Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

मराठीमध्ये हिशेब तपासनीस किंवा तत्सम नामउपाधी असलेल्या व्यावसायिकाला इंग्रजीत अकाऊन्टंट असे म्हणतात. स्पेशलायझेशनच्या जमान्यात नुसतं अकाऊन्टंटचे काम करणे वेगळे आणि त्याकरिता मान्यताप्राप्त पदवी- व्यावसायिक पात्रता, गुणवत्ता असणे ही वेगळीच बाब आहे. पूर्वी ठीक होते की, जी.सी.डी. कोर्स केला, तरीदेखील अकाऊंन्टस्मध्ये काम करायला आणि बढती मिळवत ‘अकाऊंन्टंट’ व्हायला स्कोप असायचा. आता तुमच्याकडे व्यावसायिक क्लासिफिकेशन हवे. पूर्वी व्यवसाय किंवा व्यावसायिक म्हटले की फक्त डॉक्टर-इंजिनीअर असे मोजकेच व्यवसाय डोळ्यासमोर यायचे. कारण त्यांनाच तर आपल्या समाजात प्रतिष्ठा होती. कालांतराने अन्य काही व्यावसायिकांना पत व प्रतिष्ठा लाभली. त्यापैकी एक म्हणजे सी. ए. होणे. गेल्या काही वर्षांत सी. ए. होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सी. ए. होण्यासाठी काय करावे लागते? ते पाहूया.
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टंटस् ऑफ इंडिया म्हणजेच (आयसीएआय) या विशेष स्टॅटय़ुटरी बॉडीमार्फत असा अभ्यासक्रम
 

शिकविला जातो, परीक्षा घेतली जाते. शिवाय उत्तीर्ण झालेल्यांना व्यवसाय करण्याचा परवानाही दिला जातो. ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाऊन्टस् कमिटी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाऊन्टिंग स्टँडर्ड बोर्ड या संस्थांशी संलग्न आहे. सी.ए. होण्यासाठीचे टप्पे- दहावी परीक्षेनंतर, सी.पी.आय. म्हणजेच कॉमन प्रोफिशिअन्सी टेस्टसाठी रजिस्टर व्हावे लागते. बारावीचा अभ्यास चालू ठेवून सीपीआयच्या परीक्षेला बसता येते. त्यात उच्चीर्ण झाल्यावर सी.ए.चा पुढचा टप्पा सुरू होतो.
१) ३ १/२ वर्षांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग
२) प्रोफेशनल कॉम्पिटन्सी कोर्स

आणि तिसरे म्हणजे संगणकाचे ज्ञान असायला हवे. म्हणून १०० तासांचे आयटीचे ट्रेनिंगही अनिवार्य करण्यात आले आहे. एकंदरित हा अभ्यासक्रम आजच्या जमान्यातील तंत्र आणि मंत्र सिद्ध करणारा आहे (तरीही सत्यमसारखे अविश्वसनीय- असत्यम् घोटाळे होतात, कारण मूळात अभ्यासक्रमात नैतिक-मूल्यांना थाराच नाहीए!)
पहिल्या दोन टप्प्यात व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर उत्तीर्ण झाल्यावर ‘आर्टिकल क्लार्क’ म्हणून नोंदणी करता येते व एक वर्षांचा प्रत्यक्ष कार्यानुभव घ्यावा लागतो. शिवाय संगणक प्रशिक्षणही अत्यावश्यक असते. सी.ए. झाल्यानंतर अकाऊंन्टस् ऑडिट व टॅक्स अशा तीन क्षेत्रांत करिअर करता येते. याखेरीज कॉस्टिंगचा कोर्स केल्यावर कॉस्ट अकाऊंन्टन्सी, इनवेस्टिगेशनची कामे करता येतात. स्वतंत्र व्यवसाय करायचा नसल्यास विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ- बँका, उत्पादन करणाऱ्या कंपन्यांत अकाऊंन्टस्, ऑडिट, टॅक्सेशन अशा विभागांत नोकरी मिळू शकते. फायनान्स कंपन्यांत तर पॉलिसी मेकिंगपासून, बिझनेस हेड, ऑपरेशन्स अशा अनेक जागांवर कामाची संधी मिळू सकते. कॅपिटल मार्केट, ट्रेझरी आणि मोठय़ा बिझनेस हाऊसेसमध्ये फायनान्स मॅनेजर, कंट्रोलर्स, अ‍ॅॅडव्हायजर्स ते डायरेक्टर-फायनान्स या उच्च पदापर्यंतही जाता येते. नवीन कंपनी प्रमोट करताना इश्युसंदर्भातील कामे, शेअर्स-बॉण्डस् व अन्य सेक्युरिटीजसंबंधातील कामे करता येतात. मार्केट रीसर्च, पॉलिसी, प्लॅनिंग, बजेट, इनव्हेंटरी कंट्रोल आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट अशा विविध अ‍ॅक्टिव्हिटिजमध्ये आपले प्रभुत्व सिद्ध करता येते.
