Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

खाडीकिनारी सुरू आहे ऑक्सिजनेशनचा प्रयोग!
प्रशांत मोरे

मुंबई, नाशिक आणि पुणे येथील विविध प्रकल्पांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यास प्रभावी ठरलेली बायोसॅनिटायझर या उत्प्रेरकाची मात्रा आता ठाण्यात गायमुखजवळील खाडीकिनारी असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर वापरली जात असून, गेल्या शुक्रवारी या उत्प्रेरकाचे प्रणेते डॉ. उदय भवाळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या डम्पिंग ग्राऊंडला भेट दिली.

लालबागच्या पुलाचे पाडकाम एप्रिलपर्यंत लांबणीवर
प्रतिनिधी

दहावी-बारावीप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांतील अन्य विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा हंगाम लक्षात घेऊन एमएमआरडीएने लालबाग येथील संत ज्ञानेश्वर महाराज पुल पाडण्याचे काम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पूलाच्या पाडण्याचे काम दहावीची परीक्षा संपल्यानंतर हाती घेण्यात येणार आहे.

‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेसाठी ज्ञानसंग्रहांचे प्राथमिक परीक्षण आजपासून
प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रायोजित ‘लोकसत्ता गाथा ज्ञानाची’ या कात्रण संकलन स्पर्धेअंतर्गत ज्ञानसंग्रहांचे प्राथमिक परीक्षण बुधवारपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी कात्रण चिटकवून सजविलेले ज्ञानसंग्रह २५ व २६ फेब्रुवारी या दोन दिवसांत जवळच्या केंद्रांवर जमा करावे लागणार आहेत. प्राथमिक परीक्षणासाठी ‘गाथा ज्ञानाची’ कात्रणे व्यवस्थित चिटकवून आकर्षकरीत्या सजविलेले ज्ञानसंग्रह विद्यार्थ्यांना दोन दिवसांत म्हणजे २५ व २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते सायं. ६.३० या वेळेत जवळच्या परीक्षण केंद्रांवर जमा कराव्या लागणार आहेत. पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविलेले ज्ञानसंग्रह स्वीकारले जाणार नाहीत. तसेच प्राथमिक परीक्षणानंतर दिनांक २७-२८ फेब्रुवारी रोजी त्याच परीक्षण केंद्रांवरून ते त्वरित परत घेऊन जायचे आहेत.

मुंबईकर रंगले ‘बर्ड रेस’मध्ये
प्रतिनिधी

झाडावरून कुटरू-कुटरू- कुटरू- असा आवाज येतो, पक्षी निरीक्षकांचे, कान आवाजाचा वेध घेऊ लागतात. कोणी तरी सांगते अरे हा ब्रॉऊन हेडेड बार्बेट. दुर्बिणीतून वेध घ्यायचा प्रयत्न, पण पक्षी तर दिसत नाही. तेवढय़ात डोक्यावरून कू: कूप: कूप: असा आवाज घुमवीत भारद्वाज दूर जातो. थोडय़ाच वेळात मधुर गायनासारखा कॉमन आयोरा साद घालतो. त्याच्या या आवाजामुळेच त्याला सुभग म्हणतात, एकजण माहिती पुरवितो. मग लगबग होते ती या सर्व निरीक्षणांची नोंद करण्याची.

नातिचरामि
प्रतिनिधी

मुंबईचे बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ गेली ४८ वर्षे सातत्याने मराठी, गुजराती व हिंदी नाटके सादर करीत आले आहे.
‘नातिचरामि’ या नाटकाचे लेखक आहेत संभाजी सावंत आणि दिग्दर्शक आहेत राजेश कदम!
‘नातिचरामि’ या नटकाचे शीर्षकच मोठे सूचक आहे. या नाटकात मानवी मनोव्यापाराचे वेगळे दर्शन घडविलेले आहे. ‘नातिचरामि’ म्हणजे न अतिचरामि! विवाहविधीमध्ये वधू-वराने परस्परांना द्यावयाचे वचन! अतिचार म्हणजे उल्लंघन. व्रताचे, मर्यादेचे किंवा स्वीकृताचे उल्लंघन. ते न करण्याचे वचन म्हणे ‘नातिचरामि’.

नेटिझन्सची नेटशाही
‘‘अरे, परवा माझ्या शाळेतील माझा जिगरी यार भेटला, गेले तीन-चार वर्षे आमचा काहीच संपर्क नव्हता, तो कुठे आहे हेदेखील माहीत नव्हते.’’ ‘‘काय सांगतोस काय? सही यार. मला पण माझी एक्स गर्लफ्रेंड भेटली, ती म्हणते की, आपण फ्रेंडशीप तरी ठेवूया, काय स्क्रॅप पोस्ट करू हेच कळत नाही. बघू.’’ असे अनेक संवाद तरुणांच्या घोळक्यातून आपल्या कानावर पडत असतात.

जाऊ ‘मृगजळाच्या गावा’!
प्रतिनिधी

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी सादर करत असलेला मराठी कवितांचा कार्यक्रम ‘आयुष्यावर बोलू काही’, भीमराव पांचाळे सादर करत असलेल्या मराठी गझल किंवा प्रा. विसुभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ आदी कार्यक्रमांना रसिक श्रोते विशेषत: युवावर्ग भरभरून दाद देत आहेत. केवळ मराठी कविता आणि गझल ऐकण्यासाठी कार्यक्रमाला होणारी गर्दी मराठी साहित्य आणि भाषेसाठी निश्चितच सुखावणारी आहे. कवितांच्या परंपरेत बसणारा ‘मृगजळाचे गाव माझे’ हा कार्यक्रम येत्या २६ फेब्रुवारी रोजी नेहरू सेंटरने आयोजित केला आहे. ज्येष्ठ कवी आणि गीतकार मनोहर रणपिसे यांच्या कवितांवर आधारित हा कार्यक्रम आहे. वरळी येथील नेहरू सेंटर येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका २३ फेब्रुवारीपासून नेहरू सेंटर येथे उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर त्या उपलब्ध असेपर्यंत मिळू शकणार आहेत. या कार्यक्रमात सादर होणाऱ्या कविता आणि गझल आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली असून त्याची सीडीही प्रकाशित झाली आहे. संगीतकार उदय चितळे असून विनायक जोशी आणि रंजना पेठे-जोगळेकर ही गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती ‘स्वच्छंद’ या संस्थेची असून संदीप मयेकर (तबला), गिरीश प्रभू (सिंथसायझर) दिगंबर मानकर (ढोलकी) हे संगीतसाथ करणार आहेत.

आर्थिक मदतीचे आवाहन
प्रतिनिधी

विक्रोळी येथील रहिवासी नरेंद्र पेडणेकर यांच्या आठ महिन्यांच्या मुलावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. पेडणेकर यांच्या आठ महिन्यांच्या मुलाला जन्मत:च हृदयाला भोक आहे. त्याकरिता तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता असून त्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च आहे. पेडणेकर यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. ही शस्त्रक्रिया अर्नाकुलम येथील अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात येणार असून मदत करणाऱ्यांनी ‘अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर’ या नावाने चेक काढावेत.
संपर्क- ९९३०२२४४५१.