Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

पैसे वाचवणं म्हणजेच पैसे कमावणं हा मधल्या काळात काहीसा कालबाह्य झालेला विचार आताच्या मंदीच्या काळात पुन्हा एकदा गंभीरपणे घ्यायची वेळ आलेली आहे. कंजूसपणा करण्यात काहीच चुकीचे नाही, उलट तसे कराल तर तुम्ही ‘लेटेस्ट ट्रेन्ड’ अनुसरत आहात, असं समजलं जाईल. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैसे वाचवलेत, तर मानसिक ताणतणावातून आपोआपच सुटका करून घेऊ शकता, असा सध्याच्या काळातला अत्यंत आवश्यक सल्ला मिळतो, ‘विमेन्स टुडे’च्या ऑनलाईन एडिशनमधून.
फेब्रुवारी महिना तसं म्हटलं तर सगळ्याच मासिकांच्या पानापानांतून नेहमीसारखाच सजलेला आहे, ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या गुलाबी रंगाने. गिफ्ट्स, रोमॅन्टिक डेआऊटस्च्या योजना, त्यासाठीच्या मेकअप टिप्स, पेहराव याबद्दलच्या मजकुरांनी ही मासिकं सजली आहेत. पण तरीही जगभरातल्या स्त्रियांना, मुलींना व्हॅलेन्टाईनच्या गुलाबी रंगापेक्षा महत्त्वाचं वाटतंय आज संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी केव्हाही स्वत:च्या किंवा नवऱ्याच्या हातात पडू शकणाऱ्या ‘पिन्क स्लिप’चं टेन्शन. मध्यंतरीच्या काळात हातात येत गेलेला मुबलक पैसा आणि आता अचानक डोक्यावर नोकरी गेल्यावर कर्जाचे हप्ते
 

फेडायचे कसे, ही टांगती तलवार त्यांना सतावतेय. घर सांभाळण्याची मुख्य जबाबदारी स्त्रियांची म्हटल्यावर तणावाचे प्रतिबिंब स्त्रियांच्या मासिकांमधून ठळकपणे उमटावे, अशी अपेक्षा असली तरी आपल्या देशात कदाचित हा प्रश्न अजून सर्वाना तितकासा जिव्हाळ्याचा झालेला नसणार, कारण अजून इथल्या कोणत्याच मुख्य प्रवाहातील मासिकांमधून म्हणावा तितक्या गांभीर्याने तो हाताळला गेलेला नाही. परदेशी मासिकांच्या ऑनलाइन आवृत्त्यांमध्ये आणि ब्लॉग जगतात मात्र मंदीच्या काळावर मात करण्यासाठी साधेसोपे नियम (सिम्पल रुल्स) कसे पाळावे, याची चर्चा सुरू आहे. सिम्पल (S.I.M.P.L.E.) म्हणजे एस- सीकलेस स्टफ, आय- इन्व्हेस्ट विथ इन्टेन्शन, एम- मेन्ड अ‍ॅण्ड मेक डू, पी- प्लॅन आऊट स्पेन्डिन्ग, एल- लेट गो अ‍ॅण्ड बी सरप्राइज्ड, ई- एन्जॉय लाईफ्स लिटिल प्लेझर्स.
स्त्रियांना अजून एक उपयोगी सल्ला देणारा चांगला लेख आहे, ‘फेमिना’च्या नव्या अंकात. न सोडवता येणारा भावनिक गुंता हे स्त्रियांच्या बहुतेक सर्व भावनिक समस्यांचे मूळ. पुरुष जास्त चांगले आणि भावनिक आयुष्य जगू शकतात. कारण मुळात ते असा गुंताच होऊ देत नाहीत. त्या बाबतीत ते स्त्रियांपेक्षा शंभर पटीने जास्त ‘सुलझे हुए’ असतात यात शंकाच नाही. तेव्हा स्त्रियांनी छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा ‘बाऊ’ न करणे, कुणी समजून घेईल ही अपेक्षा न बाळगत स्वत:ला काय हवंय आणि वाटतंय ते शब्दांत स्पष्ट करून सांगणे, जे प्रश्न सुटूच शकत नाहीत त्यातून स्वत:ची सुटका करून घेणे, स्वत:ला आणि इतरांना आवश्यक तो मोकळा अवकाश देणे (‘मी टाईम’ संकल्पना अमलात आणणे) आणि सर्वात महत्त्वाचे स्वत:चे शरीर दागदागिने/ कपडेलत्ते/ प्रसाधने यांनी सजण्यात अवास्तव वेळ न घालवता त्यात सोपेपणा आणणे. बाकी मासिकांमध्ये या वेळी साहजिकच ‘स्लमडॉग मिलियनेर’वाल्या फ्रिडा पिन्टोचे फोटो जास्तीत जास्त झळकताहेत. ‘न्यू वुमन’च्या ताज्या अंकात भारतात चित्रांचं प्रदर्शन भरवायला आणि इथल्या विविध निसर्गरम्य हिलस्टेशनवर तसेच लेणी असलेल्या परिसरात हिंडून चित्र काढण्यासाठी आलेल्या नताशा लॉ (हॉलीवूड अ‍ॅक्टर ज्यूड लॉची बहीण) आणि नताशा किस्सेल या दोन गुणी ब्रिटिश मैत्रिणींची करून देण्यात आलेली ओळख वाचनीय आहे.
शर्मिला फडके
sharmilaphadke@gmail.com