Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भारतासाठी मानाचं पान!

 

*आठ ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिनिअर’च्या घवघवीत यशामुळे मी हरखून गेली आहे. संगीतकार ए. आर. रहमान यांनी दोन, तर गीतकार गुलजार आणि साऊंड मिक्सिंग विभागात पोकुट्टी यांनी एक ऑस्कर पुरस्कारजिंकल्यामुळे आणि ओठांचे व्यंग घेऊन समाजात वावरणाऱ्या मुलीची कथा असलेल्या ‘स्माईल िपकी’ या शॉर्ट डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारामुळे मला विशेष आनंद झाला आहे.
-राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
*संगीतकार रहमान आणि गुलजार यांचे यश हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभेच्या अथांग सागराला मिळालेली पावती असून ‘स्लमडॉग मिलिनिअर’ आणि ‘स्माईल िपकी’च्या ऑस्कर विजेत्यांमुळे भारताची मान उंचावली आह
-पंतप्रधान मनमोहन सिंग
*भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटांतील सर्व अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी भारताची मान उंचावली असून त्यांची कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
-सोनिया गांधी
*ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ च्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो. भारतीयांची मान उंचावणाऱ्या या चित्रपटाच्या यशानंतर हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय मी जाहीर करतो.
- मुख्यमंत्री अशोक चव्हाण
* माझी पहिली प्रतिक्रिया आश्चर्याची होती. जसजसा कार्यक्रम सुरू झाला तसे रेहमानला ऑस्कर मिळणार असे मला वाटत होते. रसूललाही ऑस्कर मिळाले याचाही मोठा आनंद मला वाटतो. हा चित्रपट तर चांगला होताच, पण सगळ्या चमूबरोबर काम करण्यात वेगळे समाधान होते. या चित्रपटातील सळसळते चैतन्य कलाकारांमध्येही प्रतिबिंबित झालेले होते. रेहमानच्या संगीताचा गौरव झाल्याने भारतीय चित्रपट संगीताचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाणार आहे.
- गुलजार
ल्ल दरवर्षी असा पुरस्कार मिळावा असे वाटते हे रेहमानचे म्हणणे स्वागतार्हच आहे. त्याच्यासारखा गुणी * बद्धि्धमान संगीतकार दुसरा नाही. त्याच्या संगीताला दाक्षिणात्य भारतीय संगीताची डूब आहे, तसेच हिंदी चित्रपट संगीतातही त्याची कामगिरी असाधारण अशीच आहे.
- लता मंगेशकर
*रहमानबरोबर मी अनेक चित्रपटांतील गाणी म्हटली, तो बुद्धिमान आहे यात शंकाच नाही. सगळ्या जगालाच त्याने विस्मयचकित केले. भारतीय बुद्धिमत्तेची दखल त्याने जगाला घ्यायला लावली हेच त्याचे मोठे यश आहे. त्याने भारतीय चित्रपट उद्योगाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले.
- आशा भोसले
*भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. भारतीय कलाकारांना एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविले जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.
- अमिताभ बच्चन
* रसूल भारतातील गुणवान साऊंड डिझायनर आहे. या निमित्ताने भारतीयांच्या कामाचा दर्जा जगभराला कळला असून इतरांपेक्षा आपण कुठेच कमी नाही हे दाखवून दिले आहे.
- आमीर खान