Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

सप्रेम नमस्कार,
पत्र लिहिण्यास कारणच तसे आहे. अगदी तातडीने त्याचे उत्तर द्यावे ही विनंती. तुमच्या घरात राहत असूनही आम्हाला हे पत्र स्वखर्चाने टाकावे लागत आहे, याचे अत्यंत वाईट वाटते. असो.
तुमच्या घरात सध्यापर्यंत आमचे नातेवाईक तुमच्या नकळत का होईना तुमचेच अन्न खाऊन जगत होते. ही चोरी लपली नाही. पण ते चोर नसून आमचे नातेवाईक आहेत. तुम्हा सर्व सुखी कुटुंबांना पत्र पाठवायला मात्र खूप खर्च आला. तरी या पत्राचे गांभीर्य तुम्ही समजून घ्यावे.
तुम्ही घरात हल्ली रात्री ‘गुड नाईट’, संध्याकाळी ‘धूप’ यासारख्या अपायकारक धूर साधनांचा वापर जास्तच करीत आहात. शिवाय दारातसुद्धा एक उद्बत्ती लावून NO ENTRY केल्यामुळे आमचे प्रिय बंधू डास व त्यांचे ज्येष्ठ-श्रेष्ठ कीटक, तुमच्याच घराजवळच्या नाल्यावर पोसलेले मच्छर यांची मोठी पंचाईत झाली आहे. मान्य की ते तुमचे रक्त पितात व त्यामुळे तुम्ही आजारी पडता. परंतु तुमच्या एका नेत्याचे बोल लक्षात ठेवून त्यांनी ही रक्त पद्धती आजमावली. ती म्हणजे- ‘तुम मुझे खून दो। मै तुम्हे आजादी दूंगा।।’ त्यांना डोक्यावर घेणारे तुम्ही आमच्या बंधूचे मात्र हाल हाल केलेत.
प्रिय भगिनी मुंगी ताईंनीही तक्रार केली आहे की, हल्ली लक्ष्मणरेखा मारल्यामुळे लाल मुंग्या येऊ शकत नाहीत. त्यामुळे काळ्या मुंग्यांना खेळायला व भांडायला कोणी नसते. तसेच काळ्या मुंग्यांची तोंडं बघून व तीच तीच चव घेऊन झुरळे व पाली यांना वीट आला आहे. झुरळे व पाली यांनीही उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.
आमची प्रिय मैत्रीण ‘वाळवी’ ही तुमचे सद्भाग्य म्हणून तुमच्या घरी आली तर तिला दारातूनच परतवून लावल्याचे वृत्त आमच्या बातमीदाराने कालच दिले. तिला जुन्या लाकडी वस्तू, फाटकी, तुटकी पुस्तके चालली असती. तुमचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलला
 