प्रत्येक व्यावसायिक कामात सतत बदल होत असतात. कारण आजूबाजूची परिस्थिती, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय स्थिती सर्वच काही बदलत असते. हे बदल प्रत्येक व्यावसायिकाने केले, तर तो काळाच्या बरोबर राहून प्रगती करू शकतो. चार्टर्ड अकाऊंटंटस्साठी आयसीएआयतर्फे अनेक विशेष उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे केवळ पारंपरिक पुस्तकी शिक्षणापेक्षा आजची बाजारपेठेची गरज ओळखून व्यावसायिक धोरणात अनुरूप बदल केले जात आहेत. मुळात अकाऊंटस्, टॅक्सेशन या विषयांमध्ये व्यवसाय म्हणून, सरकारी धोरण म्हणून सतत बदल, फेरबदल होत असतात. ते वेळच्या वेळी जाणून त्याप्रमाणे बदल करणे हा व्यवसायाचा भाग असला, तरी त्यामुळे तीव्र अशा स्पर्धेत टिकणे जमवता येते.
चार्टर्ड अकाऊंटंटच्या विभागवार संस्था असतात. उदा. मुंबई चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशन (बीसीएएस) अशांच्यामार्फत सभासदांसाठी परिषदा घेणे, व्याख्याने आयोजित करणे अशा विविध उपक्रमांद्वारे सभासदांना व्यावसायिक दृष्टीने सतत अपग्रेड ठेवण्यात येते. इतर उद्योगातील, अर्थकारणातील, जागतिक स्थितीचे अवलोकन करण्याची संधी मिळते. व्यावसायिकांचे व्यवसाय कौशल्य वाढण्यास अशा असोसिएशनची मदतच होते. देशांतर्गत, देशाबाहेरील समव्यावसायिकांच्या वैचारिक आदान-प्रदानास वाव मिळू शकतो. ‘नॉलेज पोर्टल्स’ सभासदांना ज्ञान, माहिती व शंका-समाधान करू शकते. सी.ए. व्यावसायिक बँकांचे रेग्युलर ऑडिट, कनकरंट ऑडिटची तसेच स्टॅटय़ुटरी ऑडिटची कामे घेऊ शकतात. व्यक्तिगत टॅक्सेशन, कंत्राटी पद्धतीने कंपन्यांचे टॅक्सेशन पाहणे, टॅक्सेशनबाबतचे प्रश्न हाताळणे ही विविध कामे घेता येतात. प्रोजेक्ट फायनान्स रिपोर्ट करणे, बँक फायनान्स मिळवून देणे, अशी अनेक कामे कार्याचा विस्तारित भाग म्हणून वाढवता येतात. व्यवसायाची कार्यकक्षा निश्चितच रुंदावली जाते. नोकरी करणारा सीएदेखील आपल्या नोकरीच्या क्षेत्राच्या गरजेनुसार आपल्यात अपग्रेडेशन करू शकतो. उदाहरणार्थ टॅक्सेशन विषयाशी संबंधित लॉ डिग्री करणे किंवा एखादा विशिष्ट लॉचा डिप्लोमा करून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करता येते. उदाहरणच द्यायचे झाले तर आयसीएआयतर्फे सभासदांसाठी इंटरनॅशनल टॅक्सेशन, डेरीव्हेटिव्हज्, इनफरमेशन सिस्टिम्स ऑडिट, फोरेक्स ट्रेझरी मॅनेजमेंट असे असंख्य सर्टिफिकेट कोर्सेस घेतले जातात.
