Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

यत्न सोडूं नये रे
बारावीपाठोपाठ आता दहावी परीक्षा सुरू होत आहे. परीक्षार्थीची संख्या पाहिली तर या सर्वात मोठय़ा व आवाढव्य आकाराच्या परीक्षा आहेत, व्यक्तिगतरीत्या या परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्यातील यशापयश सर्व जीवनावर प्रभाव टाकते. म्हणून या परीक्षांबाबत मुलांच्या मनात खूप भीती आणि ताण असतो. तणावाची लक्षणे- बेचैन वाटते, चुळबुळ, फे ऱ्या मारणे, कशातच मन लागत नाही, आभ्यासाची बैठक टिकत नाही. लक्ष लागत नाही. केलेला अभ्यासही आठवत नाही. आपल्याला काहीच लिहिता येणार नाही अशी भीती वाटते, ब्लँक होतो. आत्मविश्वास नाही. धड झोप येत नाही. वाईट स्वप्ने पडतात. एकाग्र होत नाही. परीक्षेला जायचीसुद्धा भीती वाटते. थिजल्यासारखे वाटते, रडू येते, धड भूकही लागत नाही, धड खावेसेही वाटत नाही. मळमळ, घाम येतो, घसा कोरडा होतो, चक्कर येते, ओकाऱ्या, जुलाब, चिडचिड, ओरडणे, घरच्यांवर राग काढणे, वस्तू फेकणे. ‘अमुक दे तर परीक्षेला जाईन’ अशा अटी घालणे, देवावर राग काढणे, देवाला नवस बोलणे, सारखे देवाचे नाव घेणे, इत्यादी. खरे म्हणजे परीक्षा म्हणजे जीवनाचा अटळ भाग आहे. कुठलेही काम हाती घेतले तर त्याचा दर्जा दुसऱ्या कोणी तरी तपासून समाधान व्यक्त करावे, यात चूक काय आहे? पण कधी कधी परीक्षा अगदी जिवावर बेतते. पुरे आता परीक्षा, जीव जायला आला असे वाटू लागते, शायर मीर महम्मद ‘असर’

लास्ट मिनिट टिप्स..
दहावीचे वर्ष म्हणून तुम्हाला वर्षभर शिक्षक, आई-बाबा, नातेवाईकांनी सूचनांचे डोस पाजून अक्षरश: भंडावून सोडले असेल. आता युद्धमैदान अगदी जवळ आले आहे. तेव्हा थोडा संयम आणखी बाळगा. प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीत आणि पेपर लिहिताना तुमच्या उपयोगी पडतील, अशा या काही लास्ट मिनिट टिप्स.. दहावीच्या परीक्षेची भीती, टेन्शन काय येते याचा विचार केला, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न करता येतील. मुख्यत:, अपुरा अभ्यास, परिस्थितीचा स्वीकार न करणे, अपेक्षांचे ओझे, स्वत:विषयीचा फाजील आत्मविश्वास, वारंवार येणारी निराशा अशा कारणांमुळे कोणत्याही परीक्षेचे टेन्शन येते. त्यामुळेच आपण केलेला अभ्यास व परीक्षेत मिळणारे गुण यामध्ये मोठी दरी दिसून येते. तुम्ही अभ्यास कसा करता हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तुम्ही परीक्षेला कसे सामोरे जाता हेही महत्त्वाचे असते. म्हणून वर उल्लेख केलेल्या मुद्दय़ांचा विचार करून आपल्या क्षमतांबाबत वास्तववादी राहावे. निकालाबद्दल फाजील अपेक्षा न बाळगता सध्या समोर जे परीक्षा देण्याचे आव्हान आहे, त्याचाच विचार करावा.

परीक्षा हॉलमध्ये
तुम्हाला दिलेल्या उत्तर पत्रिकेत सर्व पाने क्रमाने आहेत का याची खात्री करून घ्या. तशी नसल्यास पर्यवेक्षकाकडून उत्तरपत्रिका बदलून घ्या.
उत्तरपत्रिका हातात मिळताच त्यावर जरूर ती माहिती ताबडतोब लिहा. आपला परीक्षेचा बैठक क्रमांक अक्षरी व अंकी दोन्ही प्रकारे उत्तर पत्रिकेवर व पुरवणीवर योग्य ठिकाणी लिहिण्यास विसरू नका.

टेन्शन कसले.. एन्जॉय दी चॅलेंज
‘लिट्ल चॅम्प्स’च्या वैशालीताईने आठवणींना उजाळा देतानाच यंदाच्या दहावीवीरांना ऑल दी बेस्ट केले आहे. कसे ते तिच्याच शब्दांत..
आयुष्यात तुम्ही गायक-वादक, खेळाडू, चित्रकार; काहीही व्हायचे ठरविले असोत. अभ्यासाचा किमान पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल आणि त्यासाठी दहावीची परीक्षा ही एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच जराही कंटाळा न करता भरपूर अभ्यास करा.. ‘सारेगम’च्या सेटवरही आम्ही अशाच प्रकारे मुला-मुलींना अभ्यासाचे महत्त्व पटवून देत होते. काय ती पुस्तके, असे तुम्ही वैतागून म्हणतही असाल. परंतु, पुढे मोठे झाल्यानंतर त्या शिक्षणाचे महत्त्व कळते. केवळ ते धडे, परीक्षेतील प्रश्न नव्हे. त्या पाठय़क्रमाच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होते, बाह्य़ जगाकडे पाहण्याची जी दृष्टी मिळते, तिचा आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात निश्चितपणे उपयोग होतो. शाळेत शिकलेला इतिहास, संस्कृत भाषा, गणितामुळे वाढलेली तर्कबुद्धी एखादे गाणे बसविताना उपयोगी पडते.

हेल्पलाईन आणि ई-मेल

बोर्डाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थी-पालकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विभागनिहाय हेल्पलाईन आणि एक ई-मेल कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचे क्रमांक पुढीलप्रमाणे- पुणे-०२० - २५५३६७१२. नागपूर - ०७१२ - २५५३५०७. औरंगाबाद - ०२४० - २३३४२२८, २३३४२८४. मुंबई - ०२२ - २७८९३७५६. नाशिक - ०२५३ - २५९९९५४. कोल्हापूर - ०२३१ - २५६९०८२९. अमरावती - ०७२१ - २६६२६०८. लातूर - ०२३८२ - २२८२४१.
राज्य मंडळाचे पुण्यातील मुख्य कार्यालय - ०२० - २५७०५३१६.
ई-मेल पत्ता - secretary@msbshse.ac.in