Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने यंदाचा सावरकर गौरव पुरस्कार साधनाताई आमटे आणि कॅ. चाफेकर यांना ५ मार्चला प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त-
देवाने मला फसवले
देवेंद्र गावंडे
‘ देवाने मला फसवले .. ’ थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी एक वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांच्या सहधर्मचारिणी साधनाताईंची ही पहिली प्रतिक्रिया होती . माझी देवावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे बाबांच्या आधी मीच जाणार , असा ठाम विश्वास ताईंनी आयुष्यभर जोपासला . नेमका त्यालाच त्या दिवशी तडा गेला होता. नियतीने दिलेल्या या विश्वासघाताच्या धक्क्यातून साधनाताई आता पुरत्या सावरल्या आहेत. ताई तशा सश्रद्ध. यातून मिळणारे आत्मिक बळच आपल्या खडतर आयुष्याला सुखकर करत गेले , अशी त्यांची भावना होती व आहे . मात्र , बाबा गेल्यानंतर त्यांनी देवाची पूजा करणे सोडून दिले असले तरीही त्यांची देवावरची श्रद्धा कायम आह .

ज्ञानयज्ञकर्ता!
ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे (निवृत्त)
कॅप्टन चिंतामण विष्णू चाफेकर म्हणजेच सर्वाना परिचित असणारे ‘कॅप्टन चाफेकर’! नागपुरातील निवृत्त व लष्करातील विद्यमान अधिकाऱ्यांमध्ये असा विरळाच अधिकारी असेल की, ज्याने कॅप्टन चाफेकरांचे नाव ऐकले नाही. १९७९ पासून एस.एस.बी. (सव्‍‌र्हिसेस सिलेक्शन बोर्ड) च्या परीक्षेची व इंटरव्ह्य़ूची इच्छुक उमेदवारांकडून तयारी करण्याचे व त्यांना प्रशिक्षण देण्याचे अविरत कार्य करीत देशसेवा करणारी एकमेव संस्था म्हणजेच कॅप्टन चाफेकर होत. भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन’ या श्लोकाप्रमाणे ते कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा न करता हा एस्.एस्.बी.चा ज्ञानयज्ञ करीत आहेत.

व्यवहाराला कच्चे पण जिद्दीला पक्के
म.प्र. अंधारे

शरदराव गेले. असं वाटलं नव्हतं की, असे तडकाफडकी जातील. वय ८१ असले तरी तरुणाला लाजवतील असा उत्साह. नोकरीनंतरच्या काळातील त्यांची प्रेरणा म्हणजे वडिलांनी सुरू केलेले ‘मुलांचे मासिक.’ वडिलांच्या नंतर त्यांनी मासिक जिद्दीने चालवले. मित्रमंडळींची भेट झाली की, आवर्जून मुलांच्या मासिकाचा अंक स्कूटरच्या डिक्कीतून काढून द्यायचे. शरदरावांनी, वसा घ्यावा तसे मासिक चालवले. खंड पडू दिला नाही. अंकावर अर्थातच पोट चालत नव्हते पण, त्यांची त्यांना कधीच काळजी नव्हती. हातांनी खिळे जुळवणीच्या काळापासून कॉम्प्युटर व मजकूर जुळवणीपर्यंतचा प्रवास त्यांनी जिद्दीने पार पडला. जिद्द अशी की, त्यासाठी चांगली सरकारी नोकरी सोडली.

एका सतत प्रयत्नशील राहणाऱ्या माणसाचे निधन
अजित दळवी

..डॉ. लक्ष्मण देशपांडे. मराठवाडय़ाच्या रंगभूमीने गेल्या दोन-चार वर्षांत बिनीचे शिलेदार गमावले आहेत. लक्ष्मण देशपांडे यांच्या मृत्यूनं तर धक्काच बसला. त्यांच्यासारख्या उत्साहानं सळसळणाऱ्या माणसाच्या देहावर फुलं अर्पण करण्याचा प्रसंग इतक्या लवकर येईल, असं कधी वाटलंच नव्हतं. गेल्या एक-दीड वर्षांत ते थकल्यासारखे दिसत गोते. चेहरा काळवंडला होता. ‘लिव्हर’चं दुखणं असल्याचं ऐकत होतो. तरी इतक्या लवकर काही होईल, असं अपेक्षित नव्हतं. या दुखण्यावर काहीच उपाय नव्हता का? आधुनिक वैद्यकशास्त्रातली प्रगती फोल ठरावी, एवढं हे दुखणं गंभीर होतं? देशपांडय़ांकडे तर पैसा, मनुष्यबळ आणि साधनं यांचीही कमतरता नव्हती.

