Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ फेब्रुवारी २००९
सूचना
ही आहे व्हिवा सोसायटी. या सोसायटीमधली वेगवेगळी कुटुंब, त्यातील सदस्य वाचकांच्या भेटीस येतील, ‘घरोघरी’ मधून..
अवंतिका : आई, नमस्कार करते.
अनुराधा : यशस्वी भव. छान पेपर सोडव आणि छान मार्क मिळव; पण देवाला नमस्कार केलास की नाही?
अवंतिका : केला तर. सगळ्यात आधी देवाला नमस्कार करायचा, हे मी कसं विसरेन? आणि अगदी लहानपणापासून सांगत आलेय तसं सांगितलंही..
अनिरुद्ध : .. की मी मेहनत केलीच आहे पण माझ्या मेहनतीला तुझी साथ असू दे. मी केलेल्या कष्टांचं चीज होऊ दे.
अवंतिका : करेक्ट आणि देवाला अशी रिक्वेस्ट केली ना की, एकदम खूप कॉन्फिडंट वाटायला लागतं.
अनिरुद्ध :and success follows confidence, right?
अवंतिका : absolutely
अनुराधा : अवंतिका, आजी-आजोबांच्या फोटोलाही नमस्कार कर.
अवंतिका : केला. देवानंतर त्यांनाच नमस्कार केला.
अनुराधा : आणि बाबाला?
अवंतिका : अगं, तो आंघोळीला गेलाय. आंघोळीहून आला की, त्यालाही करते.
अनिरुद्ध : and what about me sis?
अवंतिका : तुलाही करते. तसाही तू माझ्यापेक्षा मोठाच आहेस, पण खरं सांगू का? आज सगळ्यांच्या बेस्ट विशेष मला हव्या आहेत. पहिला पेपर चांगला गेला ना की मग नो प्रॉब्लेम.
अनिरुद्ध : मराठीचाच पेपर आहे ना? मग त्याचं काय एवढं टेन्शन? मराठी म्हणजे होम पिच.
अवंतिका : हो रे! पण मला लँग्वेजेस हार्ड जातात, त्याचं काय! आणि नेमके सुरुवातीचे तिन्ही पेपर लँग्वेजेसच आहेत. त्यामुळं टेन्शन आलय. ते व्यवस्थित गेले ना की, नैया पार झालीच..
अनुराधा : अवंतिका आता असा विचार करू नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. स्वत:वर विश्वास ठेव. तू छान, मनापासून अभ्यास केला आहेस. आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. मग सगळं नीटच होईल. बरं चल, तुझी सगळी तयारी झाली का? बाबा पाच मिनिटांत तयार होईल. तो तुला सोडेल आणि पुढं जाईल. त्यामुळे तू कपडे बदलून घे आता.
अवंतिका : आई, अगं, मी कपडे बदललेलेच आहेत.
अनुराधा : तू हा ड्रेस घालून जाणार आहेस?
अवंतिका : हो. यात काय वाईट आहे?
अनुराधा : अगं, पण हा ड्रेस तू बाद केला होतास ना? किती जुनाट दिसतोय. दुसरा घाल.
अवंतिका : नको हाच असू दे. आता कपडे बदलत बसायला वेळही नाही.
अनिरुद्ध : वेळ नाहीये की, बदलायचाच नाहीये.
अनुराधा : म्हणजे?
अनिरुद्ध : आई, अगं, हा तिचा ‘लकी ड्रेस’ आहे. हा ड्रेस घालून गेलं की तिला पेपर छान जातो.
अनुराधा : अगं बाई, म्हणजे आता सगळे दिवस तू हाच ड्रेस घालून जाणार?
अनिरुद्ध : काही तरीच काय आई! फक्त पहिल्या दिवशी. तिच्या दृष्टीनं परीक्षेच्या पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो.वेल बिगन इज हाफ डन तसं.
अवंतिका : तुम्ही का चर्चा करताय माझ्या कपडय़ांबद्दल.
अनुराधा : बरं ते जाऊ दे. बाकी तयारी झालीये ना? पेनं-बिनं नीट घेतलीस ना! बघू दे मला कंपास. हे काय? दोनच पेनं घेतली आहेस. भाषा विषय आहे ना आज? खूप लिहावं लागतं हं.
