Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

काश्मीर पर्यटन, एक देशकार्य
चंद्रकांत दुनाखे

प्रत्येक भारतीयाची पर्यटनाविषयीची मानसिक जडणघडण ही ‘काश्मीर’ने सुरू होते. पर्यटनाची बाकीचे स्थळे ‘बाकी सब उसके बाद..’ मध्यंतरीच्या काश्मीर प्रॉब्लेमच्या काळात इतर पर्यटनस्थळांना खरे म्हणजे उजाळा आला. एका अर्थाने बाकीच्या राज्यांना काश्मीर प्रॉब्लेम हा वरदानच ठरला आहे.

गुणी खेळाडूंची खाण : सरस्वती क्रीडा केंद्र
संजय बापट

एखादा भूखंड रिकामा दिसला की तो हडप करायचा. इतकेच काय, खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेले आणि प्रत्यक्षात क्रीडांगण म्हणून वापर होत असलेले भूखंडही आजकाल रातोरात गिळंकृत होऊ लागले आहेत. त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंनाही आज सरावासाठी एकतर मुंबई अथवा ठाण्याबाहेरील आजूबाजूच्या शहरांमध्ये जावे लागते. शहरातील क्रीडांगणाची अवस्था भयानक असल्यामुळे या क्षेत्राचे व नवीन खेळाडूंचे काय होणार, हा प्रश्न सध्या ठाणेकरांसमोर आ वासून उभा आहे.

स्वातंत्र्यवीर की अनामवीर?
अनिरुद्ध भातखंडे

क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ४३ वी पुण्यतिथी तीन दिवसांपूर्वी झाली. या दिवसाचे औचित्य साधून (आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन) भारतीय जनता पक्षाने सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे, अशी मागणी लोकसभेत केली. पाच वर्षांंपूर्वी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणीशंकर अय्यर यांनी अंदमान येथील स्फूर्तीस्तंभावर कोरलेल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती खोडण्याचे आदेश दिले व या महान स्वातंत्र्यवीराबद्दल जी मुक्ताफळे उधळली, त्यावेळी भाजपचे समस्त खासदार संसदेत मूग गिळून बसले होते हा इतिहास आहे.

दक्षिण ध्रुवावरील संगणक आणि दूरसंचार
डॉ. प्र.ज. जोगळेकर

हिंदी महासागर हा शांततामय असावा, या आपल्या म्हणण्याला जोर येण्यासाठी आणि अंटाक्र्टिका खंडावर भारताचाही हक्क प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारने काहीही गाजावाजा न करता आपली अंटाक्र्टिका मोहीम आयोजित केली. जानेवारी १९८२ मध्ये भारताचा तिरंगा अंटाक्र्टिकावर फडकला आणि सर्व प्रगत राष्ट्रांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच म्हणजे १९८३ साली आपल्या दक्षिण गंगोत्री या संशोधन केंद्राची ७० अंश ५’ दक्षिण या अक्षांशावर आणि १२ अंश पूर्व या रेखांशावर स्थापना झाली. सोबतच्या अंटाक्र्टिका खंडाच्या नकाशात दक्षिण गंगोत्री (भारत) दिसते का पाहा. नकाशात अगदी उत्तरेकडे नजर टाकली तर ते चटकन दिसेलही. ७० अंश अक्षांशाचे वर्तुळ आणि १० अंश पूर्व रेखांशाची तिरकी रेघ यांच्या छेदबिंदूपाशी ते आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात सर्व शिक्षा ‘अनुभूती’!
प्रशांत मोरे

उंच-सखल टेकडय़ांनी व्यापलेल्या शंभर एकर जागेत तब्बल ७२ हजार झाडांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना शेतीपासून संगणकापर्यंत सर्व विषयांचा प्रत्यक्षानुभव देणाऱ्या येथील ‘अनुभूती’ निवासी शाळेने सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हॉरमेंटने घेतलेल्या ग्रीन स्कूल स्पर्धेत संपूर्ण भारतात तिसरा तर रेसिडन्सी स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सुप्रसिद्ध उद्योजक पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शाळा म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातील सर्व शिक्षा अनुभूतीच आहे.

वाचक मैत्रिणी
संपदा वागळे

२७ फेब्रुवारी या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोंदण लाभल्यानंतर हा मुहूर्त साधून ‘माय मराठीला’ पुनश्च गतवैभव मिळवून देण्यासाठी विविध पातळ्यांवर अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. या प्रयत्नातील ‘खारीचा वाटा’ उचलला आहे ‘वाचक मैत्रिणी’ या ठाण्यातील छोटय़ाशा ग्रुपने.

वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपयांचे कर्ज माफ
रमेश पाटील

महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड सवलत योजना २००९ अंतर्गत वाडा तालुक्यातील ४० सेवा सहकारी संस्थांमधून कर्ज घेतलेल्या २२६८ सभासद शेतकऱ्यांना दोन कोटी ७३ लाख ६७ हजार रुपयांची कर्जमाफी झाली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाडा तालुक्यातील शाखांनी नुकतीच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. राष्ट्रीयीकृत/व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, भूविकास बँका, नागरी सहकारी बँका व क्षेत्रीय ग्रामीण बँकांकडून कर्ज घेतलेले जे वंचित थकित शेतकरी, कर्ज परतफेड केलेले वंचित नियमित शेतकरी, कर्ज परतफेड केलेले वंचित थकित शेतकरी यांना महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड सवलत योजना २००९ चा लाभ या कर्जमाफीमध्ये मिळाला आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या कर्जमाफी व कर्ज सवलत योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत लाभ मिळालेला नाही. तसेच १ एप्रिल २००७ नंतर कर्जवाटप करण्यात आलेल्या कोणत्याही कर्जदार सभासद शेतकऱ्याचा या योजनेत समावेश केलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड सवलत योजनेला मुकावे लागले आहे. या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र शासनाची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप चिंचघर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. तालुक्यात ४० सेवा सहकारी संस्था कार्यरत असून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या सेवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी २२६८ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळालेला आहे. वाडा तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुडूस शाखे अंतर्गत १० सेवा सहकारी संस्थांमधून एकूण ६६३ सभासद शेतकऱ्यांची ८२ लाख ४९ हजार रुपयांची कर्जमाफी झाली आहे. वाडा शाखे अंतर्गत १५ सेवा संस्थांमधील ६२६ सभासद शेतकऱ्यांना ८० लाख २९ हजार रुपये कर्जमाफी मिळाली आहे. खातिवली शाखे अंतर्गत ३८७ सभासद शेतकऱ्यांना ४८ लाख १७ हजार कर्जमाफी मिळाली आहे. कंचाड शाखे अंतर्गत ५९२ सभासद शेतकऱ्यांना ६२ लाख ८२ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड सवलत योजनेचे निकष लक्षात घेऊन ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक, शाखा तपासनीस, सुपर चेकर यांनी या कर्जमाफीचे काम मुदतीत पूर्ण केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये माफीची ही रक्कम काही दिवसांतच जमा होणार आहे.