Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इस्रो तयार करणार अंतराळवीरांना घेऊन जाणारा अग्निबाण
इस्रो आखणार भारतीय अंतराळवीरांची मोहिम
नवी दिल्ली, १ मार्च/पीटीआय

चांद्रमोहिमेच्या यशस्वी प्रारंभानंतर गुंतली असून त्यासाठी आवश्यक असलेला अद्ययावत अग्निबाण बनविण्यात येणार आहे. जिओस्टेशनरी सॅटेलाईट लॉंच व्हेईकल मार्क ३ (जीएसएलव्ही एमके ३) असे या अग्निबाणाचे नाव असून त्याच्या सहाय्याने पूर्वीपेक्षा जास्त संख्येने म्हणजे तीन अंतराळवीरांसह अवकाशयान प्रक्षेपित करणे शक्य होईल. या अग्निबाणाच्या सहाय्याने भारताला सर्व प्रकारचे उपग्रह स्वबळावर प्रक्षेपित करता येणार आहेत.
जिओस्टेशनरी सॅटेलाईट लॉंच व्हेईकल मार्क ३ (जीएसएलव्ही एमके ३) असे इस्रो बनवित असलेल्या

 

अद्ययावत अग्निबाणाचे नाव आहे. हा अग्निबाण येत्या तीन वर्षांच्या कालावधीत बनविला जाईल. त्यामुळे सर्व प्रकारचे उपग्रह अवकाशात स्वबळावर प्रक्षेपित करणे भारताला शक्य होणार आहे. यासंदर्भात जीएसएलव्ही एमके ३ या प्रकल्पाचे संचालक एन. नारायण मूर्ती यांनी सांगितले की, जर सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे जुळून आल्या तर जीएसएलव्ही एमके ३ हा अग्निबाण येत्या २०११ सालच्या प्रारंभी प्रक्षेपणासाठी सज्ज होईल. या अग्निबाणात वापरण्यात येणाऱ्या सर्व इंजिनांच्या चाचण्या थिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील शास्त्रज्ञ घेणार आहेत.
जीएसएलव्ही एमके ३ या अग्निबाणाच्या सहाय्याने उच्च वजनाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणे व मंगळावर अंतराळयान पाठविणे भारताला शक्य होणार आहे असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. २०१५ साली भारतीय अंतराळवीरांची अवकाश मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जीएसएलव्ही एमके ३ हा अग्निबाण उपयुक्त ठरणार आहे.
जीएसएलव्ही मालिकेतील अन्य अग्निबाणांच्या सहाय्याने अंतराळयानातून दोन अंतराळवीर पाठविता येतात. मात्र जीएसएलव्ही एमके ३ या अग्निबाणाच्या सहाय्याने तीन अंतराळवीरांची मोहिम आखता येईल व सध्यापेक्षा तिप्पट वजनाचे म्हणजे तब्बल तीन टनाचे उपग्रह हा अग्निबाण प्रक्षेपित करू शकेल. जीएसएलव्ही एमके ३ ची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने २५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.