तरी आमच्या प्राण्या किटकात एकच पुस्तक रोजसुद्धा चालते. ‘उदरभरण’ हा एकच हेतू डोळ्यापुढे ठेवून वाळवीताईची मुलगी लहान असल्याने तिला पुस्तके खाणे, लाकडी वस्तू पोखरणे यासंबंधी शिकवणे गरजेचे आहे. नाही तर उद्या तुमच्यासारखे अन्न खायची, असो.
पण आमच्या लाडक्या सर्वात छोटय़ा खोडकिडय़ांनी व पाकोळीने तुमचे मूठभर तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी इ. अन्नपदार्थ खाल्ले तर तुम्ही ते धान्य लगेच कडकडीत उन्हात टाकून त्यांना जाळण्याचा निर्दयी प्रयत्न मनुष्यप्राण्याने केला. ही तर अमानुषपणाची उंचीच गाठलीत. एक दिवस जरा कुठे ब्रेड उघडय़ावर राहिला व त्याला बुरशी चढली तर बाकीचे ब्रेड फ्रीजमध्ये टाकलेत. बिचारी बुरशी! तीही तुमच्या सुखी कुटुंबावर नाराज आहे.
तुमच्या स्वच्छतेला काही मर्यादा? तीही सीमा पार करून तुम्ही तर आमच्याशी असहकार पुकारलात. रोज वरून खालपर्यंत घर झाडून फरशी पुसून इतकं साफ करता की बिचारे कोळी तर सोडाच, पण अमिबासुद्धा आढळत नाही. हे आमच्या VIDEO CAMERA मधून सुटलं नाही. तुम्ही तर भूतदया विसरून गेलात. भूतदया विसरलात तरी चालेल, कारण भुतांना भूक लागत नाही, पण प्राणीदया, पशुपक्षी दया विसरू नका.
आमच्या चिमणी-कावळ्याने म्हणजेच ताई-दादांनी तुमच्या घरात घरटी बांधण्याचे सोडाच, पण साधे आलेलेही चालत नाही, हे बरे नव्हे. तसेच उंदीर, घुशींचे वास्तव्य असले की चोरीची जास्त भीती राहत नाही. रात्री-अपरात्री ही खुडखुड करून ते तुम्हाला जागे ठेवतात. एक वेळ गुरखा झोपेल, पण उंदू दीदी व घुसू दीदी झोपणार नाहीत आणि झोपूही देणार नाहीत. अगदीच वाटलं तर वेळप्रसंगी पायाला कडकडून चावा घेऊन रक्तही काढतील,
तुम्ही अभयारण्य काढून प्राण्यांना अभय दिलेत, परंतु आम्हाला घरात आश्रय द्यायला तुमचं मन का छोटं होतं? आम्ही तर त्यांच्यापेक्षा आकाराने, उपद्रवाने लहान असून तुमच्या खूप उपयोगी पडतो. आमच्या बाबतीतच कसे बरे तुम्ही कृतघ्न होता? सध्या आम्हीही Anty-Humanality vementl सुरू केली आहे. याचे leader महात्मा मच्छर व त्यांना Dr. Ant , Mr. Rat यांनी मदत करण्याचे ठरविले आहे.तसेच शहीद झालेल्यांना ‘मरणरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. बुरशीने वाव मिळेल तिथे घुसून खारीचा वाटा उचलला आहे. मांजरीने नुसते दूध-ताकावर ताव मारण्याचे ठरविले आहे व कुत्र्यानेही रात्री डाराडूर झोपण्याचे ठरवले आहे आणि या चळवळीत सिंहाचा वाटा सर्वाची प्रमुख या नात्याने मी घेतलेला आहे व वारा मला प्रत्येक घरात जायला खूप मदत करेल असे वचन त्याने मला दिले आहे.
तर तुम्ही सुखी-कुटुंबाने सावध राहावे. तिसऱ्या महायुद्धापेक्षा खूप भयानक हल्ला आपल्यावर होणार आहे व हा हल्ला नको असेल तर त्वरित तार करून किंवा वाऱ्याबरोबर रटर पाठवून आम्हालाो१ी एल्ल३१८ करा. ही धमकीवजा समजवणूक तुम्हाला मी करीत आहे. शेवटी तुमची इच्छा.
- तुमचीच जन्मा जन्मांतरीची अप्रिय
धूळ
उत्तरा ठोसर

मी विवाहित असूनही माझ्या स्वप्नात ऐश्वर्या राय येते. तुमच्याकडे पाठवून देऊ का?
- राजूकाका हडकुळे, कुर्डूवाडी

सध्या माझ्याकडे खूप गर्दी आहे. रांगेत उभं रहायची तयारी असेल तरच पाठवा!
सापाला ऐकू येतं का?
- जय नार्वेकर

तुम्हीच सांगा.
स्वच्छतागृह अस्वच्छ का असतं?
- आसिफ यु. कुरणे

अहो, स्वच्छतागृह आल्हाददायक असेल तर माणसं तिथंच रेंगाळतील मग..
लग्न लागताच उंच नवरदेवालाही का उचलतात?
- श्रीपाद कुलकर्णी, पुणे

पुढे आयुष्यभर आज्ञाधारकपणेच बसावं लागतं.
पुरुषांपेक्षा महिलांची स्मरणशक्ती चांगली असते. कारण काय?
- शतावरी लेले, पुणे

तीचतिच घटना पुन्हा पुन्हा सांगत राहिल्याने महिलांचे स्मरण पक्के होते.
नवे गृहमंत्री म्हणून तुम्हाला जयंत पाटील यांच्याबद्दल काय वाटतं?
- प्रदीप पाटोळे, सांगली

अर्थमंत्री असल्यापासून मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ‘जयंत ’ अंडरगार्मेंटच्या निर्मितीद्वारे राज्यातील जनतेची लाज राखण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे, त्याबद्दल धन्यवाद द्यावेसे वाटतात.
मी आयटी क्षेत्रात नोकरीला असून मार्च महिना जवळ आला की इन्कम टॅक्स भरताना जिकिरीचे होते. काही उपाय सांगाल का..
- अश्वगंधा राऊत, हिंजवडी

आपण स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यास या त्रसातून कायमची सुटका होऊ शकते.
मला सतत सर्दीचा त्रास होतो. अनेक उपाय करूनही बरे वाटत नाही. उपाय सांगा?
- श्वेता जांभळे, औरंगाबाद

सर्दीच्या बाबतीत उजव्या नाकपुडीची व डाव्या नाकपुडीची असे दोन प्रकार आहेत. आपण आपल्या नाकाचा फोटो पाठवल्यास नेमका उपाय सांगता येईल.

