Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

व्यापार -उद्योग

सोमाणी अ‍ॅक्वावेअरचा पश्चिम भारतात १२ स्टोअर्स सुरू करण्याचा संकल्प
व्यापार प्रतिनिधी: सिरॅमिक उद्योगात आघाडीवर असलेल्या सोमानी सिरॅमिक लि.च्या सॅनिटरीवेअर विभाग आकर्षक अ‍ॅक्वावेअर उत्पादनांसह पश्चिम आणि दक्षिणेकडील भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना जाहीर केली.

एलआयसीची ‘जीवनवर्षां’
व्यापार प्रतिनिधी: एलआयसीची नवीन योजना ‘जीवनवर्षां’ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणारी, सुनिषित वाढीची मनी बॅक योजना आहे. सदर योजना विमाधारकाच्या मृत्यूबरोबरच मुदतपूर्तीच्या वेळेसही सुनिषित लाभ प्रदान करते अशी वैशिष्टय़पूर्ण योजना १६ फेब्रुवारी २००९ ते ३१ मार्च २००९ या मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे. ही योजना मनी बॅक स्वरूपाची असून यात केवळ नऊ व १२ वर्षे अशी पॉलिसी मुदत असून, दोन्ही प्रकारांत हप्ते भरण्याची मुदत मात्र नऊ वर्षेच असेल. ग्राहकांच्या अल्प मुदतीच्या योजनांकडचा कल लक्षात घेऊन एलआयसीने ही अल्प मुदतीची योजना जाहीर केली आहे. याशिवाय या योजनेत नऊ वर्षे मुदतीच्या (योजनेसाठी) प्रकारासाठी, प्रतिवर्षी रु. ६५/- प्रतिहजारी विमा रक्कम व १२ वर्षे मुदतीच्या प्रकारासाठी प्रतिवर्षी रु. ७०/- प्रतिहजारी विमा रक्कम असा सुनिषित लाभ दिला जाईल.

पुढील दीड वर्षांत १०० शाखांचे अभ्युदय बँकेचे लक्ष्य -सीताराम घनदाट
व्यापार प्रतिनिधी:
एकंदर सहकार चळवळ अडचणीत असताना, जनसामान्य-श्रमिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे कामगिरी चोखपणे बजावणारी अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक प्रगतीचे नवनवे टप्पे गाठत चालली आहे. ‘आपली बँक’ हे आपले ब्रीद पुरेपूर निभावताना अभ्युदय बँक यापुढेही अशीच प्रगती करीत राहील आणि येत्या वर्ष-दीड वर्षांत १०० शाखांचा टप्पाही गाठेल, असा संकल्प अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष व विद्य्मान ज्येष्ठ संचालक सीताराम घनदाट यांनी व्यक्त केला.

‘ल्युसीफर लाइट्स’तर्फे एलईडी आधारित लायटिंग उत्पादने
व्यापार प्रतिनिधी:
भारतात लाइट एमिटिंग डायोड (एलईडी) आधारित लायटिंग उत्पादनांची प्रवर्तक असलेल्या ‘ल्युसीफर लाइट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या पुणेस्थित कंपनीने आपली विशाल उत्पादन श्रेणी भारतभर उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत गोरेगाव (पूर्व) येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये येत्या २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ‘लायटिंग साऊथ एशिया’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ही सर्व उत्पादने एकत्रित प्रदर्शित केली जाणार आहेत. एलईडी आधारित लायटिंग उत्पादने लक्षणीय वीजबचत करणारी, पर्यावरण सुरक्षित आणि सध्याच्या टय़ूबलाइट्स, सीएफएल व सोडियम लॅम्प्सना पर्यायी ठरणारी आहेत.

