Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जपावी - डॉ.हिरेमठ
पिंपरी, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक बांधीलकी जपावी, असे आवाहन प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ.शिरीष

 

हिरेमठ यांनी आज येथे केले.
निमा देहूरोड शाखा आणि देहूरोड डॉक्टर्स असोसिएशन यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या धन्वंतरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांच्या हस्ते यंदाचा पुरस्कार डॉ.प्रभाकर बोरुडे व डॉ.सुरेखा बोरुडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. निमाचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ.चंद्रकांत कोलते याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शहरातील तीनशेवर डॉक्टर्स उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ.हिरेमठ यांनी सध्याच्या वैद्यकीय व्यवसायाचा एक गोषवाराच सादर केला. आज या स्पर्धेच्या युगात आपल्या क्षेत्रात सामाजिक बांधीलकीचे मोल फार मोठे आहे, असे ते म्हणाले. डॉ. कोलते यांनीही आपल्या भाषणात वैद्यकीय व्यवसाय म्हणजे समाजसेवेचे व्रत आहे असे म्हटले.
डॉ.हिरेमठ यांच्याशिवाय डॉ.शेखर रेड्डी, डॉ. सुमित तलवार, डॉ.सचिन गांधी, डॉ.नितीन कोथळे, डॉ. श्रीनिवास बन्सल, डॉ.श्रीरंग गोखले, डॉ.अनिरुद्ध टोणगावकर व डॉ. गोविंद सिद्धापूर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुपमा शिंपी, डॉ.भूषण कुलकर्णी व डॉ. राजेंद्र चवात यांनी केले, तर मानपत्रवाचन डॉ. राजेंद्र येळवंडे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. राजीव नगरकर यांनी केले.