Leading International Marathi News Daily                               मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

लॉस एंजेलिस, २३ फेब्रुवारी/पीटीआय
कोडॅक थिएटरमध्ये झालेल्या दिमाखदार ऑस्कर सोहळय़ात ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाने आठ पुरस्कारांची लयलूट केली. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाची पाश्र्वभूमी भारतीय असल्याने यंदाचा पुरस्कार कुणाला मिळणार, याबाबत देशात जास्त उत्सुकता होती. ‘तारे जमीं पर’ हा परदेशी चित्रपट गटातील चित्रपट मात्र अगोदरच बाद झाला होता. भारताचे मोझार्ट समजले जाणारे चेन्नईचे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दोन पुरस्कार पटकावताना अटकेपार झेंडा लावला. ध्वनी अभियंता रसूल पुकुट्टी यांनीही ध्वनिमिश्रणाचा ऑस्कर पुरस्कार पटकावत कमाल केली. लघु माहितीपटात ‘स्माईल पिंकी’ने बाजी मारली. ऑस्करमधील यश द्विगुणित केले. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ हा चित्रपट अगोदरच ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत वरच्या क्रमांकावर होता व त्याच्या यशाविषयी अनेकांना खात्री होती, आणि प्रत्यक्षात तसे घडले.

‘स्लमडॉग’ला आठ ऑस्कर
‘स्माइल पिंकी’च्या यशाने आनंद द्विगुणित!
लॉस एंजेलिस, २३ फेब्रुवारी/पीटीआय
येथील कोडॅक स्टुडिओत झालेल्या दिमाखदार ऑस्कर सोहळय़ात ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाने आठ ऑस्कर पुरस्कारांची लयलूट केली. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाची पाश्र्वभूमी भारतीय असल्याने यंदाचा ऑस्कर पुरस्कार कुणाला मिळणार, याबाबत देशात जास्त उत्सुकता होती. ‘तारे जमीं पर’ हा परदेशी चित्रपट गटातील चित्रपट मात्र अगोदरच बाद झाला होता. भारताचे मोझार्ट समजले जाणारे चेन्नईचे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दोन ऑस्कर पुरस्कार पटकावताना अटकेपार झेंडा लावला.


..आणि पिंकी हसली!

मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भारतीय कथेवर आधारित ‘स्लमडॉग मिलिअनेअर’ या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले असतानाच उत्तरप्रदेशातील एका लहान मुलीच्या ओठांचे अपंगत्व दूर करणाऱ्या ‘क्लेफ्ट लिप’ (दुमडलेल्या ओठांवरील शस्त्रक्रिया) शस्त्रक्रियेवरील ‘स्माइल पिंकी’ या लघुमाहितीपटाला ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘स्माइल ट्रेन’ या जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या मदतीने दिग्दर्शिका मॅगन मिलान या दिग्दर्शिकेने हा माहितीपट तयार केला.

आजा आजा, जिन्दे शामियाने के तले
जम्री वाले, नीले आसमाने के तले
रत्ती रत्ती, सच्ची, मैंने जान गंवाई है
नच नच कोयलों पे, पात बिताई है
अखियों की नींद मैने, फूंकों से उडम दी
गिन गिन तारे मैने, उंगली जलाई है
जय हो..

भारतासाठी मानाचं पान!
आठ ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिनिअर’च्या घवघवीत यशामुळे मी हरखून गेली आहे. संगीतकार ए. आर. रहमान यांनी दोन, तर गीतकार गुलजार आणि साऊंड मिक्सिंग विभागात पोकुट्टी यांनी एक ऑस्कर पुरस्कारजिंकल्यामुळे आणि ओठांचे व्यंग घेऊन समाजात वावरणाऱ्या मुलीची कथा असलेल्या ‘स्माईल िपकी’ या शॉर्ट डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारामुळे मला विशेष आनंद झाला आहे.

रहमानने ऑस्कर अर्पण केले परमेश्वराला अन् मातेला!
लॉस एंजेलिस, २३ फेब्रुवारी/पीटीआय

२२ फेब्रुवारीची हॉलीवूडमधील ती रात्र संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासाठी अविस्मरणीय अशीच होती. ‘जय हो’ या गीतासाठी त्यांना ऑस्कर जाहीर झाले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, पण एवढे यश मिळूनही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही अभिनिवेश नव्हता. पुरस्कार स्वीकारताना रेहमान यांचे शब्द होते, एल्ला पुघलम इरायवनुके (मला मिळालेला हा सन्मान परमेश्वराचाच आहे.) परमेश्वराशिवाय त्यांनी हा सन्मान त्यांच्या प्रेमळ मातेला अर्पण केला.