कॉस्ट अकाऊंटिंग (आयसीडब्ल्यूए)- कॉस्टिंग हा एक अकाऊंटन्सीपैकी महत्त्वाचा स्वतंत्र विषय. उत्पादन क्षेत्रात तर किफायतशीर कॉस्टिंगचे महत्त्व अधिक. सव्‍‌र्हिस क्षेत्रातही या फॅक्टरकडे विशेष लक्ष दिले जाते. कारण रिसेशन असो किंवा ग्लोबल ट्रेंड, जेव्हा मार्जिन्सवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा कॉस्टिंगकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कॉस्ट अकाऊंटन्सीमध्ये खालील स्तरांवर परीक्षा द्यावी लागते.
फाऊंडेशन : मॅनेजमेंट, अकाऊंटिंग, इकॉनॉक्स, बिझनेस फंडामेंटल्स, बिझनेस मॅथ्स व स्टॅटिस्टीक्स असे विषय असतात.
इंटरमीजिएट : फायनान्शियल अकाऊंटिंग, कमर्शियल व इंडस्ट्रियल लॉ, ऑडिटिंग, डायरेक्ट-इन-डायरेक्ट टॅक्सेस, कॉस्ट आणि मॅनेजमेंट ऑडिटिंग, ऑपरेशन मॅनेजमेंट आणि इन्फर्मेशन सिस्टिम्स.
फायनल : कॅपिटल मार्केट अ‍ॅनेलिसिस, कॉर्पोरेट लॉ, अ‍ॅडव्हान्स फायनान्शियल अकाऊंटिंग, कॉस्ट व ऑपरेशनल ऑडिट, बिझनेस व्हॅल्युएशन मॅनेजमेंट असे विविध विषय असतात.
वरील अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे ज्ञान पक्के करताना माहिती, रेग्युलेटरी, मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी व फायनान्शियल रिपोर्टिग अशा विविध संकल्पनांच्या आधारे व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
सीआयएमए : या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची पूर्व परीक्षा गेट वे स्कीम ज्यात आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण उमेदवारांना विशेष रजिस्ट्रेशन करता येते. सीपीजीए ही पूर्व परीक्षा देता येते.
चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटिंग (सीआयएमए) ही लंडन येथील संस्था आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात मॅनेजमेंट अकाऊंटिंग, फायनान्शियल अ‍ॅनेलिसिस, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट असे विषय खूप सखोल असा अभ्यास करण्यासारखे असतात.
मॅनेजरीअल स्तरावर - सहा परीक्षा
स्ट्रॅटेजिक लेव्हल - तीन परीक्षा

आणि टॉप सीआयएमए म्हणजे ज्याला टेस्ट ऑफ प्रोफेशनल कॉम्पिटन्स इन मॅनेजमेंट अकाऊंटिंग- या परीक्षेत एका केस स्टडीवर काम करावे लागते.
अमेरिकेतील सीपीए - सर्टिफाइड पब्लिक अकाऊंटंटस्
या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कोर्ससाठी ऑडिटिंग, बिझनेस लॉ, टॅक्सेशन आणि अकाऊंटिंग या चार मूलभूत विषयांकडे तपशीलवार पाहिले जाते.
जीएएपी (जनरल अ‍ॅक्सेप्टेड अकाऊंटिंग प्रिन्सिपल्स) : आंतरराष्ट्रीय स्टँडर्डप्रमाणे कंपन्यांनी आपले अकाऊंटस् लिहिताना, विविध फायनान्शियल स्टेटमेंट तयार करताना जागतिक तत्त्वे, धोरणे व प्रोसिजर्स पाळावी, अशी अपेक्षा आहे. विदेशातील गुंतवणूकदार जेव्हा आपल्याकडील किंवा अन्य राष्ट्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, तेव्हा त्यांना कंपनीच्या कारभाराबाबत, उलाढाली व नफ्याबाबत पारदर्शीपणा जाणवावा व त्यात सामायिक तत्त्वे पाळली जावीत या अपेक्षेने गॅप- तत्त्वे पाळली जावीत अशी अपेक्षा आहे. त्याबद्दलचं ज्ञान असेल तरच त्याप्रमाणे अकाऊंटस् व फायनान्शियल स्टेटमेंटस् तयार होऊ शकतात. अकाऊंटस्चा अभ्यास हा आता पूर्वीपेक्षा खूप विस्तारलेला आहे. नवनवीन क्षेत्रे, आव्हाने तयार होत आहेत. त्यासाठी आपण सजग-सुसज्ज असायला हवे.
राजीव जोशी
rmjoshi52@yahoo.co.in