Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

विदेश सेवेतील एक सेवानिवृत्त अधिकारी मराठी माणसाच्या अंतर्मुख आणि काहीशा आत्मसंतुष्ट स्वभावाबद्दल सांगत होते, ‘‘आम्ही मुंबईला कॉलेजला असताना कॉलेजातील उपक्रमांचा भाग म्हणून वेगवेगळ्या भाषांच्या ‘सोसायटीज’ असायच्या. ‘सिंधी सोसायटी, गुजराती सोसायटी, इंग्लिश सोसायटी वगैरे विद्यार्थ्यांच्यात आपली भाषा सोडून इतरही भाषांच्या सोसायटीचे सदस्य होण्यासाठी स्पर्धा चालायची, कारण या निमित्ताने भाव मारायला मिळायचा किंवा आपल्या पसंतीच्या मुला किंवा मुलीबरोबर वेळ घालवायला मिळायचा. मराठी मुलं-मुली मात्र ‘मराठी सोसायटी’ सोडून इतर कोणत्याही सोसायटीत भाग घ्यायला उत्सुक नसत. शेवटी मीच ठरवले की मी मराठी सोसायटीचा सदस्य होतो. मी माझी इच्छा व्यक्त करताच मराठी सोसायटीची मुलं उसळली, ‘नोनो, तुम्ही मराठी भाषिक नाहीत, तुम्ही या सोसायटीत येऊच शकत नाही.’

‘हीमुलगी जन्माला आली नसतीच, तर अधिक बरं झालं असतं..’ ही एका वडिलांची प्रतिक्रिया! ओठ फाटलेले, त्यातून ती मुलगी! जन्मापासूनच तिच्या लग्नाची काळजी. अज्ञान भरपूर. बेताची आर्थिक परिस्थिती. त्यामुळे अशा स्थितीत जन्माला आलेली मुलगी आपल्या घरात दुर्दैव घेऊन येणार हा समज पक्का! असा मुलगा जन्माला आला तरी या प्रतिक्रियेत फारसा फरक असायची शक्यता नाही. समाजात आपल्याला दिसणारे बरेचसे मोठे चेहरेही फाटलेल्या ओठांचे दिसतात. त्यावर शस्त्रक्रिया होते, याची माहिती असत नाही. समजा तसं कुणी सांगितलं, तर खर्च परवडेल की नाही, याची चिंता असते. रुग्णालयात आणि समाजातही त्यांची दखल यथातथाच. भारतात दरवर्षी ३५ हजार मुलांचा जन्म ओठ फाटलेल्या अवस्थेत होतो, असं आकडेवारी सांगते. वाराणसीला या ओठांवर प्लॅस्टिक सर्जरी करणारे डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आहे डॉ. सुबोधकुमार सिंग!

चित्रपट माध्यमाच्या इतिहासात गेल्या पाच दशकांमध्ये आपल्या विनोदाची छाप जगभर सोडणाऱ्या कलावंतांमध्ये जेरी लुईस यांचं नाव आदराने घेतले जाते. कारकिर्दीच्या परमोच्च काळात अ‍ॅकेडमीकडून साधं नामांकनही न मिळालेल्या या कलाकराला गेल्या आठवडय़ात ऑस्कर सोहळ्यात सामाजिक योगदानासाठी जीवनगौरव प्रदान करण्यात आला, तेव्हा उशिरा का होईना, पण या कलावंताने दखल घेण्यास भाग पाडले, अशी सहज प्रतिक्रिया अ‍ॅकेडमीकडून उमटली आणि जेरीच्या लाखो चाहत्यांकडूनही. अभिनेता, गायक, दिग्दर्शक, निर्माता, अशा अनेक भूमिका वठवणाऱ्या या हॉलीवूडमधील अवलियाने उभ्या आयुष्यात कितीतरी भिन्न गोष्टींमध्ये सक्रिय सहभाग ठेवला. आजही ८२ व्या वर्षांत त्यांच्यातील उत्साह अजिबातच कमी झालेला नसल्याचे पुरस्कार स्वीकारतानाच जाणवत होते. अमेरिकेतला १९५० ते १९६५ या काळातला मूड एकदम बिंधास होता. युद्धानंतर आकस्मिकपणे आलेल्या समृद्धीमुळे एक नवा मध्यमवर्ग उदयाला आला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात वैज्ञानिक संशोधन क्षेत्र पाश्चिमात्यांची मिरास समजली जाई. पी. सी. रे, जे. सी. बोस, सी. व्ही. रामन अशा काही भारतीय ताऱ्यांचा विज्ञान क्षितिजावर उदय होऊनदेखील राजकीय पाठिंब्याअभावी बुद्धिमान भारतीय शास्त्रज्ञांना या क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागे. ज्या वेळी भारतीय शास्त्रज्ञ अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी युरोप-अमेरिकेची वाट धरीत त्या वेळी तुटपुंजे आर्थिक बळ व साधनसामुग्रीच्या मदतीने पुण्यात राहून सेंद्रिय रसायनशास्त्रात क्रांतिकारक संशोधन करून पाश्चिमात्य विज्ञान जगताचे लक्ष वेधून घेणारे द. बा. लिमये हे महाराष्ट्रातील संघटनात्मक रासायनिक संशोधन चळवळीचे जनक होते.