Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

मोदी यांची घसरगुंडी
जयपूर, १ मार्च / वृत्तसंस्था

२००५मध्ये राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ललित मोदींची कारकीर्द वादविवादांमुळे चर्चेत राहिली.

 

फेब्रुवारी २००५ - वादग्रस्त निवडणुकीनंतर किशोर रुंगठा यांना पराभूत करून ललित मोदी राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षस्थानी; ३८ वर्षे संघटनेवर वर्चस्व गाजविलेल्या रुंगठांची सद्दी संपुष्टात
११ डिसेंबर २००८ - वसुंधराराजे निवडणुकीत पराभूत; वसुंधराराजे यांच्यासाठी निवडणुकीदरम्यान मोदी यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२१ जानेवारी २००९ - किशोर रुंगठांकडून निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी तक्रार.
२८ जानेवारी २००९ - २००५च्या निवडणुकीत उभे राहता यावे यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा मोदींवर आरोप.
३० जानेवारी २००९ - राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपल्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना.
१५ फेब्रुवारी २००९ - जयपूरमधील बॉम्बस्फोटानंतर घोषित केलेली ६ कोटींची रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीत जमा न केल्याचा मोदींवर आरोप.
१६ फेब्रुवारी २००९ - आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या लढती अन्यत्र हलविण्याचा मोदींकडून इशारा.
१ मार्च २००९ - अखेर मोदींची राजस्थान क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत हार. दरम्यान, मोदी यांचा पराभव झाला असला तरी भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष किंवा इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन म्हणून त्यांच्या पदांवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. मोदी हे पंजाब क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीवरही आहेत, त्यामुळे बोर्डातील त्यांच्या स्थानाला धक्का पोहोचण्याची शक्यता नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले की, मोदी यांच्या पराभवामुळे बोर्डाचे उपाध्यक्ष तसेच आयपीएलचे प्रमुख म्हणून त्यांना कसलाही धोका नाही.