Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भारतीय प्रादेशिक भाषेतील लेखिकांचे साहित्य होणार ‘ग्लोबल’!
प्रतिनिधी

भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये लेखिकांनी लिहिलेल्या निवडक साहित्याला आता ‘ग्लोबल’ स्वरूप

 

मिळणार असून हे साहित्य इंग्रजीत अनुवादित होणार आहे. पाच खंडांमधून या निवडक साहित्याचा अनमोल ठेवा वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यापैकी पहिला खंड प्रकाशित झाला आहे.
भारतीय प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार आणि निवडक साहित्य अन्य प्रादेशिक भाषेत अनुवादीत होण्याचे काम सुरू असते. त्यामुळे कन्नडमधील चांगले साहित्य मराठीत किंवा मराठीतील उत्तम साहित्य अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित होते. मात्र आता भारतीय प्रादेशिक भाषांमधील विविध लेखिकांचे साहित्य आता इंग्रजीत अनुवादित झाल्यामुळे ते जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे. पुस्तक विक्रीतील एक अग्रणी ‘क्रॉसवर्ड’च्या केम्सकॉर्नर येथील शाखेत ‘हॉट इज द मून’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथात कन्नड, तामिळ, तुळू आणि कोकणी भाषेतील लेखिकांनी लिहिलेले साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चार प्रादेशिक भाषांमधील लघुकथा, कविता यांचा या ग्रंथात समावेश आहे.
‘हॉट इज द मून’ या र्गंथाचे संपादन अरुंधती सुब्रमण्यम यांनी केले आहे. या पुस्तकानंतर लवकरच अन्य प्रादेशिक भाषांमधील निवडक साहित्याचे ग्रंथ प्रकाशित होणार आहेत. यामध्ये २३ भारतीय प्रादेशिक भाषांमधील ८७ लेखिकांचा समावेश आहे. या लेखिकांच्या निवडक साहित्यात लघुकथा, कविता, कथा आदी साहित्याचा समावेश आहे. ‘हॉट इज द मून’ या ग्रंथात कन्नड साहित्यातील बानू मुश्ताक, मित्रा वेंकटराज, कनका, तुलसी वेणुगोपाल, वैदेही तर तामिळ साहित्यातील बमा, कुट्टी रेवती, सलमा, मलाथ्या मैत्री यांचा, तुळू साहित्यातील एम. जानकी ब्रह्मवरा, सुनीता शेट्टी आणि कोकणी साहित्यातील हेमा नाईक व जयंती नाईक यांचा समावेश आहे. अन्य ग्रंथातील साहित्याच्या निवडीचे काम सुरू असून हे गं्रथही लवकरच प्रकाशित होणार
आहेत.