Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

विशेष

रूम अ‍ॅट द टॉप
माणसे कामे करीत असतात, बहुतेक जण ती कामे अगदी मन लावूनही करत असतात. अनेकांना त्या कामातून मिळणारा आनंद त्यातून मिळणाऱ्या धनापेक्षा अधिक महत्त्वाचा वाटत असतो. काही जण आपली सारी शक्ती पणाला लावून जगावेगळे काही करण्याची जिद्द बाळगतात. काही नवे करून आपली नाममुद्रा सिद्ध करण्याची इच्छा बाळगणाऱ्यासाठी आपले आजचे वातावरण पोषक आहे का असा जेव्हा प्रश्न पडतो, तेव्हा मन खिन्न व्हावे, अशी स्थिती दिसते. गुणवत्ता हाच कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा विकासाचा खरा मार्ग असायला हवा, असे म्हणत असताना समाजाला खरेच गुणवत्ता हवी असते का, असे वाटते. जेव्हा एखादी गोष्ट कष्टसाध्य होते आणि त्याला समाजाकडून प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा दोष समाजाचा की कष्ट करणाऱ्या व्यक्तीचा? अनेकांच्या गुणवत्तापूर्ण कामांना जेव्हा कोणतीच पावती मिळत नाही, तेव्हा ते करणाऱ्याला काय वाटत असेल, याची जाणीव समाजाला कधी होणार? आपण प्रत्येक जण गुणवत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो की, तिच्याकडे दुर्लक्ष करून कमअस्सल गुणवत्ता हेच आपले ध्येय असते? कोणत्याही कार्यालयात कामचुकार माणसे असतातच.

पर्यावरण संतुलित कृषी-औद्योगिक विकासाचा विचार
आज देशातील भांडवली उत्पादन पध्दतीच्या प्रभुत्वाखाली असलेली, आर्थिक-सामाजिक संरचनेत कष्ट करून जीवन जगणारी जनता पिळवणुकीचे जीवन जगत आह़े जाती व्यवस्था आणि स्त्री म्हणून होणाऱ्या शोषणानेही जनतेची परिस्थिती दु:खमय झाली आह़े प्रस्थापित आर्थिक-सामाजिक व्यवस्था आणि शासन संस्था यांना केवळ नकारात्मक आणि उर बडवण्याच्या पद्धतीचा विरोध करून उपयोग नाही़ जनतेने स्वत:च्या मुक्तीसाठी समर्थ पर्याय उभा केला जाहिज़े आज उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या पायावर, तंत्र विज्ञानाच्या पायावर आणि या परिस्थितीत लपलेल्या सुप्त शक्तींना विकसित करण्याच्या पायावर साकार होऊ शकणारे नव्या शोषणमुक्त समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वादळी चळवळ उभारली पाहिजे.

‘काय तात्यानू, आपण आस्करचो कसो पावस पाडल्यांनी, ता बघल्यात की नाय? बघा भारतीय कलाकार कशे जगात चमकतसत की नाय?’
‘अरे बाबल्या, ह्या तर कायच नाय, असे कित्येक आस्कर आपणाक मिळूक नाय’
‘म्हणजे श्वास, लगान, तारे जमीन पर..ची गजाल करतात ना तुमी?’
‘पिक्चरचा आस्कर नाय रे..’
‘म्हणजे आणखी कसला आस्कर..?’
‘अरे बाबा, पिक्चरच्या पलीकडे जावन अशी किती तरी क्षेत्रा आसत की ज्येच्येत आपणाक आस्कर मिळतील अशे भारी कलाकार आसत!’
‘म्हणजे काय हो तात्यानू?’
‘आता म्हणजे बघ.. सगळ्यात म्हातारे म्हणजे ज्येंची लाकडा गेली मसनात, असे डझनभर आपल्याकडे राजकारणी आसत. ह्यातला जर आस्कर असता तर, ता पण आपल्याच देशाक मिळाला असता.’
‘आणखी खयचा आस्कर मिळाक शकता?’
‘आता बघ निवडणुको तोंडार आयलसत. देशात भावी पंतप्रधानांच्या नावाची ज्येंची ज्येंची म्हणून चर्चा चालू आसा ते सगळे उमेदवार ऐंशीच्या पलीकडचे नाय तर एक-दोन वर्षां अलीकडचे. जगार सत्ता गाजवणाऱ्या अमेरिकेचो राष्ट्राध्यक्ष मात्र तरुण. पण आपल्याकडे नेमक्या उलट. सर्वात म्हातारो पंतप्रधान म्हणून आस्कर दिवचा झालाच तर आपणाकच मिळतला.’
‘तुमचो या राजकारण्यांच्यार खूपच राग दिसता.’
‘बरा राजकारण सोडून दी. फाम गेलले क्रिकेटपटू कितके आसत आपल्याकडे. घरी बसूची वेळ आयली तरी पैशासाठी खेळततच ना ते. असा खयच्या देशात चलता काय? ह्या तूच माका सांग. मग अशा प्रकारातला आस्कर फक्त आपल्याकडेच मिळात का नाय.’
‘आणखी कोण हो.. काय ता एकदाच तुमचा ऐकून घेव या.’
‘हर्षद मेहता, सी. आर. भन्साळी, केतन पारेख आणि आता तुमचो राजू हेंनी केलले गैरव्यवहार बघता या क्षेत्रातल्या आस्करसाठी हे लोक पात्र नाय काय ता माका सांग.’
‘तात्यानू, ह्या सगळ्याच देशात आसा. केवळ आपल्याकडेच आसा असा नाय.’
‘पण जगात आपल्यासारख्या नाय.. आता बघ भाजपान राम मंदिराच्या नावार लोकांकडे मता मागली. पाच वर्षां सत्ता उपभोगली. मंदिर काय उभ्या रवाक् नाय. आता हे पुन्हा रामाचो जप करूक लागले. लोकांच्या या घोर फसवणुकीचा आस्कर दिवचा झालाच तर भाजप वगळता आणखी कोणाक मिळात काय?’
‘म्हनजे तुमचा म्हणणा, काँग्रेसवाले फसवणूक करनत नाय की काय? त्येंनी गेल्या साठ वर्षांत तर लोकांची सगळ्यात मोठी फसवणूक केलीसा.’
‘फसवणूक सगळेच करतत पण घोर फसवणुकीसाठी आस्कर दिवचा लागतला.’
‘आणखी खयची आस्कर तुमच्या यादीत आसत?’
‘तशी खूप आसत. आता बघ, सर्वाधिक पक्ष बदलनाऱ्यांसाठी आस्कर ठेवला तर सुरेशदादांक कोण स्पर्धकच नाय! काँग्रेसच्या दारात प्रवेशासाठी ताटकळत रवलेल्यांसाठी पण आस्कर देवक् येयत. महाराष्ट्रात ही यादी मोठी आसा.’
‘तुम्ही तात्यानू, टीव्ही चॅनलवाल्यांसारखी नको तेवढी लांबड लावतास. त्येंका कसा सूत हातात दिला तरी ते तेचे वरसून चढान स्वर्ग गाठतत, तशी तुमची तरा आसा. माका नाय येळ. इलेक्शनचे दिवस जवळ येतसत. माझी कामा वाढतसत. यंदा खयच्या पक्षाचा काम करूचा ह्या मी आता नक्की केलेला आसा. आता मी कामाक लागतलय.’
‘मग तर जनशेवेचा यंदाचा आस्कर तुकाच. अ‍ॅण्ड आस्कर फॉर जनशेवा गोज टू बाबल्या.’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com