Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात
जोहान्सबर्ग, १ मार्च / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या कसोटीतीच पराभव टाळण्याचे आव्हान उभे ठाकलेल्या दक्षिण आफ्रिकेने

 

दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. वाँडर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ४५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चहापानापर्यंत बिनबाद ५७ धावांची मजल मारली होती.
गेल्या डिसेंबर महिन्यात याच प्रतिस्पध्र्याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने पर्थ कसोटीत असेच भले मोठे आव्हान यशस्वीरीत्या पार केले होते.
दरम्यान, २००२-०३ मध्ये वेस्ट इंडिजने दिलेले ४१८ धावांचे ऑस्ट्रेलियाने यशस्वीपणे पार केले होते. चहापानाला खेळ थांबला तेव्हा नील मॅकेन्झी आणि कर्णधार ग्रॅमी स्मिथ प्रत्येकी २८ धावांवर नाबाद होते. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर गुंडाळण्यात दक्षिण आफ्रिकेने यश मिळवले होते. नवोदित खेळणाऱ्या फिल ह्य़ुजेसने सर्वाधिक ७५ धावा काढल्या.