कोदंबक्कम ते ऑस्कर रहमानचा प्रवास
प्रतिनिधी

आर्थिक विवंचनेमुळे चित्रपटसृष्टी सोडून देण्याच्या विचारात असलेल्या ए.आर. रहमानचा ‘कोदंबक्कम ते हॉलिवूड’ हा संगीतमय प्रवास आता झगमगता वाटत असला तरी त्याचा प्रारंभीचा कालखंड काटे आणि अडथळ्यांनी भरलेला होता.. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे बोट धरून संगीत क्षेत्रात शिरलेल्या रहमानचे कान जणू अगदी बालपणापासून तयार झाले होते.. साधी साधी धून ऐकून रहमान भान विसरून जायचा..

..आणि पिंकीच्या ओठावर खुलले खरोखरचे स्माइल!
प्रतिनिधी
‘स्माइल पिंकी’ या ऑस्करविजेत्या लघुमाहितीपटाची कथा जिच्या जीवनावर आधारलेली आहे त्या पिंकी सोनकर हिच्या ओठावर शस्त्रक्रिया करणाऱ्या प्लॅस्टिक सर्जन डॉ. सुबोध कुमार सिंग यांनी लॉस एन्जेलिसवरून आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही कथा कोणा एका ग्रामीण मुलीची नाही तर स्वत:च्या शारीरिक व्यंगावर उपचार करुन घेण्यास उत्सुक असलेल्या तिच्यासारख्याच ओठ फाटलेल्या हजारो इतर मुलींची ही कथा आहे.

धारावीत जल्लोष!
बंधुराज लोणे
‘स्लमडॉग..ला’ ऑस्कर मिळाल्याने धारावीत जल्लोषाचे वातावरण आहे तर धारावीच्या गरिबीवर किती जण ‘मिलिनेअर्स ’ होणार, असाही सवाल विचारला जात आहे.
‘स्लमडॉग..ला’ ऑस्कर मिळणार, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र त्याचे धारावीकरांना फारसे अप्रुप नव्हते. कारण धारावीत या पूर्वी अनेक सिनेमांचे चित्रिकरण झालेले आहे आणि धारावीच्या वातावरणावर अनेक सिनेमे आलेले आहेत.

‘आवाज’ कुणाचा.. ‘एफटीआयआय’च्या रसूलचा!
पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, म्हणजेच ‘एफटीआयआय’मधील मीडियाची आजची गर्दी वेगळ्या कारणासाठी होती. तिथे कोणता ‘झीरो सेमिस्टर’चा वाद सुरू नव्हता, की विद्यार्थ्यांचे आंदोलन! आज होता फक्त ‘जय’घोष! ‘साऊंड मिक्सिंग’सारख्या तांत्रिक म्हणून हिणविल्या जाणाऱ्या विभागातील ऑस्कर यशाचा! त्याचा शिलेदार होता अर्थातच गुणवान माजी विद्यार्थी रसूल पुकुट्टी. ‘स्लमडॉग मिलिनेअर’साठी रसूलला ‘साऊंड मिक्सिंग’साठी ऑस्कर जाहीर झाले नि त्याच्या मातृसंस्थेत एकच जल्लोष झाला.

ऑस्कर म्हणजे काय रे भाऊ?
अमेरिकेतील ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’तर्फे चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रत्येकवर्षी ऑस्कर पुरस्कार वितरीत केले जातात. २४ सामान्य आणि सहा विशेष श्रेणींमध्ये हे पुरस्कार वितरीत केले जातात. मात्र विशेष श्रेणीतील पुरस्कार दरवर्षी दिले जातातच असे नाही.

रेड कार्पेट..
ब्रिटिश बॉयल

डॅनी बॉयल यांच्या चित्रपटांना अ‍ॅकेडमी तसेच जगभरात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांपासून आजतागायत वंचित राहावं लागलं होतं. स्लमडॉगने केवळ भारतीय सिनेमाचे द्वार जगासाठी उघडले नाही, तर या ब्रिटिश चित्रकर्त्यांचा इतक्या वर्षांतील प्रामाणिक प्रयत्नांचा खऱ्या अर्थाने सन्मान या चित्रपटांना ‘ऑस्कर’ने केला आहे असं म्हणता येईल. २०००मध्ये सॅम मेंडिस यांना ‘अमेरिकन ब्यूटी’ साठी मिळालेल्या पुरस्कारानंतर ब्रिटिश दिग्दर्शकांपासून लांब राहिलेला हा पुरस्कार बॉयल यांनी पुन्हा खेचून आणला आहे.

‘वऱ्हाड’कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन
औरंगाबाद, २३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या आणि विश्वविक्रमाच्या ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा झेप घेतलेल्या डॉ. लक्ष्मण नरसिंह देशपांडे यांचे आज मध्यरात्री निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी विजयाताई, मुले सचिन व नितिन, सुना, नातवंडे, पुतण्या राहुल, थोरले बंधू शांताराम असा परिवार आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी