Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

यशाचा नवा मार्ग
यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे असंख्य मार्ग असतात पण अशा शिखरावर विराजित करणारी शिडीच हाती लागली तर रवी फाळके यांच्या ‘सफलता की सिढी एबीसीडी’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन ठाणे येथे झाले. एकापेक्षा एक प्रभावी अशी उदाहरणं या पुस्तकात भरभरून आहेत. हे पुस्तक हिंदी भाषेत असून अगदी सहज सोप्या भाषेत त्यात मार्गदर्शन केलेलं
 

आहे. एबीसीडी या अक्षरांचा अगदी सुंदर वापर यशाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांसारखा झालाय. ज्यांच्या आयुष्यात मरगळ आलीय, ज्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक खूपच फायद्याचे आहे. टेरी फॉक्स, सी. व्ही. रामण, सिल्व्हेस्टर स्टॅलियन यांची उदाहरणं बरीच मोठी प्रेरणा देऊन जातात. यशाच्या दिशेने घेऊन जाणारे सर्व मुद्दे त्यात समाविष्ट करण्यात आलेले असल्यामुळे यशाचा छोटेखानी ग्रंथच तो म्हणता येईल. आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून उद्बोधन करणाऱ्या रवी फाळके यांनी आपल्या अनुभवविश्वातून ही पुस्तकरूपी प्रेरणा सर्वासमोर आणलेली आहे. लक्ष्यप्राप्तीकरिता तुम्ही मनातून नेहमी तरुण असायला हवं, त्याचबरोबर तुमच्याकडे चिकाटी आणि एक प्रॅक्टिस करण्याची मानसिकता हवी. विशेष म्हणजे योग्य सवयी जडवत जबरदस्त आत्मविश्वास असायला हवा. लक्ष्य मोठे स्वप्न तसे एकाग्रतेचे जीवनातले महत्त्व स्पष्ट करून रवी फाळके एकापेक्षा एक अप्रतिम उदाहरणांची बरसात करतात. खूप खूप यश मिळवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे हे पुस्तक असायलाच हवं. तुमचं जीवन चांगल्या दिशेने नक्कीच आगेकूच करेल.
सन हाऊस पब्लिकेशन
पृष्ठे १०० किं मत - १०० रुपये
फोन- २५२२४७८४, ९८३३९८६०७४.