बादशाह आणि बिरबल चौरस खेळत बसले होते. गप्पांचा विषय वळत वळत खोटं बोलण्यावर आला. बादशहा म्हणाला, झूठबद्दल मला नफरत आहे. कितीही मोठं नुकसान होणार असेल किंवा कितीही जवळची व्यक्ती दुखावणार असेल तरी सत्याची कास सोडू नये. बिरबल म्हणाला, ‘कधी-कधी खोटं बोलावं लागतं’ ते मानायला बादशहा तयार होईना. तेवढय़ात शाही सुवर्ण कारागीर दागिने घेऊन आला. धाकटय़ा बेगमच्या माहेरी लग्न होतं त्यासाठी हे दागिने करायला टाकले होते. धाकटी बेगम अत्यंत तापट स्वभावाची होती. दागिने हाताळताना बादशहाच्या हातून एका कर्णफुलाची तार तुटली. कारागिराकडे ते दागिने परत पाठविण्याएवढा वेळ नव्हता. बादशहाने ते दागिने तसेच बेगमकडे पाठवून दिले. बेगम माहेरी लग्नासाठी गेली आणि तिनं अलंकाराचा डबा उघडला तर कर्णफुलाची तार तुटलेली होती. बेगमनं बादशहाला निरोप पाठविला, ‘‘हे दागिने घडविणाऱ्या कारागिराला जोवर फाशी दिलं जाणार नाही, तोवर मी माहेरी परतणार नाही.’’ बादशहानं बेगमला लगेच निरोप पाठविला आणि ती तार आपल्याच हातानं तुटली होती, असा खुलासा केला. त्यावर बेगमनं लेखी निरोप धाडला, ‘‘एका क्षुल्लक कारागिराला वाचविण्यासाठी खाविंदानंी झूठचा आश्रय घ्यावा हे काही शोभणारं नाही.’’ बादशहा हवालदील झाला. बेगमला समजावणं कठीण होतं आणि एका माणसाचा नाहक बळी घेणं तर त्याला अजिबातच मान्य नव्हतं. अखेर त्यानं बिरबलावरच सगळं सोपविलं आणि म्हणाला, ‘सत्य सांगून काही उपयोग होत नाही, तूच सांग आता काय करू?’ बिरबल म्हणाला, ‘झूठचा आसरा घ्या.’ बादशहा जरा अनिच्छेनंच राजी झाला आणि म्हणाला, ‘सांग काय करू!’ ‘बेगमला निरोप पाठवून द्या, कारागिराला फाशी दिलं, आता परत नांदायला या!’ बादशहानं बिरबलावर विसंबून असत्याची कास धरली. बेगम राजधानीत परतली आणि सरळ त्या कारागिराच्या घरी पालखीचा मोर्चा वळवला. बिरबलाला हे अपेक्षितच होतं म्हणून तो बादशहाला घेऊन लगबगीनं तिकडे गेला. बेगम तिथे पोहोचली तर कारागीर जिवंत होता. त्याला पाहून बेगमनं बादशहाकडे रागाचा कटाक्ष टाकला. बिरबल म्हणाला, ‘‘राणी सरकार, आपला गैरसमज होतो आहे. हा तो कारागीर नसून त्याचा जुळा भाऊ आहे.’’ बादशहानं चमकून बिरबलाकडे पाहिलं व मनातल्या मनात म्हणाला, ‘झूठ!’ बेगमचा पारा जरा खाली येत होता, तोच घरातून कारागिराची बायको बाहेर आली. तिच्या कपाळावर कुंकू पाहून बेगमनं बिरबलाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. बिरबल म्हणाला, ‘‘लग्नानंतर वर्षभरात पतीचं निधन झालं आणि त्याचा धाकटा भाऊ अविवाहित असेल तर २४ तासाच्या आत विधवेचं लग्न लावण्याची प्रथा आहे यांच्यात.’’ बादशहा मनात म्हणाला, ‘अरे लेका, किती खोटं बोलशिल?’ बेगम पालखीत बसून निघून गेली. कारागीर बिरबलाच्या पाया पडला आणि बादशहानं बिरबलाचं म्हणणं मान्य केलं, ‘तू जगातला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहेस’ बिरबल म्हणाला, ‘खाविंद तुम्ही आता झूठ बोलण्यात चांगलेच तरबेज झालात की!’ यावर बादशहानं नेहमीप्रमाणं त्याला मिठीत घेतलं!