वर्धेतील वाचनालयाला शहीद हेमंत करकरेंचे नाव
वर्धा, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वर्धा नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शहीद हेमंत करकरे यांच्या नावे सार्वजनिक वाचनालय स्थापन करून पालिका प्रशासनाने या शहीद माजी विद्यार्थ्यांस आगळी आदरांजली वाहिली.
शहीद हेमंत करकरे स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. १९७० च्या दशकात करकरेंचे वडील रेल्वे खात्यात वर्धेत होते. त्याचवेळी हेमंत पालिकेच्या चित्तरंजन प्राथमिक शाळेत इयत्ता चवथीपर्यंत शिकले, अशी आठवण शिक्षण अधिकारी भागवत पोटदुखे यांनी करून दिली.

धानोलीत परिचारिका निवासस्थानाचे उद्घाटन
कारंजा घाडगे, २८ फेब्रुवारी / वार्ताहर

तालुक्यातील धानोली येथे परिचारिका निवासस्थानाचे उद्घाटन वर्धा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी रोगनिदान नेत्र तपासणी व रक्तदान शिबीरही पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सयाजी महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख, संचालक प्रवीण गांधी, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी सभापती शेषराव चरडे, विनायक साबळे, डॉ. गंभीर, दिनबंधू संस्थेचे अध्यक्ष नितीन सरदार, सुहास वाकोडे, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. रोगनिदान शिबिरात ६५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. १४ युवकांनी रक्तदान केले. १४ नेत्र रुग्णांना नेत्रचिकित्सेचा सल्ला देण्यात आला. यावेळी दिनबंधू संस्थेतर्फे ४५० शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. प्रास्ताविक प्रवीण गांधी यांनी केले. सर्व रुग्णांना मोफत औषधाचे वितरण करण्यात आले. कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय सावंगी, सामान्य रुग्णालय वर्धा येथील वैद्यकीय चमूने रुग्ण तपासणी केली. डॉ. तिवारी, डॉ. प्रवीण पाटील, चंदू पाटील, शोभा काळबांडे, बुद्धेश्वर पाटील व कार्यकर्त्यांनी या उपक्रमास सहकार्य केले.

रेंगेपार कोहळीत महिला मेळावा
भंडारा, २८ फेब्रुवारी / वार्ताहर
वृक्ष मित्र मंडळ आणि जिल्हा कृषी विभागाच्यावतीने रेंगेपार कोहळीत महिला मेळावा नुकताच झाला. मेळाव्याचे उद्घाटन वर्षां प्रफुल्ल पटेल यांनी केले. महिला बचत गटामार्फत व्यवसाय करून कुटुंबाच्या विकासात महिलांनी हातभार लावावा आणि वाढत्या कुटुंब खर्चाचा ताळेबंद जुळवावा, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडाराचे नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, प्रा. सच्चिदानंद फुलेकर, यादवराव कापगते, मंगला कोल्हे, विद्या फुलेकर आदी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्य़ातील ३६४ गावात टंचाई परिस्थिती
बुलढाणा, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी लागलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ातील २६४ गावात टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील अपुऱ्या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात झालेली घट ३६४ गावात टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी कळविले आहे. ५० पैसे वा त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना पुढीलप्रमाणे सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, रोहयोंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, परीक्षा शुल्कात माफी, वीज बिलात साडे तेहतीस टक्के सुट मिळणार आहे.

विभागीय क्रीडा स्पर्धेत कुही अव्वल
कुही, २८ फेब्रुवारी / वार्ताहर

तालुक्यातील ‘राजोला’ येथे नुकत्याच पार पडलेल्या कुही-उमरेड-भिवापूर या तिन्ही तालुक्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत कुही पंचायत समितीने सर्वच क्रीडा प्रकारात अव्वल स्थान पटकावले.
कुहीने १८६ गुण अर्जित करून ‘चॅम्पीयनशिप’चा बहुमान पटकावला. याच स्पर्धेत उमरेड पंचायत समितीने १११ गुण मिळवून दुसरा तर भिवापूर पंचायत समितीने ९५ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.या स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्य सुधीर पारवे यांच्या हस्ते झाले.

सावरगावात आजपासून शंकरपट व कृषी प्रदर्शन
नरखेड, २८ फेब्रुवारी / वार्ताहर

तालुक्यातील सावरगाव येथे जंगी शंकरपट कृषी व पशू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.शंकरपटाची बक्षिसे ‘अ’ व ‘ब’ गटात विभागणी करून देण्यात येणार आहे. ‘अ’ गटाचे २१ हजार, ११ हजार, ७ हजार रोख बक्षिसे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असून एकूण १२ बक्षिसे ठेवली आहेत. काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त ब गटात भाग घेता येणार आहे. यात प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे ११ हजार, ५ हजार १ हजार रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. पट कमेटी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने या निमित्त कृषी व पशू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

