Leading International Marathi News Daily
शनिवार २८ फेब्रुवारी २००९
वलयांकित ताजमहाल-२
पिरॅमिड्समध्ये ताजमहालचे मानवी कौशल्य नाही- फ्रँको बर्निए
घर स्वप्नातलं
बांधकाम सुरू करण्यापूर्वी..
बांधकाम करताना टाळा पर्यावरणाची हानी!
रंगांच्या राज्यात
स्थितप्रज्ञ रंग
चर्चा
पुनर्विकासाठी नियमावली, ‘सहकार’ आणि असहकार
केला तुका अन्..
अण्णांचा डोमिसाइल सर्तफिकेट आणि बाबलो हतबल
मेलबॉक्स

 

महानगरपालिकेची पूर्वमंजुरी न घेण्याचा धोका पत्करून ठाण्यातील बहुसंख्य को-ऑप. हौसिंग सोसायटय़ांनी त्यांच्या इमारतींच्या गच्च्यांवर शेड टाकल्या आहेत. त्यामागील त्यांचे नैतिक अधिष्ठान/ अधिकार काय आहे याचा मागोवा :-
आज नवीन जागांचे भाग गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत अस्तित्वात असलेल्या को-ऑप. हौसिंग सोसायटीतील सभासदांना नवीन सदनिका घेणे किंवा इमारतीची पुनर्बाधणी करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. अशा वेळी एकमेव पर्याय म्हणजे असलेल्या वास्तूचे नूतनीकरण व मजबूतीकरण करणे, हाच होय.
मुख्यत: ‘सौर औष्णिक ऊर्जेमुळे’ इमारतीच्या बाहेरील पृष्ठभागाच्या काँक्रीट/ प्लॅस्टरचे दिवसा प्रसरण व रात्री आकुंचन होते व
 
