Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

आज भारताने जगभरात केलेल्या लक्षवेधी प्रगतीमागे विज्ञान हे एक महत्त्वाचे कारण आहे. ही प्रगती कायम टिकवायची असेल किंवा वाढवायची असेल तर या क्षेत्रात अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी लावावी लागेल. ही जबाबदारी प्रामुख्याने पार पाडावी लागेल ती, शिक्षक आणि मराठी विज्ञान संस्थेसारख्या संस्थांना. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था त्या दृष्टिने पावले टाकते आहे.. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांंना त्यांची उत्सुकता शमविण्यासाठी इंटरनेटचे जाळे उपलब्ध आहे. पण एखाद्या चौकस मराठी मुलाला प्रश्न पडले तर त्याने काय करायचे? त्यासाठी मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा, असे नेहमी म्हटले जाते. पण मराठी विज्ञान परिषदेशी संपर्क साधला त्यावेळेस वेगळेच वास्तव समोर आले. विज्ञान परिषद प्रयत्न करते आहे. पण मराठी शाळाच उदासिन आहेत.. आज साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्ताने आपण हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊन त्यादृष्टीने पुढची पावले टाकली तर विज्ञानदिन खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखे होईल!

विज्ञान हा प्रयोगाने शिकविण्याचा विषय : प्रा. प्रधान
नीरज पंडित

विज्ञान हा विषय पुस्तक वाचून शिकविता येत नसून तो अनुभवाने शिकविणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे मत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक हेमचंद्र प्रधान यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले आहे. विज्ञान हा विषयाला अनुभवांपासून दुरावता येणार नाही. हा विषय पूर्णपणे अनुभवांशी निगडीत आहे. वर्गात शिक्षकाने किंवा पालकांनी अधोरेखित करुन दिलेले एखादे उत्तर पाठ करुन परीक्षेत ते उतरविणे ही आपल्याकडची रूढ पद्धत अत्यंत चुकीची आहे. परीक्षांना देण्यात येणाऱ्या अवाजवी महत्त्वाचा हा परिणाम असल्याचेही ते म्हणाले.

विज्ञानाबाबत मराठी शाळा उदासीन
सुनील डिंगणकर

विज्ञान विषयाचे केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा विषय रंजक पद्धतीने समजावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम शाळेत राबविले जावेत किंवा शाळेने विद्यार्थ्यांना या उपक्रमांसाठी विज्ञान परिषदेच्या वास्तुमध्ये पाठवावे यासाठी विज्ञान परिषदेचे प्रतिनिधी विविध शाळांशी संपर्क साधत असतात. पण याबाबतीत मराठी शाळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खास शनिवार-रविवारची वेळ राखून ठेवलेली असते. पण या व्याख्यानांसाठीही मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची उपस्थिती अजिबात नसते. एकूणच मराठी शाळा याबाबतीत उदासीन असल्याचे विज्ञान परिषदेच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

शत्रूला ओळखण्याची वेडय़ा राघूची पद्धत
अभिजीत काळे, पुणे यांना २००० साली मराठी विज्ञान परिषदेचा कै. शरद नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘विज्ञान संशोधन पुरस्कार’ मिळाला. त्यांच्या संशोधनाचा विषय होता, ‘पक्षी आपल्या शत्रूला कसे ओळखतो?’ हा प्रकल्प त्यांनी आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथे इ.रू. ला असताना (मे २०००) केला होता. अभिजीत आणि त्यांच्या मित्रांनी ‘पक्ष्यांमध्ये मनुष्यप्राण्याप्रमाणेच लक्षात ठेवण्याची काही पद्धती असते का?’ या विषयावर संशोधन केले होते. त्यासाठी त्यांनी ‘वेडा राघू’ (स्मॉल ग्रीन बी. इटर) या पक्ष्याची निवड केली. ‘पक्षी त्यांच्या शत्रूला कसे ओळखत असतील?’ याचे संशोधन त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केले.वेडा राघू हा हिरव्या रंगाचा कीटकभक्षी पक्षी आहे.

केळ्याच्या सालीपासून बिस्किटे
केळी आपण खातो आणि साल फेकून देतो. म्हणजेच केळ्याची साल आपल्या दृष्टीने टाकाऊ भाग आहे. तर अशा या टाकाऊ भागाचा सुद्धा वापर आपल्या अन्न घटकांत कसा करून घेता येईल याचा यशस्वी प्रयत्न आपल्या प्रकल्पातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केला आहे आणि मराठी विज्ञान परिषदेचा सन २००४ सालचा दहा हजार रुपयांचा संशोधन पुरस्कार पटकावला आहे. ही आहे कुमारी रिचा विनय जोशी, नांदेड येथील विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी. तिच्या प्रकल्पाचा विषय होता. ‘केळ्याच्या सालीच्या लगद्यापासून कमी उष्मांक असलेली बिस्किटे.’