शिल्पकार हिरूभाई
नागपुरातल्या सायकल रिक्षात बसून फिरायला आवडायचं. बर्डी, सदर, महाल, रेशीमबाग असो की गावाला जाताना रविनगर ट्रॅव्हलचा थांबा, बजाजनगरातल्या अड्डय़ावर एकत्र येऊनच सवाऱ्या निघायच्या ‘नागपूर दर्शन’करिता. कस्तुरचंद पार्कच्या कोपऱ्यावरचे इटालियन मार्बलमधील उभे ‘कस्तुरचंद’ गोरेगावकरांचे बसलेले ‘हेडगेवार’, शिवराज प्रेसच्या छतावरील साठय़ेंचे ‘अश्वारूढ शिवाजी महाराज’, शिरगावकरांची बर्डीवरची ‘झाशीची राणी’ असो की शंकरनगर चौकातील बेलेकरांचे ‘सावरकर’ इ. दिसले की, आमच्या सवाऱ्या प्रत्येकवेळी वेगवेगळ्या छाया-प्रकाशातलं सौंदर्य अनुभवत पुढे जायच्या.

वर्ड वॉर
हे लिहिण्याचे निमित्त म्हणजे २६/११ चा मुंबईचा बॉम्बस्फोट आणि १९७१ चे युद्ध! मी सैन्यात एक मेजर (डॉक्टर) होतो आणि पश्चिम बंगालच्या बागडोगरा गावात उभारलेल्या एका मोठय़ा सैनिकी रुग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञाचे काम करीत होतो. युद्ध पेटले होते. पश्चिम पाकिस्तानचा नि:पात आणि बांगलादेशचे निर्माण अजून झाले नव्हते. फिल्ड मार्शल माणिकशाच्या नेतृत्वात आपले सैन्य जिकिरीने लढत होते, शत्रूला मागे रेटत होते आणि जमीन काबीज करीत होते.

दीर-भावजय
आई-बाबा, सासू-सासरे ही नाती अशी असतात की लग्नानंतर आई ते आई इन लॉ अन् बाबा ते बाबा इन लॉ एवढासाच काय तो फरक पडतो. आदर, मान, धाक, नात्यातला अर्थ, आपल्यावरचं त्यांचं छत्र आणि भूमिका समानच राहते. तथापि लग्नात आहेरात मिळालेली दीर, नणंद, जाऊ, पुतणे, भाचे ही नाती सांभाळतानाच खरी संस्कारांची आणि सहिष्णुतेची कसोटी लागते. उभयपक्षी सौजन्याने यात यश मिळवणं सोप जातं.

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा इतिहास
ऑस्ट्रेलियात ७ ते २२ मार्च या कालावधीत नववी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रंगणार असून ती प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिपत्याखाली खेळली जाणार आहे. २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या गेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारतावर मात करून विश्वविजेतेपद कायम राखले होते. या दोन संघांसह यंदाच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघ सहभागी होत आहे. १९७३ ला इंग्लंडमध्ये पहिली महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यजमान इंग्लंड संघ अिजक्य ठरला होता.

चारी धाम - रामधाम!
ताडोबाच्या जंगलभ्रमणाची धुंदी संपली, त्यामुळे ‘टायगर सफारी’कडून पर्यटनाच्या वेगळ्या वाटेने जाण्यास हरकत नाही. नागपूर शहराबाहेर पडल्यानंतर कामठी मार्गावरून जाताना अनेक आश्रम नजरेस पडतात. शहराच्या बाहेर उभारलेल्या आश्रमांमध्ये मन:शांतीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आधुनिक युगातही भारतातील धार्मिक कर्मकांडांचे महत्त्व कायम असल्याने धार्मिक पर्यटनाकडे ज्येष्ठ नागरिकांचा ओढा कमी झालेला नाही. परंतु, चार धामांची यात्रा व्यस्त दैनंदिनीत शक्य नाही.

एकम्
तिला लिहायचं होतं म्हणून ती एकटी होती आणि एकटी होती म्हणूनच ती लिहित गेली. लिहिण्यासाठी तहान-भूक विसरणारी ती, मधूनच लिहिण्याचा संप पुकारते आणि स्वत:शीच बोलू लागते. बोलता-बोलता स्वत:शीच, मनाच्या तळाशी जाऊन पोहोचली. एकटेपण लादल्या गेलं की आपणच आनंदानं स्वीकारलं याच विचारात गुरफटली. नुसतं सोफ्यावर पडून दिवस घालवणं तिच्या मनाला बोचत राहिलं पण, उठून झडझडीत लिहिणं तिला जमलंही नाही. ही अवस्था झाली आहे ‘एकम्’ या कादंबरीतील लेखिकेची. ‘एकम्’ ही एका लेखिकेची गोष्ट आहे. एकटेपणी एकटेपणाबद्दल एकटीशीच केलेला हा एक संवाद आहे.