Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

श्रीनिवासा रामानुजन भारतातील एक थोर गणिती. गणितातील कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेताही रामानुजनचे योगदान असामान्यच ठरते.
या महान गणितज्ज्ञाच्या सन्मानार्थ भारत सरकारने अलीकडेच ‘रामानुजन फेलोशिप’ ही नवीन अभ्यासवृत्ती सुरू केली आहे. ही फलोशिप जगभरातील विद्वान वैज्ञानिक आणि अभियंत्यांसाठी असून त्यांनी भारतात येऊन वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी प्रामुख्याने आहे. शिवाय विदेशात शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेलोशिपसाठी अर्ज करता येईल. रामानुजन फेलोला भारतातील कोणत्याही वैज्ञानिक संशोधन संस्थेत अथवा विद्यापीठात काम करता येईल आणि त्यांना भारत सरकारच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांच्या अनुदान योजनांमधून नियमित व आवश्यक तेवढा संशोधन भत्ता मिळविता येईल.
या फेलोशिपची सर्वात वैशिष्टय़पूर्ण बाजू म्हणजे विज्ञान विषयातील कोणत्याही अंगाचा यात समावेश केला जाऊ शकेल.
पात्रता: जगभरातील वयाची ६० वर्षे पूर्ण न केलेल्या सर्व गुणवान वैज्ञानिक आणि अभियंते या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतील. अर्जदाराकडे पदव्युत्तर पदवी (मास्टर्स इन इंजिनीयरिंग किंवा टेक्नॉलॉजी/ एमडी इन मेडिसीन) किंवा सायन्स/इंजिनीयरिंगमधील
 

पीएच.डी. वा तत्सम उच्चतम पात्रता असायला हवी. त्याचप्रमाणे अर्जदाराकडे पुरेसा व्यावसायिक अनुभवही हवा. ही फेलोशिपची निवडप्रक्रिया खूपच चोखंदळ असून रिसर्च पब्लिकेशन्स आणि तत्सम मान्यतांमधून अर्जदाराने आपल्या कामगिरी व कसदारपणाचा प्रत्यय दिलेला असावा.
पात्र वैज्ञानिकांना त्यांच्या इच्छेनुसार भारतातील कोणत्याही विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेत, विद्यापीठ विभाग किंवा अन्य प्रगत शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून काम करता येईल. मात्र ते संशोधन कार्य करू इच्छित असलेल्या संस्थेत त्यांच्या संशोधनाला पूरक आर अ‍ॅण्ड डी, प्रशासकीय तसेच अन्य पायाभूत सोयीसुविधांचे पुरेसे पाठबळ आहे की नाही याची खातरजमा केली जाईल. व्यक्तिगत वैज्ञानिक अथवा तंत्रज्ज्ञांना थेट शिक्षणसंस्थेशी संगनमत करून फेलोशिपासाठी आणि त्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी सुचविता येईल.
या फेलोशिपचा कालावधी हा प्रारंभी पाच वर्षांचा असेल. फेलोशिपच्या पहिल्या तीन वर्षांसाठी दरमहा ५०,००० रुपये, तर त्यानंतरच्या दोन वर्षांसाठी दरमहा ६०,००० रुपये विद्यावेतन स्वरूपात मिळविता येईल. या व्यतिरिक्त प्रत्येक फेलोला परिषदांना हजेरी व अन्य खर्चाची तरतूद म्हणून वार्षिक पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल. रामानुजन फेलोला प्रदान केले जाणारे अनुदान हे भारत सरकारच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांच्या विविध योजनांमधून दिले जाईल.
या फेलोशिपसाठी संस्थांकडून दाखल होणारे वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञांचे नामांकन हे वर्षभरात केव्हाही दाखल केले जाऊ शकेल. या योजनेसाठी त्यामुळे अर्ज दाखल करण्याची विशिष्ट मुदत अशी काहीही नाही.
संपर्क: रामानुजन फेलोशिप, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार), तंत्रज्ञान भवन, न्यू मेहरौली रोड, नवी दिल्ली- ११००१६.
चंद्रगुप्त अमृतकर
globalfeatures@lycos.com