Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘.. अन्यथा ‘आरपीआय’ची वेगळी वाट ’
बंधुराज लोणे, नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन

 

लढवाव्यात, अन्यथा रिपब्लिकन पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरेल, असा ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती मान्य नसल्याचेच संकेत आज पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी दिले. रामलीला मैदानावर झालेल्या या अधिवेशनाला देशातील अनेक प्रदेशांतून रिपब्लिकन कार्यकर्ते आले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. मात्र असे घडले नाही तर रिपब्लिकन पक्ष देशभरात शंभर जागा लढवेल, असे आठवले यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती झाल्यास रिपाईने वेगळा मार्ग शोधावा, असा सूर या अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. गेल्या १८ वर्षांत पहिल्यांदाच शरद पवार यांच्यापासून वेगळे होण्याची शक्यता अजमावण्याची भाषा अधिवेशनात करण्यात आली. मायावती यांनी बहुजनवाद सोडला असल्याची टीका करून आता बाबरी मशीद मायावती यांनी बांधून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी, स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र तेलंगणा, भूमीहिनांना जमिनीचे वाटप असे ठराव या अधिवेशनात करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाच्या एकाही गटाने दिल्लीत अधिवेशन घेतले नव्हते. रामदास आठवले यांनी दिल्लीत अधिवेशन घेऊन शक्तीप्रदर्शनही केले. जवळपास ३१ प्रदेशाचे प्रदेशाध्यक्षांनी या अधिवेशनात विचार मांडले.