अनिरुद्ध : अवंतिका, चार पेनं जास्तीची ठेवलीस तर काही बिघडेल का? त्यानं काय वजन वाढणार आहे का सॅकचं? त्यात तुला इंक पेननं लिहायची कोण हौस. अक्षर चांगलं येतं वगैरे सगळं ठीक आहे पण they are too messy. . त्याऐवजी जेलपेन्स वापर. परवा बाबानं अख्खा बॉक्सच आणून टाकलाय. थांब, मी आणून देतो तुला.
अनुराधा : आणि मोठी पट्टी कुठं दिसत नाहीये ती..
अवंतिका : आई, आज मराठीचा पेपर आहे. खरं तर पेनाखेरीज कंपासमधलं काहीच लागणार नाहीये.
अनुराधा : नाही कसं? मोठय़ा पट्टीनं समास पटकन आखता येतात. छोटय़ा पट्टीनं वेळ लागतो.
अनिरुद्ध, : ए अनिरुद्ध येता येता ती मोठी पट्टीही घेऊन ये रे.
अविनाश : आणि हॉल तिकीट घेतलं का? ते सगळ्यात महत्त्वाचं. ते नसेल तर परीक्षेला बसू देणार नाहीत हं.
अनुराधा : हॉल तिकीट हे असं नुसतंच काय टाकलं आहेस? चुरगळेल ना ते!
अनिरुद्ध : ते छोटं प्लास्टिकचं फोल्डर घेऊन ये. अवंतिका, अगं, इतक्या महत्त्वाच्या गोष्टी नीट ठेवाव्यात. घरात सगळं आहे, त्याचा वापर करा ना!
अविनाश : ते जाऊ दे गं. आणि हे बघ अवंतिका, पेपरवर नंबर नीट लिही. दोन-दोनदा चेक कर.
अनिरुद्ध : बाबा, आता नंबर लिहावा नाही लागत. बार कोड चिकटवला की झालं.
अविनाश : अरे पण पुरवणीवर तर लिहावा लागतच असेल ना! आणि पुरवण्यांवर पान क्रमांक घालायला विसरू नकोस. त्या क्रमांकांप्रमाणेच पुरवण्या जोड. दोऱ्याची गाठ नीट बसलीये ना चेक कर. नाही तर दोराच सुटून जायचा.
अनुराधा : आणि अक्षर नीट मोकळं ढाकळं काढ. उगीच किरटय़ा किरटय़ा बारीक अक्षरात पेपर लिहू नकोस. काही चुकलं तर त्याच्यावर सरळ काट मार आणि नव्यानं लिही. तिथल्या तिथे चूक सुधारायचा प्रयत्न करू नकोस.
अविनाश : आणि खोडलंस ना तरी पूर्णपणे खोड. उगीच खोडल्यान् खोडल्यासारखं करू नकोस.
अनुराधा : पण शक्यतोवर मनाशी आधी उत्तर तयार करून घे आणि मगच लिही. म्हणजे खाडाखोड होणार नाही. खाडाखोड, गिचमिड अक्षर, अव्यवस्थितपणा यानं इम्प्रेशन वाईट होतं.
अविनाश : पेपर आधी नीट वाच. काय काय येतच याचा अंदाज घे. सोपे प्रश्न आधी सोडव. नंतर अवघड प्रश्नांना हात घाल.
अनिरुद्ध : मुख्य म्हणजे पेपर वाचताना धांदरटपणा करू नकोस. नाही तर विचारलं असेल एक आणि तू दुसरच काही तरी लिहिशील.
अवंतिका : बास हं अनिरुद्ध मी म्हणजे काही तू नाही.
अनुराधा : ए चला आता. भांडत बसू नका आणि अनिरुद्ध, तिला आता चिडवू नकोस हं, ही काय वेळ आहे चिडवा चिडवीची!
अनिरुद्ध : आई, अगं, अवंतिका चिडली ना की, बेस्ट परफॉर्मन्स देते. आताही तू रागावली असशील ना तर आजचा पेपर एकदम कंडा जाणार बघ तुला.
अवंतिका : Hope so...
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com