Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विविध संस्था, संघटनांकडून सावरकरांना आदरांजली
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरात आज विविध संस्था,

 

संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीने स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
पुणे महानगरपालिका वाचनालयातर्फे कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल अगावणे, डॉ. मिलिंद भोई, पियूष शहा, प्रा. शशिकांत सोनवणे, संभाजी शिंदे, सागर अडसूळ, रोहिणी अगावणे, ऊर्मिला दुधाळ आदी उपस्थित होते.
अखंड हिंदुस्थान मंचतर्फे स्वा. सावरकरांच्या सारसबागेजवळील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी महापौर राजलक्ष्मी भोसले, मंचाचे अध्यक्ष विष्णुपंत ठाकूर, प्रा. जे. आर. कुलकर्णी, भगवान दातार, विद्याधर नारगोलकर प्रा. सु. वा. जोशी आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईवरील दहशतवादी शहिदांना आदरांजली वाहून दहशतवादा विरोधी लढण्याची शपथ देण्यात आली.
स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त फग्र्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकर राहत असलेली खोली नागरिकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयात ‘लंडनमध्ये सावरकर’ या विषयावर सावरकरांचे अभ्यासक श्री. म. जोशी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित पटवर्धन, विकास काकतकर, डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, नगरसेवक अनिल शिरोळे, श्याम भुर्के आदी उपस्थित होते.शिक्षण मंडळ कार्यालयातर्फे स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निर्मला केंढे, शिक्षण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक करवंदे आदी उपस्थित होते.