शहरातील मोठय़ा मार्केटच्या मधोमध असलेल्या एका दवाखान्यावर एक बोर्ड लावला होता- ‘येथे केवळ मेडिकल सर्टिफिकेटस दिली जातात, रोग्याच्या इलाजाबाबत विचारून आपला व आमचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नका.’
- अशोक परब, ठाणे

संता आणि बंताला रस्त्याने चालताना तीन बॉम्ब सापडतात. ते बॉम्ब पोलिसात जमा करायला जातात. वाटेत संता बंताला म्हणतो, ‘यापैकी एक बॉम्ब फुटला तर?’ त्यावर बंता म्हणतो, ‘त्यात एवढा काय विचार करतोस? आपण पोलिसांना दोन बॉम्ब सापडले असंच सांगू.’
- रमा शशांक जोशी, अमरावती

शंकराचा एक भक्त एकाच पायावर उभा राहून एक वर्ष सतत एकच जप करत होता. शंकरा माझी लॉटरी लागू दे. शंकरा, माझी लॉटरी लागू दे. शंकरा, माझी लॉटरी लागू दे.. तेव्हा एका वर्षांनी शंकरजी प्रसन्न झाले व त्याला रागावून म्हणाले, मूर्खा, आधी लॉटरीचे तिकीट तर विकत घे!
- मुरलीधर बानखेडे, नांदुरा.

एक तरुण डॉक्टरांकडे जाऊन म्हणाला, डॉक्टर! असं थोडंसं समोरच्या बाजूला वाकून दोन्ही हात पुढे केले व मागे घेतले की माझ्या कमरेतून एकदम कळ येते.
डॉक्टर- पण मी म्हणतो, तुम्ही अशी हालचाल करताच कशाला?
तरुण- डॉक्टर! अहो अशी हालचाल केल्याशिवाय तुम्हाला तरी पँट घालता येईल काय?
- विजय वागळे, ठाणे.

‘अडीच रियाध’ दराने पेट्रोल मिळण्याचे शेवटचे ठिकाण असा बोर्ड वाचून एका टुरिस्टने अरबस्तानातील एका पंपावर दहा गॅलन पेट्रोल मोटारीच्या टाकीत भरून घेतले आणि पेट्रोलच्या किमतीचे पंचवीस रियाध देताना विचारले, ‘पुढील पंपावर पेट्रोलचा दर कसा गॅलन आहे?’
‘दोन रियाध’ पंपवाला शांतपणे उत्तरला.
- हरी हर्डीकर, ठाणे.

‘माझ्या मृत्यूची बातमी सगळ्यात प्रथम तू कुणास कळविणार?’ पतीने पत्नीस प्रश्न केला.
‘विमा कंपनीस.’ पत्नी सरळ उत्तरली.
- शब्बीर अहमद दाऊद, पुणे

शिक्षकाने मुलांना विचारले, ‘राजापेक्षा श्रेष्ठ कोण?’
एका लहान मुलाने उत्तर दिले ‘एक्का!’
- सदानंद बामणे, वांद्रे.

In south india there is a well known person by name, Mr. Jeppier , Chairman of one university and some more self financing colleges, always speaks in English. That college students have collected & published a book by name
"Jappier ' s Spoken English"
.... Njoy .............with his.......... ......English. ........... .......

Now , here are some classic English sentences from the great "Jappier ' s Spoken English"

# At the ground:
All of you stand in a straight circle.
There is no wind in the balloon.
The girl with the mirror please comes her....{Means: girl with spects please come here).

# To a boy , angrily:
I talk , he talk , why you middle middle talk?

# While punishing students:
You , rotate the ground four times...
You , go and understand the tree...
You three of you stand together separately.
Why are you late - say YES or NO .....(?)

