Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

क्लासिक पब्लिसिटीतर्फे व्यावसायिकांसाठी चर्चासत्र
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर येथील क्लासिक पब्लिसिटीने नुकतेच पुणे येथील ला मेरिडीयन या हॉटेलमध्ये ‘सी प्लस पाच व्हिटॅमिन’ चर्चासत्राचे आयोजन केले. मंदीस न घाबरता व्यवसायाची वाढ

 

कशी करावी याबाबत व्यावसायिकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
सन २०११पर्यंत मंदीचा परिणाम बाजारपेठेवर राहणार असून, या कालावधीत व्यवसाय वाढविण्याची संधी आहे. कमी खर्चात व्यवसाय वाढ, डायरेक्ट रिस्पॉन्स अ‍ॅडव्हर्टायझिंग, इमेज अ‍ॅडव्हर्टायझिंग, टेस्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग, सेलर अ‍ॅडव्हर्टायझिंग, इमोशनल अ‍ॅडव्हर्टायझिंग या पाच संकल्पनांचे ग्राहकांवर होणारे परिणाम व मिळणारा प्रतिसाद याबाबत ‘क्लासिक’चे कार्यकारी संचालक मनोज गुगळे यांनी सी प्लस पाच व्हिटॅमिन संकल्पनेची माहिती दिली.
सूत्रसंचालन रेश्मा गुगळे यांनी केले. आभार संस्थेच्या पुणे शाखेचे व्यवस्थापक विवेक कुबेर यांनी मानले. या चर्चासत्रास विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, झारखंड, गुजरात, महाराष्ट्रातील व्यावसायिक उपस्थित होते.