‘मोबील वन’चे ठाण्यात कारच्या निगेचे केंद्र
व्यापार प्रतिनिधी:
सानवा मोटर्स व जगातील नंबर वन कार इंजीन ऑइल मोबील वन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील पहिलेच ‘मोबील वन कार केअर आऊटलेट’ सुरू झाले आहे. ही सुविधा ठाण्यातील सानवा मोटर्स येथे सुरू करण्यात आली आहे. या ‘मोबील वन कार केअर आऊटलेट’चे उद्घाटन एक्झॉनमोबील लुब्रिकन्ट्सचे सीईओ नॅथनिएल हेडमन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ब्रिटिशकालीन ‘विण्टेज कार १९३५ मोरीस’ गाडीत मोबील वन ऑइल टाकण्यात आले. ठाण्याचे पोलीस आयुक्त अनिल ढेरे, आरटीओचे ल. प्र. खाडे, एसीपी, डीसीपी, अ‍ॅम्ब्युलन्स, नामांकित डॉक्टर व उद्योजक अशा समाजोपयोगी व्यक्ती व संस्थांच्या गाडय़ांमध्ये मोबील वन ऑइल मोफत भरून सामाजिक बांधिलकी जपत या नवीन आऊटलेटचे उद्घाटन करण्यात आले.

टाटा एआयजी लाइफच्या वतीने ‘इन्व्हेस्टर अ‍ॅश्युअर अ‍ॅपेक्स’ योजना
व्यापार प्रतिनिधी:
टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयजी लाइफ) ने आज त्यांच्या नवीन ‘इन्व्हेस्टर अ‍ॅश्युअर अ‍ॅपेक्स’, या नावीन्यपूर्ण अशा युनिट लिंक्ड विमा योजनेची सुरुवात केल्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत आपल्या भांडवलाच्या संरक्षणाची हमी तर मिळतेच, पण त्याचबरोबर सर्वाधिक लाभ आपणास मिळतो म्हणजे १०० महिन्यांतील सर्वाधिक ‘एनएव्ही’नुसार आपणास फायदा दिला जातो. ही योजना गॅरेंटीड मॅच्युरिटी युनिट प्राइस (जीएमयूपी)च्या नावीन्यपूर्ण अशा पद्धतीने काढली जाते. जीएमयूपी ही अ‍ॅपेक्स रिटर्न लॉक इन फंडांकरिता मागे झालेल्या १०० रिसेट दिवसांपैकी जो सर्वाधिक एनएव्ही असेल तो शोधून काढतो. म्हणजेच प्रत्येक १०० महिन्यातील सर्वाधिक एनएव्ही हा अ‍ॅपेक्स रिटर्न लॉक इन फंडकरिता शोधला जाईल आणि त्या १०० एनएव्हीजपैकी सर्वाधिक असा एनएव्ही हा पॉलिसीच्या शेवटापर्यंत सुरू राहील. या मर्यादित कालावधीच्या ऑफरमध्ये तीन वर्षांपासून ते १० वर्षांपर्यंत पैसे भरण्याच्या योजना; किमान हप्ता भरलेला असल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी हप्त्याच्या पुनर्विचार करता येईल; १८ र्वष ते ७० वर्षांपर्यंत कोणीही ही पॉलिसी काढू शकतो; तीन वर्षांनंतर थोडी रक्कम काढता येते, अशी या योजनेची वैशिष्टय़े आहेत.