# While addressing students about Dress Code: (he is very strict abt this )
Every body should wear dress to college
Boys no proplum
Girls are pig proplum . (pig=big)
Girls should wear only slawar no nitee.
Girls should not wear T sirt , U shirt , V shirt.. but if you want to wear ...... remove it when inside the campus and put it oout side the campus.

# Sir at his best:
Sir had once gone to a film with his wife. By chance , he happened to see one of our boys at the theatre , though the boy did no t see them.
So the next day at s school... (to that boy) - "Yesterday I saw you WITH MY WIFE at the Cinema Theatre"

# Sir at his best inside the Class room:
Open the doors of the window. Let the atmosphere come in.
Open the doors of the window. Let the Air Force come in.
Cut an apple into two halves - I will take the bigger half.
Shhh...Quiet , boys...the principal JUST PASSED AWAY in the corridor
You , meet me behind the class. (Meaning AFTER the class..)
This one is cool >> "Both of u three get out of the class."
Close the doors of the windows please. I have winter in my nose today...
Take Copper Wire of any metal especially of Silver.....
Take 5 cm wire of any length....

# Last but not the least some Jeppiar experiences ...
Once Sir had come late to a college function , by the time he reached , the function had begun , so he went to the dais , and said , sorry I am late , because on the way my car hit 2 muttons (Meaning goats).

#Atcollege day 2002:
"This college strict u the worry no .... U get good marks , I the happy , tomorrow u get good job , jpr the happy , tomorrow u marry I the enjoy"

#At college of engineering fresh years day 2003:
"No ragging this college. Anybody rag we arrest the police "
सानी नाईक
icehead_saanaee@yahoo.com

तत्त्वनिष्ठा, आत्मसन्मान, जनहिताची धोरणे यांचा अचानक एके दिवशी कळवळा आल्याने सत्तापदाचा व सत्तापार्टीचा त्याग करून काही काळ विरोधी पक्षात बसलेल्या, परंतु आता खुर्चीसाठी व्याकुळ झालेल्या राजकीय नेत्याचे सत्तेच्या खुर्चीला उद्देशून व्यक्त केलेले हे आर्त मनोगत. (महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्षमायाचना करून.)

ने मजसी ने परत सत्तापदाला
आसना प्राण तळमळला।।
दलनेत्याच्या चरणतला मज धूता
तू नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य पार्टी चल जाऊ
श्रेष्ठींची विविधता पाहू
मम पदलोभी हृद आशंकितही झाले,
परि तुवा वचन मज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन
पदी तया परत बसवीन
विश्वसलो या तव वचनी मी,
विपक्षानुभव योगे बनूनी मी,
मम अधिक शक्त उद्धरणी मी
येईन त्वरे कथूनी सोडिले तुजला
आसना प्राण तळमळला ।।१।।
जळाबाहेरी जळचराची जैशी
ही तडफड चालती तैशी
पदविरह कसा सतत साहू या पुढती
दशदिशा तमोमय होती
स्तुतिसुमने मी वाहियली या भावे
की तिने श्रेष्ठी तोषावे
निज उद्धरणी व्यय न जरी हो साचा
हा व्यर्थ भार निष्ठेचा
ती भूपूजने, अनावरणे रे
नवपत्रकारिका त्या ललना रे
ते हुजरे मुजरे ही आता रे
दिवा लाल मला हाय पारखा झाला
आसना प्राण तळमळला ।।२।।
दलनक्षत्रे बहुत इथे परि प्यारा
मज सत्तापार्टीचा तारा
आदर्श इथे भव्य परि मज भारी
सत्तेची शिडी ती प्यारी
तिजवीण नको तत्त्व मज प्रिय साचा
दलकार्यभार जरी तिज कृपेचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे
बहु कासावीस होते चित्ता रे
सागराची जशी सरितेला रे
तव मीलनाची ओढ लागली मजला
आसना प्राण तळमळला ।।३।।
या पदविहीना हससी निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा
सांप्रत जे सत्तासना भूषविती
एकनिष्ठ म्हणूनी का शिस्त, तत्त्वाशी
मम सबूरीला अबल म्हणून हिणवीसी
मज घोर यातना देशी
जरी शिस्तभंग कारवाई भयभीता रे
अबला न माझी ही प्रतीक्षा रे
कथिन हे लालू यादवासी आता रे
जो रात्रितुनी पदी स्थापितो भार्येला
आसना प्राण तळमळला ।।४।।
अनिल देशपांडे