Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
व्यापार -उद्योग
(सविस्तर वृत्त)

एलआयसीची ‘जीवनवर्षां’
व्यापार प्रतिनिधी: एलआयसीची नवीन योजना ‘जीवनवर्षां’ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणारी, सुनिषित वाढीची मनी बॅक योजना आहे. सदर योजना विमाधारकाच्या मृत्यूबरोबरच मुदतपूर्तीच्या वेळेसही सुनिषित लाभ प्रदान करते अशी वैशिष्टय़पूर्ण योजना १६ फेब्रुवारी २००९ ते ३१ मार्च २००९ या

 

मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.
ही योजना मनी बॅक स्वरूपाची असून यात केवळ नऊ व १२ वर्षे अशी पॉलिसी मुदत असून, दोन्ही प्रकारांत हप्ते भरण्याची मुदत मात्र नऊ वर्षेच असेल. ग्राहकांच्या अल्प मुदतीच्या योजनांकडचा कल लक्षात घेऊन एलआयसीने ही अल्प मुदतीची योजना जाहीर केली आहे. याशिवाय या योजनेत नऊ वर्षे मुदतीच्या (योजनेसाठी) प्रकारासाठी, प्रतिवर्षी रु. ६५/- प्रतिहजारी विमा रक्कम व १२ वर्षे मुदतीच्या प्रकारासाठी प्रतिवर्षी रु. ७०/- प्रतिहजारी विमा रक्कम असा सुनिषित लाभ दिला जाईल.
मनी बॅक स्वरूपातील योजनांचा विचार करता या योजनेत प्रथमच तीन वर्षांनी विद्यमानता लाभ देय होईल. म्हणजेच नऊ वर्षे मुदतीच्या प्रकारासाठी तिसऱ्या, सहाव्या व नवव्या वर्षी रक्कम मिळेल, तर १२ वर्षे मुदतीच्या प्रकारासाठी तिसऱ्या, सहाव्या, नवव्या व १२ व्या वर्षी रक्कम दिली जाईल.
‘जीवनवर्षां’ ही ठराविक कालावधीनंतर विशिष्ट रक्कम प्रदान करते आणि त्यामुळे, ग्राहकांना पॉलिसी मुदतीत उद्भवणाऱ्या विविध गरजांसाठी तरतूद करता येणे शक्य होते. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ असे, की जरी ठरावीक कालावधीनंतर विशिष्ट रक्कम दिली गेली, तरी पॉलिसी मुदतीत विमाधारकास संपूर्ण विमा रकमेचे संरक्षण उपलब्ध राहते.
१५ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळू शकेल, ज्यामुळे त्या व्यक्तीस सज्ञान होताच पहिल्या विद्यमानता लाभाचा फायदा मिळू शकेल. मुदतपूर्वीच्या वेळेचे कमाल वय ७५ वर्षे असल्याने नऊ वर्षे पॉलिसी मुदतीसाठी, सुरुवातीचे कमाल वय ६६ वर्षे, तर १२ वर्षे पॉलिसी मुदतीसाठी सुरुवातीचे कमाल वय ६३ वर्षे असेल.
या योजनेत हप्ते भरण्यासाठी वार्षिक, सहामाही, तिमाही व मासिक (फक्त ईसीएस) असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ईसीएस मासिक हप्त्यासाठी किमान विमा रक्कम रु. ७५,००० तर हप्ते भरण्याच्या अन्य प्रकारांसाठी किमान विमा रक्कम रु. ५०,००० असून, जास्तीत जास्त विमा रकमेसाठी कुठलीही मर्यादा नाही. ठराविक कालावधीनंतर उद्भवू शकणाऱ्या गरजांसाठी नियोजन करू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त असून, या योजनेत गुंतविलेल्या रकमेसाठी संपूर्ण हमी तर आहेच. शिवाय परताव्याचा दर सुनिषित आहे. ही योजना म्हणजे आनंद व प्रगतीचे दरवाजे खुले करणारी गुरूकिल्लीच आहे.