हाँगकाँगस्थित फर्स्ट मोबाइल ग्रुपचा भारतात ई’टच मोबाइलद्वारे प्रवेश
व्यापार प्रतिनिधी:
जागतिक स्तरावर मोबाइल फोन्स आणि अ‍ॅक्सेसरीजचे वितरण करणाऱ्या हाँगकाँगस्थित फर्स्ट मोबाइल ग्रुप (एफएमजी)ने भारतातील बहरत्या दूरसंचार बाजारपेठेला आजमावण्यासाठी ‘ई-टच मोबाइल (प्रा.) लिमिटेड’ या मुंबईत मुख्यालय असणाऱ्या उपकंपनीच्या स्थापनेची घोषणा केली आहे. १९९६ मध्ये हाँगकाँगमध्ये कार्यरत झालेल्या फर्स्ट मोबाइल ग्रुपने अनेक देशांमध्ये आपली उच्चतम दर्जाची वितरण यंत्रणा फैलावली असून, आघाडीच्या सेल्युलर ब्रॅण्डशी उत्तम सख्य प्रस्थापित केले आहे. २००७ सालापर्यंत उमदी प्रगती साधत या समूहाने एकंदर विक्री उलाढालीत एक अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पाही गाठला आहे. तब्बल ३० वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले आणि भारतातील मोबाईल उद्योगाशी १९९५ पासून संलग्न असलेले संजय रॉय यांची ई’टच मोबाइल प्रा. लिमिटेडचे सीईओ म्हणून नियुक्ती केली गेली आहे. ‘व्हॅल्यू फॉर मनी’ या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय देणारी आणि जनसामान्यांपर्यंत पोहचता येईल या हेतूने कंपनी आपली उत्पादने भारतात प्रस्तुत करीत आहे. त्यामुळे सर्वाना परवडतील अशी रु. २००० किमतीपासून सुरू होणारी फोनही ई’टच मोबाइलकडे असतील, अशी रॉय यांनी माहिती दिली. ई’टच मोबाइलद्वारे प्रारंभी १२ हँडसेट आणि अ‍ॅक्सेसरीजची श्रेणी सादर केली जाईल. उच्चतम गुणवत्तेचे मनुष्यबळ आणि दर्जेदार उत्पादन, तसेच विस्तृत विक्री व विपणन जाळे त्याचप्रमाणे सर्वोत्तम विक्री-पश्चात सेवा या सर्वाच्या माध्यमातून मोबाइल फोनचे देशातील अग्रेसर ब्रॅण्ड बनण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीने भारतातील २५० शहरांमध्ये अस्तित्व निर्माण करताना, अखिल भारतीय स्तरावरील सेवा भागीदार म्हणून रेडिंग्टन इंडिया लिमिटेड कंपनीची नियुक्ती केली आहे. मोठय़ा क्षेत्रात विस्तार आणि व्याप वाढविण्यावर भर देत ई’टच मोबाइलने संपूर्ण देशस्तरावर विक्रेते व वितरकांचे मोठे जाळे रचण्याचीही योजना बनविली आहे.

टाटा इंडिकॉमची नवीन ऑफर हॅन्डसेट्सवर १०० टक्के कॅश बॅक
व्यापार प्रतिनिधी:
महाराष्ट्र व गोव्यात टेलिकॉम सेवा प्रदान करणारी, टाटा टेलिसव्‍‌र्हीसेस (महाराष्ट्र) लिमिटेडने आज आपल्या पोस्ट - पेड ग्राहकांकरता हॅन्डसेटवर १०० टक्के कॅश बॅकची आकर्षक ऑफर जाहीर केली. ही अशाप्रकारची आजवरची एकमेव ऑफर आहे. या ऑफरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या हॅन्डसेट्सची संपूर्ण किंमत परत मिळू शकेल. या ऑफरमध्ये तीन प्रकारचे हॅन्डसेट्स दिले जात आहेत. या सर्व हॅन्डसेटमध्ये अनेक प्रकारची वैशिष्टय़े आहेत. त्या व्यतिरिक्त हे हॅन्डसेट्स कलर आहेत व त्यांमध्ये एफएम सुविधादेखील उपलब्ध आहे. हे तीन हॅन्डसेट्स आहेत. सॅमसंग सुपर हीरो (१,८०० रुपये), रेडीयो फोन (१,८०० रुपये) व मोटोरोला डब्ल्यू २१२ (१,२०० रुपये).
या योजनेबरोबरीनेच ‘ग्रेट व्हॅल्यू १९९ पोस्टपेड योजना’ ही मिळू शकेल ज्याचे दर महिन्याचे रेन्टल १९९ रुपये असेल.