Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आयुकाच्या विज्ञानदिन स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी प्रशाला प्रथम
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्ताने आयुकातर्फे निबंध, चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. तीनही गटात विद्यार्थ्यांनी चांगलीच चमक दाखवली. प्रा.वरुण साहनी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ.टी.पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची निवड केली. गौरांग महाजन यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे संचालन केले. आयुकाच्या वतीने दरवर्षी विज्ञानदिनानिमित्त अशा स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी चांद्रयान-१ मोहिमेवर इस्रोच्या वैज्ञानिक श्रीमती ए.एस.पद्ममावती यांचे भाषण झाले. त्यांनी चांद्रयानाने चित्रित केलेल्या व्हिडिओही यावेळी दाखवल्या. प्रा.नरेश दधिच यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, अशी माहिती आयुकाचे विज्ञान प्रसार अधिकारी अरविंद परांजपे यांनी दिली.
विजेत्या विद्यार्थ्यांची व शाळांची नावे पुढीलप्रमाणे- प्रश्नमंजुषा स्पर्धा- प्रथम पारितोषिक- ज्ञान प्रबोधिनी प्रशाला (आदित्य सुनील जोशी, हर्षवर्धन प्रसाद जोग, ईशान गुणेश देखणे), द्वितीय पारितोषिक- लोयोला हायस्कूल (आकाश अतुल कलविंत, विनित रवीशंकर), तिसरे पारितोषिक विभागून -सेंट जोसेफ हायस्कूल (संस्कृती अतुल डवळे, लीना हेमंत दामले, श्रीतिजा पिनाकी सेनगुप्ता, विद्याभवन हायस्कूल (मनीष सुरेश अडवाणी, विनित कुंदन गेला, सोहम राजेश फडे). निबंध इंग्रजी-प्रथम पारितोषिक-स्पृहा अदावित कुर्लेकर (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे) व ऋजुता सुर्वे (सेंट जोसेफ हायस्कूल), द्वितीय पारितोषिक- अभिराम पी. भालेराव (अभिनव विद्यालय हायस्कूल) व आसावरी अंबिरे(ज्ञान प्रबोधिनी प्रशाला-निगडी), निबंध मराठी- प्रथम पारितोषिक-आरती अजय भट्टू(ज्ञान प्रबोधिनी प्रशाला-निगडी), द्वितीय पारितोषिक-सोनल मंगेश पवार,( हुजूरपागा स्कूल,कात्रज), चित्रकला स्पर्धा-प्रथम पारितोषिक- मनोरमा लोंढे (विद्या प्रतिष्ठानचे इंग्लीश मीडियम स्कूल), दुसरे पारितोषिक- समीर.पी.खरे (विद्याभवन हायस्कूल), खास उल्लेख-स्नेहल इंगळे (केंद्रीय विद्यालय-२ एएफएस).