Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोहगावातील गुरुद्वारा कॉलनीत घडली. प्रशांत एकनाथ सलवदे (वय २६, रा. लोहगाव)

 

यांचा खून करण्यात आला आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सोमनाथ झेंडे (रा. लोहगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. याबाबत मधुकर चिंतामण सपकाळ (वय ५०, रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) यांनी ही फिर्याद दिली आहे. सलवदे हे सपकाळ यांच्या भावाच्या मेव्हणीचा मुलगा आहे. तो मजुरीचे काम करीत असे. त्याच्यावर अज्ञात कारणांवरून मारहाण करण्यात आली आणि त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. पोलीस निरीक्षक पी. के. घार्गे तपास करीत आहेत.