Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

केंद्रीय आरोग्य कर्मचारी संस्थेचा संप सुरू
पुणे, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगात रुग्णसेवा भत्ता कायम ठेवण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याच्या तसेच विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया हेल्थ एम्प्लॉईज अ‍ॅन्ड वर्कर्स कॉन्फेडेरशेनने बेमुदत संप पुकारला आहे. या

 

संपामध्ये अडीच लाख कर्मचाऱ्यांचा समावेश असून संपाचा आजचा दुसरा दिवस होता.
केंद्रीय आरोग्य सेवा कर्मचारी संस्थेच्या (सीजीएचएस) मुकुंदनगर येथील कार्यालयाबाहेर या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरमहा ६७० रुपये हे रुग्णसेवा भत्ता म्हणून देण्यात येतो. सध्या लागू झालेल्या सहाव्या वेतन आयोगात हा भत्ता कायम राहण्याबाबत तसेच अन्य कोणताही उल्लेख झालेला नाही. मुळात या भत्त्याची मुदत मार्चपर्यंत संपत आहे. एप्रिलनंतर हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. तसेच हा भत्ता कायम ठेऊन मूळ पगाराचा भाग असे समजावे. पॅरा मेडीकलचे पे स्केल हे पीबी- १ ऐवजी पीबी-२ मध्ये निश्चित करावे.त्या प्रमाणात पॅरामेडीकल सव्‍‌र्हिसेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात यावी. आरोग्य सेवांचे खासगीकरण तसेच कंत्राटीकरण थांबविण्यात यावे, यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. सघंटनेचे जनरल सेकट्ररी फ्रान्सिस इलीस आणि बी. पी. कांबळे यांनी ही माहिती दिली. या संपात केंद्रीय आरोग्य सेवा कर्मचारी संस्थेचे सर्व शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा केला आहे. लुल्लानगर, फुलेनगर, कॅन्टोन्मेंट, बॉईज बटालियन, रेंजहिल्स तसेच मुकुंदनगर येथील कार्यालय, औषधालय तसेच बहुचिकित्सा येथील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे काम ठप्प झाले आहे.