त्यामुळे काँक्रीट ठिसूळ होऊन त्याची धारणक्षमता कमी होते व त्याला भेगा पडतात. आपला प्रदेश समुद्राला जवळ असल्यामुळे हवेत आद्र्रता जास्त असते. ही हवेतील आद्र्रता भेगातून आतल्या लोखंडापर्यंत पोहोचते व लोखंड गंज पावते, अशा तऱ्हेने वर्षांनुवर्षे तिळातिळाने इमारतीचे ‘सौर औष्णिक ऊर्जा’ व ‘हवा’ यामुळे नुकसान होत असते.
‘सौर औष्णिक ऊर्जेमुळे’ इमारतीला पडलेल्या भेगा व तडे यातून पावसाचे पाणी झिरपून इमारतीची नादुरुस्तीची प्रक्रिया अधिकच वेगाने चालू होते. विशेषत: इमारतीच्या गच्चीचा पृष्ठभाग ‘सौर औष्णिक ऊर्जा’ व ‘पावसाच्या धारांच्या’ थेट काटकोनात संपर्कात आल्याने, इमारतीच्या इतर पृष्ठभागांपेक्षा (भिंतींपेक्षा) गच्चीची नादुरुस्ती व गच्चीतून पाण्याच्या झिरपण्याचे प्रकार सर्वात जास्त होतात. गच्ची व इमारतीचा वरील भाग जसे बाल्कनीच्या चारी बाजू, पॅरापेट वॉल, खिडक्यांवरील पडद्या, संडास/ बाथरूम खिडक्यांच्या वरचा भाग, गच्चीतील पाण्याच्या टाक्या याच्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीचे/ झिरपण्याचे वेळीच न थांबविल्यास इमारत वरून खाली मोडकळीस येऊ लागते व त्याचा पहिला फटका वरच्या मजल्यावरील रहिवाशांना बसतो. पुढे हेच झिरपणे खालच्या मजल्यापर्यंत पोहोचते. तेव्हा खालच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनी मला काय त्याचे? मी वॉटर प्रूफिंगचा खर्च का उचलावा? ही मानसिकता सोडून पाणी झिरपण्याचा तातडीने वेळीच बंदोबस्त करावा, म्हणजे भविष्यात इमारतीच्या दुरुस्तीवर होणाऱ्या भरमसाट खर्चातून सर्वाची सुटका होईल.
वेगवेगळ्या वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंटची २ ते १० वर्षांपर्यंत गॅरंटी असते, परंतु दोन किंवा दहा वर्षांनंतर सोसायटीला पुन्हा वॉटर प्रूफिंगचा खर्च करावा लागतो. तसेच त्या वेळी त्याचे दर भरमसाट वाढलेले असतात. शिवाय वॉटर प्रूफिंग करूनसुद्धा बऱ्याच वेळा बाल्कनीच्या बाजूचे पृष्ठभाग, पॅरापेट वॉल, खिडक्यांच्या पडद्या, संडास-बाथरूमच्या खिडक्यांवर ओल येते.
वरील नमूद केलेल्या सर्व प्रकारच्या पाण्याच्या झिरपण्यावर, गळण्यावर तसेच ‘सौर औष्णिक ऊर्जे’मुळे होणाऱ्या इमारतीच्या नुकसानीवर १०० टक्के प्रभावी उपाय म्हणून बहुसंख्य को-ऑप. हाऊसिंग सोसायटय़ांनी इमारतीच्या गच्च्या, बाल्कनीचे वरचे भाग व पाण्याच्या टाक्या यावर एसी/जीआय शीटच्या शेड बसविल्या आहेत. शेडची पाखी पॅरापेट वॉलच्या पुढे अडीच ते तीन फूट असल्याने इमारतीचा वरचा भाग तसेच बाजूच्या भिंतींचा वरचा भाग पावसाच्या थेट माऱ्यापासून वाचतो व त्यामुळे इमारतीचे नादुरुस्त होणे ९९ टक्के कमी होते.
अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत व त्याच्या आयुष्याची मोठी कमाई त्याच्या निवाऱ्यासाठी (घरासाठी) खर्च होत असते व त्यामुळेच निवाऱ्याचे (घराचे) संरक्षण हा त्याचा नैतिक अधिष्ठानावर आधारित मूलभूत हक्क/ अधिकार आहे. त्याच दृष्टिकोनातून सुरुवातीला थोडा खर्चाचा परंतु भविष्यात आर्थिक फायद्याचा तसेच थोडा कायद्याच्या चौकटीबाहेरचा शेड उभारण्याचा पर्याय ठाण्यातील बहुसंख्य को-ऑप. हाऊसिंग सोसायटय़ांनी स्वीकारला आहे. बहुसंख्य सोसायटय़ा शेडचा उपयोग केवळ इमारतीचे ऊन-पावसापासून संरक्षण म्हणूनच करीत आहेत व कोठल्याही प्रकारे व्यापारी/ राहण्यासाठी किंवा कोठल्याही वस्तू/ गोष्टी यांची साठवणूक किंवा कुठल्याही आर्थिक लाभासाठी करीत नाहीत. हे कृत्य कायदेशीर नसले तरी अनैतिक निश्चितच नाही. किंबहुना मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन करणारे आहे. वरील बाबींचा विचार करूनच महापालिकेची याला मूक मंजुरी असावी असे वाटते व त्यामुळेच आजपर्यंत ठाणे महानगरपालिकेने एकाही शेडबाबत दंडात्मक कारवाई केली नसावी.
पुढील २०-२१ वर्षांत ऊन-पावसापासून गच्च्चीचे जतन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंट खर्चाचा को-ऑप. हौसिंग सोसायटय़ांवर पडणाऱ्या आर्थिक भाराचा आढावा.
आढावा घेण्यासाठी खालील गोष्टी गृहीत धरल्या आहेत :
१) दोन तज्ज्ञांकडून वॉटर प्रूफिंगचे प्रति चौ. फूट दर व त्यांचे आयुर्मान घेऊन त्यांची सरासरी विचारात घेतली आहे.
२) वॉटर प्रूफिंगचे दर, आयुर्मान व प्रतिवर्षी सरासरी दर पुढीलप्रमाणे :
३) प्रति. चौ. फूट दरात प्रतिवर्षी १० टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ पकडली आहे.
४) उदाहरणासाठी सोसायटीच्या गच्चीचे क्षेत्रफळ ८६१० चौ.फू. व शेडचे क्षेत्रफळ ११,००० चौ. फूट धरले आहे. सोसायटीत वेगवेगळ्या क्षेत्रफळाचे ६० ब्लॉक आहेत.
५) खर्च पूर्ण हजार रुपयांपर्यंत विचारात घेतला आहे. वरील तक्ता नं. १ ते ५ यांचे परिशीलन केल्यास हे लक्षात येईल की ए.सी. शीट शेडमुळे सोसायटी सभासदांचे पुढच्या वीस वर्षांत सुमारे रु. ४४,७९,०००/- ते रु. ५९,४४,०००/- वाचतील व इमारतीचे ऊन व पावसापासून संरक्षण होऊन वरच्या मजल्यावरील रहिवाशांची सोसायटीमागील लिकेजची डोकेदुखी मिटेल.
‘‘बिल्डिंगला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून पालिका आयुक्तांकडे प्रमाणपत्र पाठविणे सक्तीचे करण्याचा निर्णय अलीकडेच राज्यमंत्रिमंडळाने घेतला. बिल्डिंगची आवश्यक दुरुस्ती तातडीने न झाल्यास महापालिकाच दुरुस्ती करेल व त्यासाठी आलेला खर्च बिल्डिंग मालमत्ता करातून वसूल करेल. स्ट्रक्चरल ऑडिट टाळणाऱ्यांना २५ हजार रुपये दंड करण्यात येईल अशा तरतुदी मुंबई महापालिका कायद्यांत करण्यात येणार आहेत’’,
सरकार इमारत दुरुस्ती व संवर्धनास किती महत्त्व देते हे लक्षात येईल. महापालिका भविष्यात इमारत दुरुस्तीत पण लुडबुड करू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायद्याचा मूळ उद्देश मानवाचे कल्याण हा आहे. जर एखादा कायदा बहुसंख्य लोकांच्या मूलभूत सोयींच्या आड येत असेल, तर कायदेभंग गुन्हा ठरत नाही.
वरील सर्व बाबींचा विचार करून सर्व जुन्या को-ऑप. हौसिंग सोसायटय़ांनी आपल्या इमारतींवर शेड उभारून सोसायटीला व त्यांच्या सदनिका धारकांना लाखो रुपयांच्या भविष्यकालीन बोजातून मुक्त करावे.लेखक संपर्क : २५४२२७३६, ९८३३०३०४८४
माधव सटकर