Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मंदीतही ‘श्रीराम रबर’ मध्ये वेतनवाढीचा सुखद धक्का
पिंपरी, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

औद्योगिक मंदीचे वारे वाहात असताना दुसरीकडे सुखद धक्का देणारी भरघोस वेतनवाढ भोसरी येथील श्रीराम रबर प्रॉडक्टने दिली आहे.
भोसरी औद्योगिक क्षेत्रातील श्रीराम रबर प्रॉडक्ट कंपनी ही प्रख्यात आहे. या कंपनीच्या व्यवस्थापन आणि एमआयडीसी वर्कर्स युनियन यांच्यामध्ये वेतनवाढीचा हा करार झाला. त्यामुळे कामगारांच्या वेतनात दोन हजार ७०० रुपये वाढ करण्यात आली आहे.
या कराराच्या मसुद्यावर व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सुभाष कोटस्थाने, संचालक प्रिया

 

कोटस्थाने, सरव्यवस्थापक संजय गुरनाळे, उत्पादक व्यवस्थापक सुरेश कुंभार, मार्केटिंग व्यवस्थापक मनीष कुलकर्णी, तर कामगार संघटनेच्या वतीने सरचिटणीस बी. जी. तळेकर, बबनराव भोर, मोहन गोसावी, युनिटप्रमुख तुकाराम तापकीर, आप्पा बिरादार, निवृती झोडगे, अशोक ढगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार कामगारांच्या मूळ पगारात प्रतिदिन ४१.६५ रुपये, घरभाडे भत्ता १९ रुपये, प्रवासभत्ता १६ रुपये, धुलाईभत्ता ८.१५ रुपये, शिक्षणभत्ता १९ रुपये प्रतिदिन अशी वाढ करण्यात आली आहे. तसेच वार्षिक सहलभत्ता म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये, वार्षिक हजेरीभत्ता म्हणून एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच या करारात अनेक आर्थिक व कल्याणकारी सुविधा आहेत.
कराराचा कालावधी १ जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०११ असा तीन वर्षांसाठी राहणार आहे. ऐन मंदीच्या पाश्र्वभूमीवर हा करार झाल्याने कामगारांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत ज्येष्ठ कामगार नेते शहीद रूपमय चटर्जी यांच्या पुतळय़ास पुष्पमाला अर्पण करून आनंद व्यक्त केला.