Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

पूर्वापार चालत आलेली दुय्यम भूमिका बदलत मुलींनी प्रेमाच्या या फ्रंटवरही पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या निवडीवर आणि ‘सिक्स्थ सेन्स’वर विश्वास असणाऱ्या आजच्या मुलींच्या मानसिकतेत घडणारा हा बदल अलीकडेच घेण्यात आलेल्या एका पाहणी अहवालातून स्पष्ट झाला आहे.

मुलं आपलं प्रेम सरळसोट प्रपोज करून व्यक्त करतात, तर मुली शब्दावाचून समजवण्याचे इतर मार्ग शोधतात, असं काहीसं मानलं जातं खरं.. पण ‘फर्स्ट मूव्ह’ करण्यात आता मुली काही मागे नाहीत, हे एका पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. हे मुंबई किंवा दिल्लीच्या मुलींबाबत बोललं जातंय, असं जर तुम्हांला वाटत असेल, तर ते साफ चुकीचं आहे. यात सरशी आहे ती चंदिगढच्या मुलींची !
‘इंडियाना युनिव्‍‌र्हसिटी’ने केलेल्या एका पाहणीत असं स्पष्ट झालंय, की कधीतरी आपल्या आवडत्या मुलाला आपल्या भावना समजून येतील, याची वाट बघून मुली न बोलता खरं तर वेळ वाया घालवीत असतात. कारण त्यांचे ‘नॉन व्हर्बल सिग्नल्स’ पुरुषांच्या मेंदूपर्यंत पोहोचतातच, असे नाही. कारण मुलांना ही केवळ मैत्रीची चाहूल वाटत असते, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणूनच की काय, मुलींनी आपली पूर्वापार

 

चालत आलेली दुय्यम भूमिका बदलत प्रेमाच्या या फ्रंटवरही पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात फ्रेग्रन्स बाजारपेठेतील एक आघाडीचं नाव असलेल्या ‘एक्स’ या ब्रँडच्या रीसर्च लॅबने केलेल्या पाहणीत याला दुजोरा मिळत आहे. या पाहणी अहवालात असं स्पष्ट करण्यात आलं आहे, की एखाद्या मुलीने जर आपला फोन नंबर देऊ केला, तर देशाच्या महानगरांतील ७१ टक्के पुरुषांना त्याबद्दल ‘पॉझिटिव्ह’ नि ‘एक्सायटिंग’ वाटतं आणि यात चंदिगढच्या ‘सोनी कुडीं’नी बाजी मारली आहे. चंडिगढच्या शंभर टक्के मुली या मुलाशी झालेल्या पहिल्या भेटीत आपला फोन नंबर देण्यास तयार असतात. त्यातील ९१ टक्के मुली म्हणतात की रोमान्स सुरू ठेवण्यात फोन हे सर्वात उत्तम माध्यम आहे आणि मुलांच्या फोन मॅनर्सवरूनही मुली त्यांचं व्यक्तिमत्त्व जोखण्याचा प्रयत्न त्या करतात, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
या ‘डेटिंग - मेटिंग गेम’मध्ये आज फोन हे सर्वात परिणामकारक माध्यम ठरतंय. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीही हा फोन आजच्या तरुणाईला उपयुक्त ठरतोय, हेही निरीक्षण पाहणी अहवालात मांडण्यात आलंय. कारण प्रेमाची कबुली फोनवरून रीतसर देताना प्रतिक्रिया मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक, ती दाणकन आदळण्याची भीती नसते, हा विचार आजची तरुणाई मनावर घेऊ लागल्याचेच यातून स्पष्ट होते.
छाप पडलेल्या पसंतीच्या मुलांना आपला फोन नंबर हौशीने देण्यात चंदिगढच्या मुलींचा पहिला क्रमांक लागतो, नि त्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरू इथल्या मुलींचा, असंही दिसून आलं आहे.
या पाहणीदरम्यान ५३ टक्के मुलींनी सांगितलं, की आवडत्या व्यक्तीला फोनवरून संपर्क करण्यात प्रायव्हसी आणि सुरक्षितताही असते. पसंत पडलेल्या एखाद्या मुलाला फोनवरून संपर्क करण्यात मुलींना कुठेही चूक वाटत नाही, असंही निरीक्षण या अहवालात मांडलं गेलंय. डेटवर जाण्याआधी मुलाला आपल्या भावना कळवण्यासाठी आपण स्वतहून त्याला संपर्क साधतो, असं या पाहणीत ७१ टक्के मुलींनी कबूल केलं आहे.
एखाद्या कॅफेमध्ये अथवा युनिव्हर्सिटीच्या आवारात एखाद्या मुलासोबत डेटिंग करण्यात काही वावगं नाही, असंही ६७ टक्के मुलींना वाटतं. कुठे राहतो हे सांगण्यापेक्षा फोन नंबर एक्स्चेंज करणं कधीही चांगलं, असंही मनोगत ७१ टक्के मुलींनी व्यक्त केलंय.
अशा तऱ्हेने आकर्षित झालेल्या मुलाला आपणहून संपर्क करण्यात आणि आपल्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करण्यात आज मुली कचरत नाहीत आणि त्याबद्दल अपराधीपणाची भावनाही त्यांच्या मनात नसते, हेही या पाहणी अहवालाच्या निरीक्षणात मांडण्यात आलं आहे.
एसेमेसच्या ओघावरून एखादं नातं हे अधिक घट्ट होत असल्याचं आणि त्यानंतर फोनवरील लांबचलांब संभाषणावरून हे नातं अधिक दृढ झाल्याचा प्रत्यय येतो, असंही ७३ टक्के मुलींना वाटू लागलंय.
आपल्या निवडीवर आणि ‘सिक्स्थ सेन्स’वर विश्वास असणाऱ्या आजच्या मुलींच्या मानसिकतेत घडणारा हा बदल या अहवालातून स्पष्ट होतोय, एवढं मात्र खरं.
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com