Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘शेतकऱ्यांनी जोडधंद्याकडे वळण्याची गरज’
प्रतिनिधी / नाशिक

कृषी क्षेत्रात अजूनही नवीन संशोधनाची गरज असून देशातील ७५ टक्के जनता शेती व शेतीवर आधारीत उद्योगधंद्यावर अवंलबून आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच इतर जोडधंद्याकडे वळावे, असे मत विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय चंहादे यांनी व्यक्त केले.
चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन आणि विकास प्राधिकरण केंद्रात शेतकऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नवीन संशोधनाची व बी-बियाणांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने कार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा, चर्चासत्रे, शेतकरी मेळावे यांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी जलसंधारणाची कामे करून घ्यावी, त्यामुळे शेतीसाठी त्यांचा फायदाच हाईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी प्राधिकरणाचे अध्यक्ष चांगदेव होळकर, संस्थेचे संचालक डॉ. आर. पी. गुप्ता, डॉ. के. ई. लवांदे आदी उपस्थित होते. या दोन दिवशीय चर्चासत्रासाठी गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशासह राज्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या चर्चासत्रात शेतीमधील नवीन संशोधन, कांदा व लसून या पिकांमधील उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने वापरण्यात येणारी खते व बियाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. विजय महाजन, डॉ. एच. आर. भोंडे, डॉ. मुजुमदार हे शेतकऱ्यांना शेती उत्पादनाविषयी माहिती देणार आहेत.