Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राज्याबाहेरही फळमहोत्सवाचे आयोजन - हर्षवर्धन पाटील
पुणे, २७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

‘‘कोल्हापूर, सांगली, नांदेड व औरंगाबादसह पुढील काळामध्ये राज्याच्या बाहेरही फळमहोत्सवाचे

 

आयोजन करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली. राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक पी. जे. अडसुळे, पणन मंडळाचे संचालक एस. पी. सांगळे, सरव्यवस्थापक सुनील पवार त्या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेमुळे उत्पादकाच्या मालाला चांगला भाव मिळतो व ग्राहकांनाही योग्य किंमतीत माल मिळतो. या संकल्पनेसाठी फळ महोत्सवाची उपयुक्तता मोठी आहे. त्यामुळेच त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. आगामी काळामध्ये राज्याबरोबरच चेन्नई, हैद्राबाद, बेंगलोर, कोलकाता, दिल्ली या ठिकाणी फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवांना गती देण्याच्या दृष्टीने तालुका स्तरावर अनुदान देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. ’’सध्या मालाचे मार्केटिंग गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘पणन विभागानेही मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केले आहे. आंबा, डाळिंब, काजू, बेदाणा, मोसंबी या फळांबरोबरच यापुढे संत्री निर्यात केंदं्र सुरू करण्यात येणार आहेत.