Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाशी संलग्न असणारे शिक्षक, प्रशिक्षक व तज्ज्ञ मंडळींची राष्ट्रीय शैक्षणिक परिषद मध्यंतरी नागपूर येथे झाली. त्यानिमित्ताने..
कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाशी संलग्न असणारे शिक्षक, प्रशिक्षक, व तज्ज्ञ मंडळी यांची राष्ट्रीय शैक्षणिक परिषद मध्यंतरी नागपूर येथे पार पडली. या परिषदेला महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, केरळ, मेघालय, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतून अधिकारी मंडळी उपस्थित होती. एन. सी. ई. डी. (National Convention of Educators of the Deaf India) च्या महाराष्ट्र विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेला अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान व राष्ट्रीय पुनर्वास परिषद (Rehabilitation Council of India) यांचे सहकार्य लाभले होते. या परिषदेत शिक्षण क्षेत्रात काम करणारी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी आली होती. या परिषदेच्या निमित्ताने एन.सी.ई.डी च्या वेबसाईटचे उद्घाटन झाले व विविध तज्ज्ञांचे लेख असलेल्या वार्षिक अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.
 

या परिषदेच्या निमिताने एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, अनेक तरुण या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असून, ते कर्णबधिर मुलांच्या प्रगतीसाठी धडपडत आहेत.
राष्ट्रीय अपंग पुनर्वास संस्थान (Rehabilitation Council of India) चे सदस्य सचिव जे. पी. सिंगही यावेळी उपस्थित होते. १९८६ साली स्थापन झालेल्या या संस्थेने २२ वर्षांंत अपंग मुलांच्या शिक्षणासाठी, शिक्षकांसाठी जे विविध उपक्रम राबविले जातात, याची माहिती त्यांनी दिली.
मनोजकुमार ( मुख्य आयुक्त, अपंग आयुक्तालय, नवी दिल्ली) यांनी उपस्थितांना या परिषदेतून ज्ञानाची पुंजी घेऊन जाण्याचे आवाहन केले. तर सामान्य शाळांतील शिक्षक व विशेष शाळांतील शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ संगीता गोळे यांनी व्यक्त केली.
एन. सी. ई. डी. या संस्थेच्या अध्यक्षा वर्षां गट्टू परिषदेला उपस्थित होत्या. नावीन्याचा ध्यास व संशोधक वृत्ती हे वर्षां गट्टू यांचे वैशिष्ट्य. १९३५ साली स्थापन झालेल्या एन. सी. ई. डी.ने वर्षां गट्टू यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या पाच-सहा वषार्ंत चांगलीच भरारी घेतली आहे.
राष्ट्रीय परिषदेचं शिवधनुष्य उचलण्याच्या निमित्ताने वर्षांताईंनी स्वत:च्या प्रगतीचा आलेख उलगडला. ‘बालविकास’ या विषयात एम.एस्सी केल्यावर वर्षांताईंनी ‘चाईल्ड केअर सेंटर’मध्ये काम केले. तेथेच त्यांना अपंगांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी अलियावर जंग संस्थेतून त्यांनी बी.एड् केले. ‘रोचीराम थडानी शाळा’, चेंबूर इथे शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांना अमेरिकेची ‘इंटरनॅशनल अ‍ॅम्बसिडर स्कॉलरशिप’ मिळाली. ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर दि डेफ’ या वॉशिंग्टन येथील संस्थेत ‘स्पीच व हिअरींग’ या विषयांत मास्टर्स डिग्री मिळविली. तेथून आल्यावर चेंबूरच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून पदभार सांभाळला. पुढे त्यांनी अलियावर जंग राष्ट्रीय श्रवणविकलांग संस्थान, बांद्रा येथे शिक्षण विभागात रीडर व विभागप्रमुखाची जबाबदारी सांभाळली.
अलियावर जंग या संस्थेबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. संस्थेत पाच पातळ्यांवर काम चालते.
मनुष्यबळ विकास (Man power Development) - या विभागातर्फे दीर्घकालीन व अल्पकालीन मुदतीचे अभ्यासक्रम राबवण्यात येतात.
अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रमात गावोगावी ‘रिफ्रेशर कोर्सेस’ चालविले जातात. तसेच ‘वस्ती शाळा’ चालविली जाते. या शाळांअंतर्गत मागे पडलेली, रस्त्यावरची मुलं यांना शिक्षण दिले जाते.
पूर्व प्राथमिक प्रशिक्षण (Pre School Training) मुंबई व मुंबईच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन केले जाते.
A. V. T. Center (Audio Verbal Training) ‘कॉकलिअर इम्प्लांट’ या प्रकारचे ऑपरेशन झालेल्या मुलांना ऑपरेशनपूर्वी व ऑपरेशननंतर प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे मुलांची ऐकण्याची व बोलण्याची क्षमता वाढते.
संशोधन विभाग (Research Dept.)- कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवनवीन संशोधन केले जाते.
परीक्षेशी निगडित उपक्रम - अपंग पुनर्वास परिषदेतर्फे भारतात ५२ ठिकाणी कर्णबधिरांसाठी पदविका (D.Ed.) अभ्यासक्रम राबवले जातात.
कर्णबधिरांसाठी वर्षां गुट्टूंबरोबर साधना सप्रे, स्मिता पेस, अमिता बुर्डे, सरस्वती सुंदर या त्यांच्या सहकारी निरपेक्ष भावनेने व समरसून काम करतात. कर्णबधिरांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढील वर्षीही याच मंडळींनी काम करावे, असा आग्रह सर्व सभासदांनी परिषदेत केला. पुढील वर्षीच्या परिषदेची जबाबदारी केरळच्या सभासदांनी घेतली.
परिषदेत सर्वसमावेशक शिक्षण, शिक्षकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन, पालकांमध्ये जागृती, प्रसारमाध्यमांचे शिक्षणातील स्थान व समाज जागृती अशा अनेक विषयांवर विचार मांडण्यात आले. या परिषदेत कर्णबधिरांच्या शिक्षणासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने अनेक बाबींचा विचारही करण्यात आला. तसेच राज्य, जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर काम करणाऱ्या विविध तज्ज्ञांनी व शिक्षकांनी आपले शोधनिबंध सादर केले.
कर्णबधिरांच्या शिक्षणासाठी लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलण्याच्या विचारानेच या परिषदेची सांगता झाली.
शोभा नाखरे