अंतिम टप्प्यातील पुनर्विकास..
पुस्तक खरेदीवर मिळणार ८० टक्के सवलत

प्रतिनिधी : ऑक्सफर्ड बुकस्टोअर्सच्या चर्चगेट येथील पुस्तकांच्या दुकानात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनात पुस्तक खरेदीवर जास्तीत जास्त ८० टक्के तर अन्य सर्वप्रकारच्या पुस्तक खरेदीवर कमीतकमी दहा टक्के इतकी सवलत मिळणार आहे.

२ मार्चपासून नेहरू सेंटरमध्ये गुणीदास संगीत संमेलन रंगणार
प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले ‘गुणीदास संगीत संमेलन’ यंदा मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या कला सादरीकरणामुळे नावारूपाला आलेल्या या संगीत सोहळ्याचे यंदा ३२वे वर्ष आहे. यंदाच्या संमेलनात पंडित जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित राजन आणि साजन मिश्रा, गौरव मजुमदार, सुहास व्यास, बिश्वजीत रॉय-चौधरी, गणेश, कुमारेश आदी दिग्गज सहभागी होणार आहेत. हा सोहळा २ ते ४ मार्च या कालावधीत नेहरू सेंटर, अ‍ॅनी बेझंट मार्ग, वरळी येथे होणार आहे. या सोहळ्याची तिकिटे रिदम हाऊस (काळाघोडा) व नेहरू सेंटर येथे उपलब्ध करण्यात आली आहेत.

इंडियन आयडॉलच्या ग्रॅन्ड फिनालेची जय्यत तयारी
प्रतिनिधी

देशवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन आयडॉल -४ च्या ग्रॅन्ड फिनालेची तयारी जोरात सुरू आहे. आता स्पर्धेत तीन स्पर्धक उरले असून अंतिम बाजी कोण मारणार. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या दिलखेचक अदाकारीबरोबर आवाजातील गोडवा कायम ठेवणारी तोर्शा सरकार किताबजिंकणार की, गाणे गाताना त्यात जीव ओतून परफॉर्मन्स करून गाणारी सौरभी विजेती ठरणार हे १ मार्चला ठरेल. या दोन महिला स्पर्धकांमध्ये कपिल थापा त्याची वेगळी ओळख ठेवून आहे. कपिलच्या गाण्याला परीक्षकांबरोबर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे.

भारतीय प्रादेशिक भाषेतील लेखिकांचे साहित्य होणार ‘ग्लोबल’!
प्रतिनिधी

भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये लेखिकांनी लिहिलेल्या निवडक साहित्याला आता ‘ग्लोबल’ स्वरूप मिळणार असून हे साहित्य इंग्रजीत अनुवादित होणार आहे. पाच खंडांमधून या निवडक साहित्याचा अनमोल ठेवा वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यापैकी पहिला खंड प्रकाशित झाला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार आणि निवडक साहित्य अन्य प्रादेशिक भाषेत अनुवादीत होण्याचे काम सुरू असते. त्यामुळे कन्नडमधील चांगले साहित्य मराठीत किंवा मराठीतील उत्तम साहित्य अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित होते. मात्र आता भारतीय प्रादेशिक भाषांमधील विविध लेखिकांचे साहित्य आता इंग्रजीत अनुवादित झाल्यामुळे ते जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे. पुस्तक विक्रीतील एक अग्रणी ‘क्रॉसवर्ड’च्या केम्सकॉर्नर येथील शाखेत ‘हॉट इज द मून’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.

जोगेश्वरीच्या ब्लाइंड होममधील समस्यांमुळे अंध रहिवासी हैराण
प्रतिनिधी

जोगेश्वरी येथे अंधांसाठी चालविण्यात येत असलेल्या ‘एम. एन. बी. होम फॉर द ब्लाइंड’ या संस्थेतील व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे तिथे राहणाऱ्या अंध व्यक्तींना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संस्थेच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली असतानाही त्याची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप संस्थेतील अंध रहिवाशांनी केला आहे. जोगेश्वरीमध्ये संस्थेची तब्बल साडेतीन एकर जागा आहे. अंधांच्या कल्याणासाठी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मंचरजी मनारजी नवरोजी यांनी ही जागा संस्थेला देणगी स्वरूपात दिली होती. या जागेतच संस्थेचे वर्कशॉप व वर्किंग होस्टेल चालविण्यात येते. होस्टेलची ६० व्यक्तींची प्रवेशक्षमता आहे. येथे राहणाऱ्या अंधांकडून निवास व भोजनासाठी चारशे रूपये शुल्क आकारण्यात येते. परंतु, संस्थेने हे शुल्क अचानक बाराशे रूपये केले आहे. वास्तविक, संस्थेला जवळपास वीस टक्के भोजन बाहेरच्या संस्थांकडूनच दिले जाते. संस्थेच्या परिसरात चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण करण्यात येते.