Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
व्यापार -उद्योग
(सविस्तर वृत्त)

सोमाणी अ‍ॅक्वावेअरचा पश्चिम भारतात १२ स्टोअर्स सुरू करण्याचा संकल्प
व्यापार प्रतिनिधी: सिरॅमिक उद्योगात आघाडीवर असलेल्या सोमानी सिरॅमिक लि.च्या सॅनिटरीवेअर विभाग आकर्षक अ‍ॅक्वावेअर उत्पादनांसह पश्चिम आणि दक्षिणेकडील भारतीय बाजारपेठेत प्रवेश

 

करण्याची योजना जाहीर केली.
नवनवीन ग्राहकांना बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी उच्च दर्जाची अ‍ॅक्वावेअर उत्पादने ज्यामध्ये वॉटर क्लोसेट, युरिनल्स, बेसिन्स आणि पेडेस्टल यांचा समावेश आहे ती आणली आहेत तीनस्तरीय संरचनेचा उपयोग करून कंपनी या विभागात आपले अस्तित्व टिकवून ठेवणार आहे. या तीन स्तरांमध्ये वितरक नेमणे, विक्रेत्यांचे जाळे प्रस्थापित करणे आणि कंपनीच्या रिटेल आउटलेट्सची पाहणी यांचा समावेश आहे. विविध प्रकारचे ग्राहक आणि व्यापाराच्या वेगवेगळ्या पद्धती समजून घेऊन रिटेल वितरणाचे जाळे आणि ब्रॅण्डमधील समानता याच्या जोरावर प्रमुख कंपनीची ताकद भविष्यात वाढविता येईल.
अ‍ॅक्वावेअर विभागाची विस्तृत माहिती सांगताना सोमानी सिरॅमिक लि.चे अध्यक्ष अनिल कुमार बिजवत म्हणाले, ‘‘पुढे वाटचाल करताना आम्ही पश्चिम आणि दक्षिण भारतातील आमचे अस्तित्व अधिकच बळकट करणार असल्याचे निश्चित केले आहे. नागपूर, पुणे आणि मुंबईसह आम्ही नुकताच पश्चिमेकडील बाजारपेठेत प्रवेश केला असून, या महिन्यात गोव्यात प्रवेश करीत आहोत. कोइम्बतूर, कालिकत, हैद्राबाद आणि बंगलोरमध्ये प्रवेश करून आम्ही दक्षिणेकडील बाजारपेठेत प्रवेश केला आहे आणि चेन्नई व कोचीनमध्ये प्रवेश करण्याचा आमचा विचार आहे.’’