यायची आणि वर ‘कथेची मागणी’ असं म्हणून हात वर करायचे. तर असो. त्याबद्दल परत कधी तरी.. ‘अधेड उम्र’वाली बालिका आणि ‘उम्र का लिहाज’ न रखनेवाला पुरुष यांच्या प्रेमकहाण्यांमध्ये भर पडली आहे चार्ल्स शोभराज आणि निहिता बिश्वास यांची.
चार्ल्स शोभराजविषयी तर सांगितलं तुम्हाला. मग निहिता बिश्वास कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही निहिता बिश्वास म्हणजे २० वर्षांची स्मार्ट, स्टायलिश, हुशार अशी मुलगी आहे तिच्या मते ती आणि चार्ल्स हे ‘मेड फॉर इच अदर’ असून त्यांचं ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ आहे. पण पाहताक्षणी प्रेमात पडायला हे दोघं भेटले कुठे? असा प्रश्न तुमच्या मनात येईल. कोणाच्याही येईल. माझ्याही मनात आला. तर ते भेटले तुरुंगात. म्हणजे त्याच्याप्रमाणेच हीही बयाबाई तुरुंगाची हवा खातेय का काय? असंच वाटलं ना तुम्हाला! तर नाही. त्याच्याप्रमाणे ती गुन्हेगार नाही. म्हणजेच तुरुंगातही नाही. तर ती चांगलं दुभाष्याचं काम करते. म्हणजे चार्ल्स महाशय फ्रेंच. त्याचा वकीलही फ्रेंच. पण चार्ल्स आहे नेपाळच्या तुरुंगात. त्यामुळे त्याला आणि त्याच्या वकिलाला दुभाष्याची गरज होती. ती जबाबदारी निहितानं स्वीकारली. या निमित्तानं भेटीगाठी सुरू झाल्या आणि हे दोघं चक्क प्रेमातच पडले. निहिताला त्यांच्या वयातल्या अंतराचा अडसर वाटत नाही. कारण तिच्या मते तो ‘यंग अ‍ॅट हार्ट’ आहे. जगाच्या दृष्टीनं तो ‘सिरियल किलर’ असेल पण तिच्यासाठी तो ‘क्रेझी लव्हर’ आहे. प्रेम आंधळं असतं म्हणतात ते काही खोटं नाही. नेपाळी आई आणि बंगाली पिता यांचं हे कन्यारत्न चार्ल्स शोभराजच्या प्रेमात आकंठ बुडालेलं आहे. त्याच्याशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही, दिसत नाही. आई-वडिलांच्या विरोधाला तर तिनं केव्हाच नजरेआड केलं आहे, पण त्यांच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या समाजालाही भीक घालायची नाही, हे तिनं मनोमन ठरवून टाकलंय. त्यामुळे वाटेल ते एसएमएस, अ‍ॅब्युझिव्ह फोन कॉल्स, तिच्यावर होणारे हल्ले, हे सगळं ती प्रेमापायी सहन करते आहे.
निहिताची आई वकील असून तिनं चार्ल्स शोभराजचं वकीलपत्र घेतलं आहे आणि लाडक्या लेकीच्या कुंकवाच्या धन्यासाठी तीही जीव तोडून प्रयत्न करत आहे. धन्य ती माता आणि धन्य ती कन्या.
निहिता रोज त्याच्यासाठी डबापण घेऊन जाते. कारण त्याला घरचं, चांगलं चुंगलं खायला मिळावं. तुरुंगाधिकाऱ्यांनीही तिला तशी परमिशन दिली आहे. त्यांच्या प्रेमापुढं तुरुंगाधिकाऱ्यांचंही कठोर मन द्रवलं असावं. केवढी ही त्यांच्या प्रेमाची महती सांगावी. असे हे अनोखे प्रेमवीर सध्या तरी लग्नाच्या बंधनात जाण्याची स्वप्नं बघताहेत. बघू. लग्नाची तारीख कळली की, कळवेनच मी तुम्हाला. मग या अक्षता टाकायला.
लव्हली गर्ल