Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष गाडय़ा
चिपळूण, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

आगामी उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर २०८ विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, त्यामुळे याचा फायदा कोकणातील प्रवाशांना होणार आहे.
१०९ डाऊन ही गाडी ५ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कारवार अशी धावणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रात्री ११.५५ वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वा. कारवारला पोहचेल. तर ‘११० अप’ गाडी कारवारहून दुपारी ३ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ४.२० वा. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, पेडणे, थिवीम, करमाळी, मडगाव, काणकोण, असनोली हे थांबे देण्यात आले आहेत. १६५ डाऊन ही दादर-एर्नाकुलम गाडी दादर टर्मिनसवरून ८ एप्रिलपासून दुपारी १२.४५ वा. दर बुधवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३.५५ वा. एर्नाकुलमला पोहचेल. तर १६६ अप ही गाडी रात्री ११.१५ वा. एर्नाकुलमवरून सुटून तिसऱ्या दिवशी ४.४५ वा. दादर टर्मिनसला पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुम्डाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, अंकोला, कुमठा, होनावर, भटक, बियंदूर, उडुपी, सुरतकल, मंगलोर, कासरगौड, कन्हानगड, पायनूर, कन्नूर, तिलीचेरी, माहे, बदगारा, कुलंदी, कालिकत, तिरूर, कुट्टीपुरम, शोरनूर, त्रिचूर, अलवे या स्थानकांवर थांबेल.
दादर-कोचिवली ही साप्ताहिक गाडी प्रत्येक शनिवारी सुटणार आहे. १६७ डाऊन ही गाडी दादर टर्मिनसवरून दुपारी १२.४५ वा. सुटणार असून, कोचिवलीला दुसऱ्या दिवशी ९ वा. पोहोचणार आहे, तर १६८ ही अप गाडी कोचिवलीवरून ८.५० ला सुटून दुसऱ्या दिवशी ४.४० वा. दादर टर्मिनसला पोहोचणार आहे. या गाडीला एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, छगनेर, कोलम, वारकला येथे थांबा देण्यात आला आहे, तर छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून १२१ आणि १२३ या अतिजलद साप्ताहिक गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. १२१ डाऊन ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री १०.१५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०५ वा. मडगावला पोहोचेल, तर १२२ अप ही गाडी ८.४५ वा. मडगावहून सुटून छत्रपती शिवाजी टर्मिनसवर त्याच दिवशी ५.३५ वा. पोहोचेल. ही गाडी ठाणे, रत्नागिरी या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडय़ा दर शुक्रवारी सुटणार आहेत, तर १२३ डाऊन ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रात्री १०.१५ वा. सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०५ वा. पोहोचणार आहे. १२४ अप ही गाडी सायंकाळी ७.१० वा. सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ४.५ वा. पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, रत्नागिरी असे थांबे देण्यात आले असून, ही गाडी १५ कोचची असणार आहे.